|
|  |
 | | बुशसाहेब, तुमचे आरोप आम्ही मान्य करतो. सगळं जग चालवायला तुम्ही घ्या. अन्नधान्याचं तुम्हीच समान वाटप करा. "अण्वस्त्र'वर तुमची मालकी आहे. अन्न-वस्त्रावरही तुमचीच मालकी घ्या. जगातील तेलाच्या विहिरीसारखे जगातील अन्नाचे गोडावूनही ताब्यात घ्या. दाने दाने पर लिखा है, बुश तेरा नाम.. जेवणाचं प्रमाणही ठरवून द्या.... तितकंच आम्ही खाऊ... आम्ही तुम्हाला दुवा देत राहू... |
दाने दाने पर लिखा, बुश तेरा नाम... (हेरंब कुलकर्णी)
इथून पुढे जगाला "अण्वस्त्र' चाचण्या करणाऱ्या देशापासून धोका नाही तर शेतीत धान्य
उत्पादनाचे प्रयोग करणाऱ्या देशापासून धोका आहे. त्यामुळे इथून पुढे अणुभट्ट्यांवर
लक्ष ठेवण्यापेक्षा भारतातल्या हॉटेलांवर लक्ष ठेवावं लागेल. भारतात उभ्या
राहणाऱ्या "फूड इंडस्ट्रीवर' कदाचित भूकबळी थांबवण्यासाठी तुम्हाला बॉंबहल्ले
करावे लागतील. मानवतेच्या कल्याणासाठी तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला हे करावंच
लागेल. ....... |
शेतकऱ्यांच्या हाती अन्नसुरक्षेची दोरी; पण... (निशिकांत भालेराव)
जॉर्ज बुश यांनी खऱ्या मुद्द्याचे खापर चुकीच्या पद्धतीने फोडले; पण समस्येला
सम्यक राजकीय इच्छाशक्ती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सामावून घेण्याची तयारी, हेच
खरे उत्तर आहे. शेतमालाला भाव मिळवून देतानाच २५ कोटी मध्यमवर्गाचा विचार लक्षात
ठेवूनच आखलेल्या धोरणांवर प्रभावी अंमल होणे, हेच खरे सध्याच्या अन्न
असुरक्षिततेला उत्तर आहे. ........ |
भगिनी समाज (शोभा डे)
महिला दिनाचा पॉम्प ऍण्ड शो बंद झाल्यामुळेच मी भगिनी समाजाने दिलेले महिलादिनाचे
निमंत्रण स्वीकारले; पण भगिनी समाजात पोचताना माझी चांगलीच तारांबळ झाली. मला ते
ठिकाणच सापडेना. भगिनी समाज मला सहज सापडेल असे वाटत होते. दादर असल्यामुळे मी
अर्थातच मराठीत पत्ता विचारत होते. ती अर्थातच माझी चूक होती ...... |
मुलं अनुकरण करतात (डॉ. श्रीकांत चोरघडे)
५ ते १० वर्षं वयाच्या काळात मुलांना खूप उत्साह असतो. काहीतरी नवं करावंसं वाटतं,
नवं शिकावंसं वाटतं. या सळसळत्या उत्साहाचा जर सकारात्मक उपयोग करून घेता आला, तर
त्यातून एक विधायक व्यक्तिमत्त्व आकार घेत असतं. ....... |
मोरा गोरा अंग लइले (आरती कदम)
काळा रंग कुणी थेट नाकारत नाही. आपण भारतीयांनी सावळेपण स्वीकारलंही आहे. पण तरीही
गोरेपणाचं आपल्या मनात एक सुप्त आकर्षण असतंच. ती मानसिकता कशामुळे निर्माण झाली
असावी? माणसामाणसांत भेद करणारा हा रंग त्या पलीकडे कधी जाणार आहे की नाही?
माणसामाणसांत नातं जोडणाऱ्या आणि तोडणाऱ्याही या रंगाविषयी..... ...... |
गेले ते (सोन्याचे) दिन गेले? (श्रीधर लोणी)
सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले "कोलार गोल्ड फिल्ड्स' (केजीएफ) आता
इतिहासजमा झाले आहे; पण हा इतिहास उगाळत न बसता त्याची पुनरावृत्ती करण्याचा अवघड
प्रयत्न तेथील कामगार, अधिकारी यांनी एकत्रितपणे सुरू केला आहे. ....... |
चाणक्याची परराष्ट्र नीती (विजय नाईक)
आजच्या परिस्थितीलाही कौटिल्याच्या परराष्ट्र नीतीतील तत्त्वे हुबेहूब लागू पडतात.
