SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
पंचांग |

दिनमान
मेष - महत्त्वाचे निर्णय नकोत. गुंतवणुकीची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक अस्वस्थता राहील.
वृषभ - नातेवाइकांकडील तुमची कामे दुपारपूर्वीच करावीत. घरी पाहुणे येण्याची शक्‍यता.
मिथुन - महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे.
कर्क - व्यवसायातील तुमचे अंदाज चुकण्याची शक्‍यता आहे. दुपारनंतर एखादा मनस्ताप संभवतो.
सिंह - मानसिक अस्वस्थता. प्रवास शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कन्या - हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात आर्थिक नुकसानीची शक्‍यता आहे.
तूळ - महत्त्वाचे व्यवहार दुपारपूर्वी करावेत. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृश्‍चिक - महत्त्वाची कामे आज नकोत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
धनू - दुपारनंतर अडचणी कमी होतील. उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे मात्र आज नकोत.
मकर - दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना घडेल. वादविवादात सहभाग टाळावेत.
कुंभ - वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता. मानसिक अस्वस्थता. आरोग्याच्या तक्रारी.
मीन - मानसिक अस्वस्थता राहील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो दुपारपूर्वी घ्यावेत.

- प्रा. रमणलाल शहा

१२ मे - जागतिक परिचारिका दिन
१८२० - आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म.
१८९९ - पुण्याचा प्लेग अधिकारी वॉल्टर चार्ल्स रॅंड याच्या खुनाबद्दल क्रांतिवीर बाळकृष्ण हरी चापेकर यांना फाशी देण्यात आली.
१९०४- महाराष्ट्राचे आद्य कादंबरीकार लक्ष्मण मोरेश्‍वर हळबे यांचे निधन. १८६१ मध्ये मुक्तामाला ही पहिली कांदबरी त्यांनी लिहिली.
१९०५ - महाराष्ट्रातील विचारवंत, "मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म.
१९०९ - "पुणे अनाथ विद्यार्थी गृह' या संस्थेची स्थापना. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील हजारो गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकले. पुढे संस्थेच्या नावातील अनाथ हा शब्द वगळला गेला.
१९२५ - समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा येथे जन्म.
२००५ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राची चाचणी चंडीपूरला घेण्यात आली.

गुलदस्ता - दुर्मिळ अनुभव
ते दोघेही आश्‍चर्याने पुन्हा पुन्हा विचारत होते. ""खरंच तुम्ही पंधरा-वीस जण गेले पंधरा दिवस एकत्र नांदता आहात? सगळ्यांचं एकत्र राहणं, हे चित्र आता दुर्मिळ होत चाललं आहे. कार्याच्या निमित्ताने सुद्धा एकत्र येणं, राहाणं यापेक्षा परस्पर, कार्यालयातच भेटू इतक्‍या तुटक पातळीवर आपण आलो आहोत''...

दोघांना मध्येच थांबवत मी म्हणाले, ""काही दिवसांकरिता दहा जणांनी एकत्र राहाणं चित्र दुर्मिळ असलं, तरी त्यातही एक धमाल असते, मजा असते. ती अनुभवायला सुद्धा घराचं भाग्य असावं लागतं.'' ""अहो, दहा सवयींचे, दहा स्वभावांचे एकत्र येतात तेव्हा उठल्यापासून गंमत सुरू. एकाला चहा उठल्याबरोबर हवा, कुणाला फिरून आल्यावरची सवय, कोणी अंघोळी आणि तीन चार वेळा चहा घेणारा, तर कोणी लिंबू-पाणी हवं म्हणणार, एखादा चहा कसा वाईट यावर चर्चा करायला तयार, तर दुसरा मोठा बंपर, मग हातात घेऊन चहा "प्रेशर'साठी हवाच म्हणणारा''... तोपर्यंत पहिल्या राऊंडला चहा घेऊन झालेल्या आजीबाईंची नाष्टा तयारी झालेली. ""तुझं उपीट फर्स्टक्‍लास होत गं... तिला चढवून दिलं की नाष्टा तयार. नेमकं आपण जास्त, मीठ कमी... मग यूज अँड थ्रो डीश चमचे हजर. ""आता मीठ कमीच खायला हवं म्हणते''.. तो आसट उपमा फस्स होऊन जायचा.

जेवणाची गंमत तर आहाहा... पोळ्यांना बाई कशाला? मी करेन म्हणून पदर खोचून पुढे आलेल्या आजी (वय सत्तरीच्या पुढे) गॅसकडे ढुंकूनही बघायच्या नाहीत. पोळ्यांची बाई आली की ""सात-आठ भाकरी कर गं.. झक्क वांग्याची भाजी करू या... मामाची फर्माईश. "कांदा चिरून नका ठेवू हं... बुक्कीने फोडीन मी....' चटणी, तळू चटकदार बरण्या "अर्ध्या' एका पंगतीतच होणार.''

