चित्रान्न ते बर्गर - शाही गोड परोठा साहित्य - सुका मेवा (खारीक, काजू, बदाम, मनुका, बेदाणे, अक्रोड), साखर प्रत्येकी
एक टी-स्पून, कणीक दोन वाट्या, मैदा दोन टेबलस्पून, दूध व पाणी कणकेचा गोळा भिजेल
इतके, मीठ चिमूटभर.
कृती - प्रथम सुकामेवा बारीक वाटा. त्यातच वाटताना साखर घाला. गव्हाच्या पिठात
मैदा, वाटलेले ड्रायफ्रूट्स, चवीपुरते मीठ घालून दूध व पाणी एकत्र करून
परोठ्याकरिता पीठ मळा. त्रिकोणी अथवा गोल परोठे करून दोन्ही बाजूस साजूक तूप सोडून
परोठा खरपूस भाजा. हे परोठे चवीला गोडसर लागतात. मुलांना आवडतात व त्यात सुकामेवा
असल्यामुळे खाण्यास रुचकर व पौष्टिक असतात.
- सौ. हेमा देवगावकर |