|
|  |
 | अंकुर मराठी साहित्य संमेलन थाटात जळगाव, ता. ११ - अंकुर साहित्य संघातर्फे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
चाळीसगाव येथे थाटात झाले. या दोन दिवसीय संमेलनात साडेतीनशेहून अधिक
साहित्यिकांनी सहभाग घेतला. कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन, नाट्यछटा, पथनाट्य यांनी
रंगत आणली.
स्लाइड शो पाहण्यसाठी इथे क्लिक करा. |
जिल्हा क्रीडा संकुल ठेका पद्धतीने देण्यास समितीची मंजुरी धुळे, ता. ११ - येथील जिल्हा क्रीडा संकुल ठेका पद्धतीने देण्याच्या विषयास जिल्हा
क्रीडा समितीने मंजुरी दिली आहे. याशिवाय गरुड मैदानावरील व्यापारी संकुलातील ज्या
गाळेधारकांनी पैसे रोखून धरले त्यांच्या गाळ्यांच्या लिलाव करण्याचा, ज्यांच्याकडे
थकबाकी आहे, ती वसुलीवर भर देण्याचा निर्णय समितीने घेतला. ...... |
लोकवर्गणीअभावी रखडली योजना शहादा, ता. ११ - शहरासाठी तापी नदीपात्रातून सारंगखेडा (ता. शहादा) येथून १७ कोटी
२४ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्यासाठी
लोकवर्गणीची १० टक्के रक्कम पालिकेने भरली नाही. पर्यायाने ही योजना रखडली आहे.
...... |
थंड हवेचे ठिकाण पाल झाले भकास रावेर, ता. ११ - रावेर तालुक्यातील पाल या थंड हवेच्या ठिकाणाची जिल्ह्याच्या
नकाशावरच ओळख म्हणून राहिली आहे. या भागात प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे प्राणी,
पक्षीही दिसेनासे झाले आहेत. ..... |
तापमानाचा पारा ४४ अंशांवर चाळीसगाव, ता. ११ - तालुक्यात एप्रिलच्या सुरवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली
आहे. यामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. तापमानाचा पारा ४४
अंशांवर असल्याने दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. ..... |
महामार्ग चौपदरीकरणाच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू साक्री, ता. ११ - शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचा
प्रस्ताव गेल्या महिन्यात पाठविण्यात आला आहे. त्याच्यावरील अंदाजपत्रकाचे काम
सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रदीप
कापडणीस यांनी येथे दिली. .... |
अपघातातील जखमींपैकी एकाचा आज मृत्यू नंदुरबार, ता. ११ - गुजरातमध्ये काल (ता. १०) झालेल्या अपघातातील जखमींपैकी एकाचा
आज मृत्यू झाला. रूपसिंग मांगा पाडवी (रा. बेहरापाडा, ता. तळोदा) असे त्याचे नाव
आहे. |
कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू नंदुरबार, ता. ११ - अक्कलकुवा येथील मदरशा परिसरातील शेतात दहा ते बारा मोकाट
कुत्र्यांच्या हल्ल्यात चारवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी
साडेसातच्या सुमारास घडली. .... |
|
|  |
|