फरक एवढाच आहे, की आधुनिक काळात "शीतयुद्ध' या नव्या शब्दाची भर पडली आहे. आता
व्यापारयुद्ध, तेलयुद्ध हे शब्द प्रचलित झाले आहेत. पुढे "जलयुद्ध' होतील, असेही
भाकीत केले जाते; परंतु विध्वंस टाळायचा असेल, तर बव्हंशी राष्ट्रांना प्रगल्भ
शिष्टाईचा मार्ग अवलंबावा लागेल. ....... |
कामगार महिलांकरिता आहार (जयश्री पेंढरकर)
आहाराचा महत्त्वाचा उद्देश पोट भरण्याचे मानसिक समाधान, हा आहे. आहारच आपणाला
सुखदुःख, आरोग्य, रोग, मनःशांती या अवस्था देत असतो. माणसाचे जीवन सुखी समृद्ध आणि
यशस्वी व्हावयाचे असेल, तर दोन गोष्टी महत्त्वाच्या. आहार आणि संस्कृती! समतोल
आहारच शरीर, मन आणि बुद्धीचे संतुलन साधू शकतो. ....... |
वृंदावनातील विधवा... (मंगेश वैशंपायन)
विधवा... अजूनही आपल्याकडे हा शब्द किंवा अशी स्त्री नाकारली जाते. याबाबत आपण
अजूनही पुराणातून बाहेर पडलेलो नाही. कालानुरूप काही बदल झाले असले, तरी पतीचे
निधन झालेल्या स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टीत किती बदल झाला आहे, हे आपणच आपले
तपासायला हवे. तसा बदल खराच झाला असता, तर वृंदावन ही विधवा स्त्रियांची राजधानी
ठरली नसती आणि घरी जाण्यापेक्षा आहे हे उत्तम, असे त्यांना वाटले नसते! ....... |
रायन - एक अटळ शोकांतिका (प्रसाद नामजोशी)
ख्रिस्तोफर लॅंडर्थ या आजच्या ऍनिमेशन फिल्ममेकरने रायन लारकिन या कॅनडाच्या
कालच्या ऍनिमेटरला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे "रायन' हा तेरा मिनिटांचा
ऍनिमेशनपट. २००५ च्या ऑस्करसह जगभरातील तब्बल साठ पुरस्कार या लघुपटाने पटकावले.
....... |
नोंदवही स्वातंत्र्यलढ्याची - "गुजरात - १८५७' लेखांक ४८ (आनंद हर्डीकर)
१८५७ च्या हुतात्म्यांना कालच्या स्मृतिदिनी देशभरात ठिकठिकाणी श्रद्धांजली
वाहण्यात आली. जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे त्या कार्यक्रमांना वेगळे वलय
प्राप्त झाले. या निमित्ताने विविध स्तरांवर जी पूर्वतयारी केली गेली तिच्यामुळे
ज्ञात इतिहासाला तर उजाळा मिळालाच; पण फार मोठ्या प्रमाणावर आजपर्यंत अज्ञात
राहिलेली किंवा दुर्लक्षित केली गेलेली माहितीसुद्धा प्रकाशात आली. ....... |
खेळाडूंचे प्रशिक्षण (डॉ. सचिन तपस्वी)
सर्व खेळाडूंना निष्णात करून ध्येय आणि लक्षाप्रत पोचविण्यासाठी योग्य
प्रशिक्षणाची नितांत गरज असते. खेळाडू किंवा कोणत्याही स्पोर्ट्स
ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेणाऱ्या ऍथलिटसाठी प्रशिक्षणाच्या वेळापत्रकाला फार मोठे
महत्त्व असते. प्रशिक्षणाची योग्य वाटचाल केली तरच ऍथलिटला शारीरिक इजा न होता
आपला परफॉर्मन्स वाढविता येतो. प्रशिक्षणासाठी विचारात घेण्याच्या महत्त्वाच्या
गोष्टी ....... |
|
|  |
|