Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

प्रश्नोउत्तरे
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 27, 2009 AT 12:00 AM (IST)

वयाच्या चौदाव्या वर्षापासून माझे केस खूपच गळतात. अनेक तेले, शांपू वगैरे वापरूनही काही फरक पडत नाही. माझ्या अंगात हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी आहे. गोळ्या घेतल्या की तात्पुरते वाढते, पुन्हा कमी होते. खूप अशक्‍तपणा जाणवतो. रंगही काळवंडलेला आहे. कॅल्शियमचे प्रमाणही कमीच आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ...रोहिणी जी
उत्तर - अशक्‍तपणा, काळवंडलेला रंग, केस गळणे या सर्व तक्रारी मुळात सातत्याने कमी होणारे हिमोग्लोबिन व अपुरे कॅल्शियम यांच्याशी संबंधित आहेत. केसांना तेल लावणे वगैरे बाह्य उपचारांपेक्षाही केसांना आतून ताकद मिळणे अतिशय आवश्‍यक आहे आणि त्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन, कॅल्शियम पुरेशा मात्रेत असणे अत्यावश्‍यक आहे. हिमोग्लोबिन तात्पुरते वाढवणाऱ्या गोळ्यांनी शरीरात उष्णताही वाढू शकते, ज्यामुळे केस अजूनच गळू शकतात. आयुर्वेदामध्ये सुवर्णमाक्षिक भस्म, प्रवाळपंचामृत वगैरे औषधांनी युक्‍त अनेक योग सांगितलेले आहेत, की ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम न होता हिमोग्लोबिन, आयर्न, कॅल्शियम उत्तम प्रकारे वाढू शकतात. बरोबरीने केसांच्या आरोग्यासाठी केश्‍य द्रव्यांनी सिद्ध औषधी तेल लावणे, शिकेकाई, रिठा वगैरे द्रव्यांच्या मिश्रणाने केस धुणे अशा उपायांचाही निश्‍चित उपयोग होईल.


सध्या माझा मुलगा दोन वर्षांचा आहे. त्याला वारंवार पातळ शौचाला होते. ऍलोपॅथिक औषध घेतल्यास चार-आठ दिवस बरे वाटते. पण पुन्हा तसाच त्रास सुरू होतो. त्याची तब्येतही किरकोळ आहे. तब्येत सुधारण्यासाठी काही उपाय सुचवावा. बेलाचा मुरांबा देण्याचा काही उपयोग होईल का?
...सौ. सावंत, पुणे
उत्तर - वारंवार पातळ शौचाला होणे हे पचनशक्‍ती व आतडी कमकुवत झाल्याचे लक्षण आहे. बऱ्याचदा शरीरातील अतिरिक्‍त उष्णतेमुळेही असा त्रास होऊ शकतो. बेळफळाच्या मुरांब्यामुळे मलप्रवृत्ती बांधून होण्यास चांगली मदत मिळू शकते. बरोबरीने अतिरिक्‍त उष्णता कमी होण्यासाठी प्रवाळ पंचामृत, कामदुधा यासारख्या औषधांचा उपयोग होईल. आतड्यांची ताकद वाढावी, एकंदर पचन सुधारावे म्हणून कुटजावलेह नावाचा योग उत्तम असतो. लहान वयात अवलेह, सिरप या रूपात औषध घेणे सोपे जाते. त्या दृष्टीनेही कुटजावलेह, पचन सुधारून अन्न अंगी लागावे यासाठी गुळवेल, ज्येष्ठमध, कोरफड वगैरे औषधांपासून बनवलेले सिरप देणे चांगले. या उपायांनी पचन सुधारले, की तब्येतही सुधारेल. बरोबरीने अंगाला नियमित अभ्यंग करण्याचाही उपयोग होईल.

