|
|  |
 | "सीएमझेड'मुळे शहरांच्या विकासाला खीळ - मुख्यमंत्री .मुंबई, ता. १७ - किनारा क्षेत्र व्यवस्थापन अधिसूचनेमुळे (सीएमझेड) मुंबई तसेच
किनारपट्टीवरील शहरांच्या विकासाला खीळ बसणार असून प्रस्तावित मसुद्याबाबत
किनाऱ्यावरील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, अशी विनंती
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पंतप्रधानांना केली आहे. |
बॉम्बस्फोट करणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री .मुंबई, ता. १७ - ठाणे येथील गडकरी रंगायतन या नाट्यगृहात "आम्ही पाचपुते' या
नाटकाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती
समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख
यांनी समाधान व्यक्त केले आहे. |
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत .मुंबई, ता. १७ - ठाणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झालेल्या अनपेक्षित
पराभावाची दखल घेत आणि तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी
कॉंग्रेसमध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. |
राज्यात २ वर्षांत १०लाख घरे बांधण्याचा कालबद्ध कार्यक्रम .मुंबई, ता. १७ - सर्वसामान्यांना परवडणारी दहा लाख घरे राज्यात दोन वर्षांमध्ये
बांधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम कालबद्धरीत्या पूर्ण करण्यासाठी दरमहा आढावा
घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज
मंत्रालयातील बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. |
सोनिया गांधींच्या सभेचा जोरदार प्रचार राहाता, ता.१७ - "ताई-माई-अक्का विचार करा पक्का आणि सोनियांच्या सभेला यायचा
निश्चय करा पक्का,' अशा पद्धतीने प्रचार करीत जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या
धुरिणांची यंत्रणा सोनिया गांधींच्या सभेच्या पूर्वतयारीत जुंपली आहे. |
सभापती मारहाण प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज नगर, ता. १७ - तालुका पंचायत समितीच्या सभापती नंदा शेंडगे यांना मारहाण प्रकरणी
गुन्हा दाखल झालेल्या दहा आरोपींनी मंगळवारी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी
न्यायालयात अर्ज दाखल केले. |
कोकमठाण दंगलप्रकरणी आणखी २५ संशयित कोपरगाव, ता. १७ - कोकमठाण दंगलप्रकरणी आणखी २५ संशयित आरोपींची नावे निष्पन्न
झाली असून, सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत कुणालाही अटक करण्यात आली
नाही. |
दहावीच्या मराठी पुस्तकाचा गोंधळ संपवा - विनोद तावडे .मुंबई, ता. १७ - दहावीच्या मराठी माध्यमाच्या मराठी विषयाचे पुस्तक अचानक
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बदलून पाठ्यपुस्तक मंडळाने पुन्हा एकदा दहावीच्या
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळण्याचा लाजीरवाणा प्रकार केला असून |
कर्जमाफी प्रमाणपत्र व हमीपत्राचा मसुदा तयार नगर, ता. १७ - शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र तसेच एकवेळ परतफेड
योजनेत सहभागी होणारांकडून भरून घेतल्या जाणाऱ्या हमीपत्राचा मसुदा "नाबार्ड'ने
तयार केला असून, जिल्हा सहकारी बॅंकेला तो मिळाला आहे. |
तंटामुक्त गाव मोहीम विभागनिहाय आढावा .मुंबई, ता. १७ - उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज महात्मा गांधी तंटामुक्त
गाव मोहिमेचा मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागनिहाय आढावा घेतला. |
विखेंचा व्यवसाय शिक्षण प्रस्ताव राहुल गांधी यांनी मागविला .मुंबई, ता. १७ - कॉंग्रेसचे युवा सरचिटणीस राहुल गांधी यांना प्रवरानगरमध्ये
झालेल्या विकासाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांच्या खास शिफारशीमुळे
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र दौ ऱ्याकरिता या गावाची निवड केली
आहे. |
"रोहयो' अंमलबजावणीत महाराष्ट्र पिछाडीवर - गडकरी .मुंबई, ता. १७ - विविध राज्यांतील राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीच्या
मूल्यांकनाने महाराष्ट्राला केवळ ४७.८५ टक्के गुण मिळाले आहेत; तर राजस्थान
सरकारला १२४.७१ टक्के गुण मिळाले आहेत. |
केंद्रातील मूल्यांकनात महाराष्ट्राची पिछाडी .मुंबई, ता. १७ - विविध राज्यातील राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीच्या
मूल्यांकनाने महाराष्ट्राला केवळ ४७.८५ टक्के गुण मिळाले आहेत; तर राजस्थान
सरकारला १२४.७१ टकक्के गुण मिळाले आहेत. |
अरुण गवळीच्या कोठडीत वाढ .मुंबई, ता. १७ - दोन गंभीर गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेल्या आमदार अरुण
गवळीच्या न्यायालयीन कोठडीत १ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. |
|
|  |
|