|
|  |
 | धनकवडीत तिघांना भोसकले पुणे, ता. ११ - धनकवडीमध्ये चव्हाणनगर येथील विणकर सोसायटीच्या आवारात सात जणांनी
धोत्रे कुटुंबातील तिघांना मारहाण करून त्यांना धारदार हत्यारांनी भोसकले. |
फूटपाथवर प्रकाशित होणार पुस्तक पुणे, ता. ११ - "प्रशस्त सभागृह, प्रसिद्ध व्यक्ती आणि हुकमी वक्ते, जाहिराती अशा
बडेजावाला या प्रकाशनाच्या कार्यक्रमात थारा नाही. फूटपाथवरच प्रकाशन आणि
रस्त्यावरील पुस्तकविक्रेत्यांकडूनच विक्री, असे रस्त्यावरच्या माणसांचेच येथे
राज्य आहे.' अशा "पेव्हमेंट पब्लिशर्स'चे म्हणजेच रस्त्यावरच्या प्रकाशनाच्या
चळवळीचे लोण आता पुण्यातही पोहोचले आहे. |
| कर्वे रस्ता - रस्त्यावरच पुस्तकाचे प्रकाशन करून रस्त्यावरील पुस्तक विक्रेत्यांमार्फतच त्यांची विक्री करणाऱ्या "पेव्हमेंट पब्लिशर्स' म्हणजे रस्त्यावरील प्रकाशनाच्या चळवळीचे लोण पुण्यातही पोचले आहे. |
पुन्हा एकदा "क्लीन चीट'? पिंपरी, ता. ११ - वादविवाद घालू नका. वॉर्डांतील विकासकामांकडे लक्ष द्या, अशी
ताकीद पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवडमधील
नगरसेवकांना आज दिली; मात्र महापौर-उपमहापौर बदलाच्या विषयाला बगल देत योग्य वेळी
निर्णय घेऊ, असे माफक आश्वासन श्री. पवार यांनी दिले. |
| कोथरूड - जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानासमोर रविवारी निदर्शने केली. दुकानदाराकडे धान्य व रॉकेलची मागणी करताना महिला. |
कलमाडींचे जीप यात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन खडकी, ता. ११ - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या १८ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी
कॉंग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी खडकीमध्ये जीप यात्रा काढली. या यात्रेतून
त्यांनी खडकी परिसर पिंजून काढला. |
चला, आपणही फुलवू गच्चीवरील बागा! पुणे, ता. ११ - कित्येक देशांमध्ये गच्चीवर बाग फुलविण्याची सध्या लाटच आलेली आहे.
आपणही दररोज निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून आपल्या घरी-
दारी गच्चीवरील बागा फुलवू शकू. |
नव्या संगीतकारांनी आम्हाला खुशाल आजमावावे - सुरेश वाडकर पुणे, ता. ११ - गळा हा पाण्यासारखा असावा, कुठलाही रंग त्यात मिसळता यावा; पण जो
"रियाजी' आवाज आहे, त्याच्यावर "विशिष्ट पद्धतीचे गाणे याला गाताच येणार नाही,'
असे ठरवण्याचा अधिकार संगीतकारांना कुणी दिला, असा प्रश्न करत "नव्या
संगीतकारांनी आम्हाला खुशाल आजमावावे,' असे स्पष्ट बोल प्रसिद्ध पार्श्वगायक
सुरेश वाडकर यांनी आज सुनावले. |
राणे जिल्ह्यात गरजले.. राजगुरुनगर, ता. ११ - ""मराठी बाणा, हिंदुत्व हे मुद्दे केवळ ठाकरे कंपनी
चालविण्यासाठीच आहेत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेनेकडून हे मुद्दे वापरले
जातात. शिवसेनेने मराठी तरुणांना कधी तरी नोकऱ्या द्याव्यात, उद्योग व्यवसाय काढून
द्यावेत. नुसती बडबड करू नये,'' अशी टीका महसूलमंत्री नारायण राणे यांनी
राजगुरुनगर आज येथे केली. |
सर्जनशील भाषेचा शोध हीच कवीची साधना - मंगेश पाडगावकर पुणे, ता. ११ - जीवनातील नानाविध अनुभवांमागचा माणूस समजून घेणे ही पहिली पायरी
आणि माणसाविषयीची समज व्यक्त करणाऱ्या सर्जनशील भाषेचा शोध, ही कवीची साधना असते,
अशा शब्दांत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी काव्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडत
नवोदित कवींना अनुभवाचे बोल सांगितले. |
आळंदी मारहाण प्रकरणाबाबत विधिमंडळात आवाज उठवू - आमदार नीलम गोऱ्हे चास-कमान, ता. ११ - ""येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी दादागिरी करून
झुणका भाकरी केंद्र चालकाला दमदाटी केली आहे. याबाबत विधिमंडळात आवाज उठविला जाईल.