गर्भावस्थेत मी "आयुर्वेदीय गर्भसंस्कार' पुस्तकातून मार्गदर्शन घेतले होते, तसेच गर्भसंस्कार संगीतही ऐकले होते. माझा मुलगा खूप हसरा व खेळकर आहे. त्याला कसलाही त्रास नाही व तो सर्वांचाच लाडका आहे. त्याची एकाच बाबतीत काळजी वाटते, की त्याच्या मनासारखे झाले नाही तर तो खूप चिडतो, वस्तू वगैरे फेकतो. यासाठी काही करता येईल का?...सौ. अवनी देशपांडे
उत्तर - वास्तविक गर्भसंस्कार व्यवस्थित झालेली मुले अतिशय समजुतदार व शांत असतात, असा अनुभव आहे. कदाचित घरामध्ये कुणाचा तरी स्वभाव या प्रकारे तापट असावा. परंतु या तापटपणाला आळा घालण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न करता येतील. ब्राह्मी, जटामांसी, ज्येष्ठमध वगैरे बुद्धीला, मेंदूला, मनाला शामक द्रव्यापासून तयार केलेले ब्रह्मलीन घृत किंवा सिरप घेण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून एक - दोन वेळा पादाभ्यंग करण्यानेही मन शांत होण्यास मदत मिळताना दिसते. ब्राह्मी, शतावरी, चंदन, गुलाब वगैरे द्रव्यांनी सिद्ध तेल रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावण्यानेही मन-विचारात शांतता प्रस्थापित होऊ शकते. मुले अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे या उपायांसोबत घरातले वातावरण शांत असण्याकडे लक्ष ठेवावे.

माझे वय 30 वर्षे असून, माझी मासिक पाळी नियमित येते, पण रक्‍तस्रावाचा खूप उग्र गंध येतो. त्या ठिकाणी खाजही येते. तपासण्यांमध्ये कुठलाच दोष सापडत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. ...वैशाली
उत्तर - मासिक रक्‍तस्रावाला उग्र गंध येणे हा आयुर्वेदामध्ये आर्तव दोष सांगितला आहे. स्त्री संतुलनाच्या दृष्टीने याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. गर्भाशयाची शुद्धी व्हावी, आतील दोष दूर व्हावा यासाठी योनीमध्ये औषधांनी सिद्ध फेमिसॅन तेलाचा पिचू नियमित ठेवण्याचा, तसेच खालून धुरी घेण्याचा दोन्हीही तक्रारींमध्ये उत्तम उपयोग होऊ शकतो. अशोकादिघृतासारखे गर्भाशयाची शुद्धी करून ताकद वाढवणारे औषधी घृत, शतावरी कल्प, चंद्रप्रभा यासारखे औषधी योग काही दिवस घेण्याचाही उपयोग होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन-चार उत्तरबस्ती करून घेणेही उत्तम.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
www.ayu.de
डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा...
प्रतिक्रिया
On 04/10/2011 04:13 PM Janki Garate said:
माझी भाची ६ वर्षाची आहे. जन्माल्य्पासून तिला खोकला, सर्दी, ताप, दमा आहे. ती काय खात नाही फक्त तेलकट जास्त आवडतं. त्याच्यामुळे जास्त मोठ्या माणसासारख खोकते आणि काय खाल्ल असेल ना. ते उलटी करून टाकते. तर ह्याचावर काय उपाय आहे. pls . मला तुमचा उपाय सांगा ना. जानकी
On 5/18/2011 4:45 PM vanita said:
मी 25 वर्षाची विवाहित स्त्री आहे माजी मासिक पाली अनियमित आहे खूप औषध घेतली परंतु काहीच उपयोग झाला नाही. तरी उपाय सुचवा. माझे वजन 74 कग आहे.माझे वजन सुद्धा कमी करायचे आहे तरी आपण उपाय सुचवा
On 1/12/2011 2:23 PM vinod tele said:
माझे वय ३० वर्षे आहे परंतु मला दाढी व मिशा येत नाहीत. योग्य सल्ला द्यावा.
