SAKAL PNG
Last Update 6/18/08 20:29 PMज्येष्ठ शु. १५ बुधवार,  18 June 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
पैलतीर डायरी
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

पोटेगावची वैष्णवी मुंढे राज्यात प्रथम
करमाळा, ता. १६ - पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोटेगाव शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी संजय मुंढे या विद्यार्थिनीचा ३०० पैकी ३०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.

खासदार जनतेची दिशाभूल करतात - शिंदे
सोलापूर, ता. १७ - सोलापूरच्या विकासासाठी कोणी काय केले? याबाबत केवळ दिशाभूल करण्याचे काम खासदार करीत आहेत असे प्रत्युत्तर देऊन आजवर झालेली कामे कोणी केली? असा सवाल केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा विचारला आहे.

शेतजमीन सात बारावर अन्य नाव आले - राऊत
बार्शी, ता.१६ - वारसाहक्काने वाटपात आलेल्या तालुक्‍यातील जामगाव (आ) हद्दीतील सुमारे अकरा एकर शेतजमिनीच्या सेतू कार्यालयाने दिलेल्या एकाच गटाच्या तीन सात बाराच्या उताऱ्यावरील नोंदीवर येथील गहाळ कारभारामुळे राजेंद्र राऊत यांच्या नावाऐवजी जगदीश देविदास पाटील यांचे नाव नोंदवले गेले आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकारांना दिली.

शिंदेंचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणारे शिलेदार !
सोलापूर, ता. १७ - केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केली असून त्यांनी प्रकल्पांची भूमिपूजने केली; प्रकल्पपूर्तीची उद्‌घाटने मी केली, अशी शालजोडीतली टीका खासदार सुभाष देशमुख यांनी आज येथे केली.

जामगुंडे, निंबर्गींना पालिकेत न येण्याची सूचना - गडकरी
सोलापूर, ता. १७ - माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे व पक्षाचे शहर सरचिटणीस प्रा. अशोक निंबर्गी यांनी महापालिकेच्या कारभारात मुळीच हस्तक्षेप करू नये तसेच पालिकेतही येऊ नये, अशी सक्त ताकीद आज मुंबईत झालेल्या भाजप प्रदेश नेत्यांच्या बैठकीत देण्यात आली.

आषाढीसाठी राज्यभरातून २६५५ जादा बसगाड्या
सोलापूर, ता. १७ - राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त राज्यभरातून २६५५ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

भारताने आपली स्वतःची ओळख कायम ठेवावी
सोलापूर, ता. १७ - भारताला स्वतःचा इतिहास आहे, संस्कृती आहे. भारताची जगात वेगळी ओळख आहे. तेव्हा भारताने भारतासारखेच राहावे. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या मागे जाऊ नये, असे मत फ्रान्समधील विद्यार्थ्यांनी येथे व्यक्त केले.

बारावी "सीईटी'साठी अवास्तव शुल्क - हरीश बुटले
सोलापूर, ता. १७ - "डीपर'च्या तयारी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेसाठीची मानसिकता बनते, असे मत "डीपर' संस्थेचे सचिव हरीश बुटले यांनी आज येथे सांगितले.

जागतिकीकरणामुळे व्यवस्थापन क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल
सोलापूर, ता. १७ - पूर्वी उत्पादनाशी निगडित उद्योगातच व्यवस्थापक पद असायचे. मात्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर आता हे क्षेत्र अधिक व्यापक बनले असून मुलांना या क्षेत्राचे आता अधिक आकर्षण वाटत आहे.

देशमुख ऍण्ड कंपनीचे काम निकृष्ट
सोलापूर, ता. १७ - सुभाष देशमुख ऍण्ड कंपनीने सोलापूर शहरात केलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट पद्धतीचे असून, या कामाची चौकशी करावी, असा प्रस्ताव कॉंग्रेसचे स्थायी समितीतील सदस्य बाबा मिस्त्री व रमेश राठी यांनी दिला आहे. त्यावर शनिवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

माहिती अधिकार सामाजिक लाभासाठी - विजय कुवळेकर
सोलापूर, ता. १७ - माहितीचा अधिकार कायद्याचा वापर सामाजिक लाभासाठी झाला पाहिजे, त्याचा गौरवापर होत असेल तर ते रोखले पाहिजे असे आवाहन करतानाच परिवर्तनाचे सामर्थ्य असलेल्या या कायद्याची आणि त्याच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांनाच झाली पाहिजे.

"शिंदे मुख्यमंत्री असतानाच चौपदरीकरणाचे काम व्हायला हवे होते'

सोलापूर, ता. १७ - राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाच मार्गी लागले असते तर सोलापूरचा कायापालट झाला असता, पण आता उशीर झाला आहे; अशी टिप्पणी खासदार सुभाष देशमुख यांनी आज येथे बोलाविलेल्या खास पत्रकार परिषदेत केली.

महापुरुष व राष्ट्रपुरुषांचे पुतळे आंबेडकर उद्यानात बसविणार
बार्शी, ता. १७ - शहरात असणारे विविध महापुरुषांचे व राष्ट्रपुरुषांचे पुतळे बार्शी दिवाणी न्यायालयाच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटाने मंजूर करण्यात आला.

पोलिस आयुक्त उपाध्याय उद्या पदभार घेणार
सोलापूर, ता. १७ - शहराचे १४ वे पोलिस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय गुरुवारी पदभार घेणार आहेत.

अक्कलकोट नाक्‍यावर ट्रकखाली चिरडून दुचाकीवरील दोघे ठार
अक्कलकोट, ता. १७ - अक्कलकोट स्टेशन रस्त्यावर नाक्‍याजवळ दहा टायरच्या मालट्रकने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले.

बार्शीत "सेतू' कार्यालयाला सील
बार्शी, ता. १७ - आमदार राजेंद्र राऊत यांच्या सात-बारा उताऱ्यावर चुकीच्या नोंदी लागल्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत सोमवारी (ता.१६) रात्री उशिराने प्रांताधिकाऱ्यांनी येथील "सेतू' कार्यालय सील केल्याने आज "सेतू'मध्ये विविध दाखले, प्रतिज्ञापत्र व उताऱ्यांसाठी आलेल्या नागरिकांची, विशेषतः विद्यार्थी व महिलांची मोठी गैरसोय झाली.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
हिरवा कोपरा
वॉलपेपर
महाराष्ट्र दर्शन
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परवेझ मुशर्रफ आणि जॉर्ज बुश हे सर्वांत अविश्‍वासू नेते आहेत, असे वाटते का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600