मी त्या ठिकाणी नव्हतोच असे जर मोहितेंचे म्हणणे असेल, तर या प्रकरणाची सीआयडी
चौकशी करावी,'' अशी मागणी शिवसेनेच्या पक्षप्रवक्त्या व पश्चिम महाराष्ट्र महिला
आघाडी प्रमुख आमदार निलम गोऱ्हे यांनी राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत केली आहे. |
"टिंग्या'बरोबरच "कारभाऱ्या'चंही कौतुक पुणे, ता. ११ - "टिंग्या' साकारणाऱ्या शरद गोयेकरबरोबरच या ग्रामीण चित्रपटात
"कारभारी' ही भूमिका अत्यंत सकसपणे साकारणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील सुनील देव
या युवकाचाही आज सत्कार करण्यात आला. त्यांच्या अभिनयाची प्रशंसा करून कौतुकाचा
वर्षावही करण्यात आला. |
आकाशप्रेमींनी अनुभवली चांद्रसफर पिंपरी, ता. ११ - चंद्राच्या खडकाळ जमिनीवरून प्रवास करताना बसणारे हादरे, एकाएकी
सहा पटींनी कमी झालेले वजन, अंतराळातून वेगाने येणाऱ्या अशनिंपासून बचाव
करण्यासाठी क्षणार्धात झेपावणारी रॉकेट आणि पृथ्वी व चंद्रावरील मातीच्या एकत्रित
वापरातून बहरलेली वनराई..! |
स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने चालकांना नियमांचे धडे पुणे, ता. ११ - झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी खुला रहायला पाहिजे व चालकांनी
स्टॉप लाइनच्या मागे वाहने उभी करावीत, या उद्देशाने "सेव्ह पुणे ट्रॅफिक
मूव्हमेंट' स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने दोन चौकांत
सुरू केलेल्या जागरूकता उपक्रमाला यश मिळाले असून, आता अन्य चौकांतही हा राबविला
जाणार आहे. |
ऑलिम्पियाड स्पर्धेत पुण्यातील नऊ विद्यार्थ्यांचे यश पुणे, ता. ११ - सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय
सायन्स, सायबर व आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतातील पहिल्या दहा
विद्यार्थ्यांमध्ये पुण्यातील नऊ विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे. |
आपल्या भाषेतील ज्ञानाने देशाची त्वरेने प्रगती - अशोक साठे पुणे, ता. ११ - ""आपल्या भाषेतून ज्ञान निर्माण केल्यास देशाची वेगाने प्रगती
होईल. त्यासाठी इंग्रजीतील ज्ञान आपल्या भाषांमध्ये आणण्यासाठी "ज्ञानेश्वर'
निर्माण झाले पाहिजेत,'' असे प्रतिपादन प्रगती ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे
अध्यक्ष अशोक साठे यांनी आज येथे सांगितले. |
"वायसीएम'मधील डॉ. पंकज मोरे निलंबित पिंपरी, ता. ११ - यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात काल मध्यरात्री मद्य पिऊन
गोंधळ घातल्याच्या घटनेची पालकमंत्री अजित पवार यांनीही आज गंभीर दखल घेतली. |
वसंत व्याख्यानमालेत दुमदुमली अभंगवाणी पुणे, ता. ११ - एखाद्या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान ही ख्याती असलेल्या वसंत
व्याख्यानमालेत टाळ-मृदंगाच्या साथीने रविवारच्या संध्याकाळी अभंगवाणी दुमदुमली. |
काळ्या बाजारात रॉकेल विकणाऱ्यास पकडले पुणे, ता. - काळ्या बाजारात निळे रॉकेल विकणाऱ्या दुकानदाराला पकडून त्याबाबत
जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. संघटनेने आजही
शहराच्या विविध भागात आंदोलन सुरूच ठेवले. महिलांच्या आंदोलनामुळे चित्र बदलेल असे
वाटते का? बदलले तरी कशा स्वरुपात असेल? आपल्या प्रतिक्रिया पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर जरूर मांडा
|
|
|  |
|