On 11/12/2010 04:56 PM dipti said:
हेल्लो सर, माझे वय २५ वर्ष आहे माझे वजन खूप जास्त आहे आणि माझ्या रक्तातील हब चे प्रमाण खूप कमी आहे ते वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औसःध आणि उपाय सुचवा
On 11/29/2010 10:32 AM asif said:
maze nav asif maze kes khup galalyalal laglet tyavar upay sanga
On 3/11/2010 9:53 PM nutan said:
माझे वय ४८ वजन १०४ किलो उंची ५.३ फीत मला माजे वजन कमी करायचे आहे कृपया आपली माहिती द्या. मला उचा रक्तदाब आहे.बाकी माजे रोजचे, काम ,फिरणे योगा, अंड स्व्मिमिंग हे रोजेचे चलो आहे, सध्या मी अमेरेकेत आहे कृपाय्स आपले मार्ग्दर्शेन द्या. जेणे करून मी माजे वजन निय्त्रिअत ठावू सकेन
On 1/27/2010 12:28 PM Vijaykumar Soman said:
Me 28 yrs old aahe, mazi tabyat changli aahe pan me khup barik aahe , mhanje height aahe mazi , mhanun me khup barik vatato , hat pai ekdam kadi vat tat , krupaya mala upay suchva
On 1/25/2010 10:52 AM shilpa said:
अभग तल
On 12/27/2009 5:41 PM anand said:
मला Psoritic arthitis चा त्रास आहे. कृपया उपाय सुचवा.
On 12/25/2009 2:52 PM Vishal Kunjir said:
हेल्लो डॉक्टर तांबे सर. मी विशाल कुंजीर राहणार पुणे. माझे वय २२ वर्ष आहे. मला मागील दहा वर्षापासून सफेद डाग (कोड) आहे . तरी मी हे डाग जाण्यासाठी भरपूर औषधे उपचार केले तरीपण मला काहीच फरक पडला नाही. पण ज्या पण औशाद्याचा फरक पडला पण ते करायला मला वेळ नाही कारण औषध लाऊन उन्हामध्ये १ ते २ तास बसायला लागते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो कि मला तुम्ही एक चांगले न उन्हामध्ये बसणारे औषध सांगावे. कळावे.
On 12/19/2009 12:15 PM kiran said:
मी 24 वर्षाची विवाहित स्त्री आहे माजी मासिक पाली अनियमित आहे खूप औषध घेतली परंतु काहीच उपयोग झाला नाही. तरी उपाय सुचवा. माझे वजन 69 कग आहे.
On 12/14/2009 2:11 PM BAJRANG GALANDE said:
माझे वय ३० वर्षे आहे परंतु मला दाढी व मिशा येत नाहीत. योग्य सल्ला द्यावा.
On 11/12/2009 1:58:05 PM madhuri said:
Sir i self Madhuri. I have 19 month baby.but my delivery is seserion type. After delivery my wait is incresing 10kg.current my wait is 75 kg.Plesae give me the advice How to reduce my wait.
On 12/9/2009 3:49 PM seema said:
मी २६ वर्षाची विवाहित स्त्री आहे माजी मासिक पाली अनियमित आहे खूप ओषध घेतली परंतु कहीच उपयोग झाला नाही. दोन ते अडीच महिने ग्याप पडतो आनी गर्भधारणा होत नाही तरी उपाय सुचवा. माझे वजन ६२ कग आहे.
On 12/5/2009 6:23 PM nargis raj said:
nameste pleas start in family doctor child problems
On 12/4/2009 12:27 PM Vaishali Bharade said:
वेरी गुड article
On 12/3/2009 4:03 PM nishat m said:
my son is 4 years old , i had a sezerian , he was having problem of delayed milestones.i.g he started walking late when he was 11/2 years old, we gave him normabrain tonic , he is improving , but now he is not concentrating in studies in school . please advise to improve his brain power & concentration . is there any relation between his delayed milestone & not concentrating in studies.