भाजी आमटीच्या रोज वेगळ्या चवी. कुणाला चिंच-गुळाचं वरण, तर कुणाला डाळ-मेथी आवडायची. फोडणीला मी टाकते, तू आपली तिखट-मीठ घाल म्हणत कुणी बाजूला सरकणार. दुपारचा चहा कॉन्ट्रॅक्‍ट काका, पुतण्या कोणीतरी सांभाळायचाच हे पहिल्या दिवशीच जाहीर झालेलं. रिकाम्या होणाऱ्या फ्रिजच्या बाटल्या, माठ भरण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट छोट्या मंडळींवर लादलेलं. ही रिकामी बाटली कोणी ठेवली? विचारून बघितलं तर एकही कबूल होणार नाही. चुकारपणा करणारे बोलणीही खात होते. रात्री ते उरलंय ते मध्ये ठेवायचं. ""भरपूर असेल तर वाया घालवू नको रे आणि कमी काही असेल तर रात्री दोन घास कमी बरे...'' भांडी बघून दोन सल्ले देणारा एक ज्येष्ठ.

झोपताना पंख्याखाली कोण? उशी लागतेच... पांघरूण पुरत नाही... छोट्यांनी दोघांत घ्या. सकाळी ते पांघरूण तिसऱ्या मंडळीच्या अंगावर... धमाल... मजा. दोघांनी मनोभावे मी कथन केलेली कहाणी ऐकली. एकदम विचारलं, ""इतकं सगळं जमून येण्यासाठी काय गं केलंस?'' सोप्पं उत्तर... ""तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ.''

- विनया देसाई

बालविकास - बोलके डोळे
विश्‍वाच्या रचनाकर्त्याने प्रत्येक जीव निर्माण करताना खूप विचार केला असावा. हेच बघा ना, काळविटाचे पिलू जन्माला येताना केवळ टपोरे डोळे घेऊन येत नाही, तर त्या डोळ्यांची दूरदृष्टी संपूर्ण विकसित झालेली असते! बरोबरीने तुडतुडे पाय असतातच! थोडक्‍यात शत्रू "दिसणे' आणि "पळून जाणे' या दोन्हींची तयारी झालेली असते. त्याउलट उंदराचे पिलू. जन्मतः डोळे बंद असतात. त्यामुळे आपसूकच ते उजेडाच्या शोधात खुडबुडत फिरत नाही. केवळ वासाच्या संवेदनांवर आईच्या आगेमागे घुटमळत राहते.

माणसाचे बाळ या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठे तरी आहे. बाळाला जन्मतः सगळंच अंधुक दिसत असतं. तुम्हा-आम्हा मोठ्यांच्या दृष्टीपेक्षा (६/६) बाळाची दृष्टी फक्त एक- दशांश (६/६०) असते. म्हणजे जी गोष्ट नॉर्मल माणसाला ६० फुटांवरून बघता येते त्यासाठी बाळाला ६ फूट अंतरावर यावे लागते! इतकंच नाही तर कुठल्याच एखाद्या गोष्टीवर दोन्ही डोळ्यांनी नजर स्थिरावून "फोकस' करण्याची क्षमताही बाळात नसते. त्यामुळे बाळाचे डोळे कुठेही कसेही फिरत असतात. त्यांच्या एकमेकांच्या हालचालीतही समन्वय नसतो. ही दोन्ही डोळ्यांनी एकत्रित बघण्याची कला (इळपेर्लीश्ररी तळीळेप) साधारणतः दोन ते चार महिन्यांत साध्य होते. त्या सुमारास दृष्टीही (६/१८ ते ६/९) सुधारते. सहा ते नऊ महिन्यांपर्यंत मोठ्यांची दृष्टिक्षमता (६/६) विकसित होते.

बाळाच्या दृष्टीची आणखीन एक गंमत म्हणजे त्यांना सुरवातीला ७ ते १२ इंचांच्या कक्षेतील हलणाऱ्या, प्रकाशित/ चकचकीत गोष्टी दिसू शकतात. त्यातही नेहमी दिसणारा आईचा चेहरा पटकन (दोन-तीन आठवड्यांत) ओळखीचा बनतो. इतकंच नाही, तर जेमतेम महिन्या- दीड महिन्यात आईच्या डोळ्यांत नजरेला नजर देऊन बघणे जमू लागते. दोन-अडीच महिन्यांनंतर इतर चेहरे, त्यावरचे बदलणारे हावभाव बाळ "टिपू लागतं.' अर्थातच प्रत्येक वेळेस आईच्या लाडक्‍या चेहऱ्याशी तुलना असतेच. त्यातून आपला कोण आणि परका कोण (Stranger Anxiety) हे कळू लागते.
महत्त्वाचे म्हणजे भावनांची देवाणघेवाणीचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे बाळाचे डोळे! वय वाढतं तसं आपण मोठ्ठे भावना लपवायला लागतो आणि आपले डोळे एकदम कोरडे होऊ जातात.

- डॉ. सुनील गोडबोले

पंचांग
सोमवार -वैशाख शु. ८ रा. ९.०८, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, दु. १.१५ नंतर सिंह. भारतीय सौर वैशाख २२, शके १९३०. (उद्या ः वैशाख शु. ९)


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
मदर्स डे
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
वॉलपेपर
नवा चित्रपट
मैत्रीण
वसंतोत्सव
एज्यूमंत्रा
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
हो
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600