कोरोनामुळे होत असलेले मृत्यू ही घाबरण्यासारखी स्थिती नाही : नारायण मूर्ती

Lengthy lockdown will kill more people than Covid says NR Narayana Murthy
Lengthy lockdown will kill more people than Covid says NR Narayana Murthy

मुंबई : कोरोनामुळे होत असलेले मृत्यू ही घाबरण्यासारखी स्थिती नसल्याचे मत इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मुर्ती यांनी व्यक्त केले आहे. व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. कोरोनापेक्षा लॉकडाऊनमुळे अधिक लोकांचे मृत्यू होतील अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतात निरनिराळ्या कारणांमुळे दरवर्षी ९ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारत हा जगातिल सर्वात प्रदुषण असेलेल्या देशांपैकी एक आहे. दरवर्षी होणाऱ्या मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे प्रदुषणामुळे होत असतात. गेल्या दोन महिन्यात १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे आणि जर दरवर्षी ९ दशलक्ष लोकांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या होत असेल तर ही घाबरण्यासारखी स्थिती आहे असं म्हणता येणार नाही, असे मूर्ती म्हणाले.

Coronavirus : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात

लॉकडाउनवर चिंता व्यक्त करताना नारायण मूर्ती म्हणाले की, लॉकडाउन पुढेही सुरू राहिल्यास करोनामुळे नाही तर उपासमारीमुळे भारतात जास्त मृत्यू होतील. कोरोना हा इतर आजारांप्रमाणे आपण आता स्वीकारायला हवा आणि लोकांना कामावर येण्यास परवानगी द्यायला हवी. मात्र, त्याचवेळी याचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असणाऱ्यांची काळजीही घ्यायला हवी, एका मर्यादेनंतर कोरोना व्हायरसपेक्षा उपासमारीमुळे होणारे मृत्यू हे अधिक असतील. त्यामुळे भारत लॉकडाउनचा कालावधी अधिक काळ सुरू ठेवू शकत नाही हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे'.

१५ हजारांपेक्षा कमी पगार असणारांसाठी खूशखबर ! केंद्र सरकारने आणली 'ही' योजना

भारतात तब्बल १९० दशलक्ष लोक असंघटीत क्षेत्रात काम करत आहेत किंवा त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. लॉकडाउनमुळे यापैकी काहींनी आपलं काम गमावलं आहे. यापुढेही लॉकडाउन मोठ्या कालावधीसाठी सुरू राहिला तर आणखी लोकांना आपलं काम गमवावं लागेल, असेही मुर्ती म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com