On 12/2/2009 11:00 AM Pranjali said:
सर, मी तुमची नियमित वाचक आहे. सात महिन्यांपूर्वी माझी सिझेरिअन डीलीवरी झाली. माझे पोट फार सुटले आहे. पाठ पन फार दुखते. उपाय सांगा.
On 01.12.2009 20:18 kiran said:
I have a severe muscular back pain. The severity of pain is very high during the cold. Thanks to suggest me some remedy. Yours sincerely.Kiran
On 12/1/2009 1:06 AM ek aai said:
माझ्या मुलीला tonsils वर पांढरे खडे येतात. त्याच्या साठी काय करावे?
On 30/11/2009 14:20 kavita avhad said:
maze vay 25runing aahe aani unchi 162 aahe pan sadhaya maze vajan khup vadhat aahe, aata maze vajan 65.500 aahe tar please yamule mazi jadi khup vadhat aahe tar maze vajan aani jadi kami honyasathi kahi upay sanga, aapli vishavasu
On 11/29/2009 7:32 PM Niyameet Vachak said:
Hello Dr.Tambe I am regular reader of this page. I am in New York, here seasonal flu season has been started. Whenever I'll be working with my Collegeagues I'll feel cough, cold and bodypain. Doctor can you suggest me to improve my immunity with Ayurvedic Medicine and Diet. Waiting for your reply and thank you sir.
On 11/28/2009 11:49 PM yuvraj chavan said:
mazya sharirat rakt kami aahe tari rakt vadhi sathi upay sanga mala vitamin baddal mahiti havi aahe plz
On 11/27/2009 11:32 PM sandesh said:
नमस्कार मला सर्दी आणि खोकल्यावर काही घरगुती उपाई सांगता येईल का ? raktatil plet लेट्स कमी होण्याचे कran काय असते आणि त्यासाठी काय काळजी ghyawi lagte
On 27-11-2009 18:43:15 sarita said:
माझा मुलगा १० महिन्याचा आहे,तो खाताना खूप त्रास देतो ,कमी खातो असे मला वाटते,आणि सारखे दुध मांगतो,रात्री पण खूप वेळा उठतो ,त्याला शांत झोप नाही , please kahi upay sanga ani me tyala dudh pajane kadhi pasun band karne yogya hoil te hi sanga
On 11/27/2009 2:47 PM Santosh Joshi Pune said:
I am facing muscular pain (Back pain) Request for your perment diagonalysis Yours Truly, Santosh Joshi (Head -Business Development) FLASH ELECTRONICS (I) PVT LTD.-CHAKAN,PUNE (INDIA) A-4 MIDC. Chakan Industrial Area, Mahalunge Chakan,Pune-410501 (Maharashtra-India) |(Dir Tel No:+91-2135-666167|Fax No: +91-2135-666109 |Cell No :+91-9623449013 | E mail: sj.mktg@flashgroup.in /flash@flashgroup.in|Website :www.flashgroup.in|
On 11/27/2009 2:44 PM PIYUSHA said:
नमस्ते मला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काही खात्रीपूर्वक उपाय सांगू शकाल का मी असे ऐकले आहे कि आपली रोगप्रतिकारशक्ती जेवढी तेवढा आपण आजारापासून दूर राहतो माझा लहान भाऊ डेंगू ने आजारी होता आणि तो आता पूर्ण बरा आहे पण पुन्हा परवा तो आजारी पडला त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढली तर तो सारखा आजारी पडणार नाही कृपया मार्गदर्शन करा
On 27-11-2009 13:57:48 SONALI said:
मला ५ महिन्य्नाची मुलगी आहे. ती जन्मल्या पासूनच जरा जास्त रडायची पण ४ महिन्यांची झाल्या पासून कमी रडते मात्र आता ती सारखी प्यायला मागते मी जोब करते ती हल्ली आजकाल ती फारशी झोपत नाही दिवसा तर अजिबात नाही फार तर फार १ तास शिवाय रात्री झोपेत कुरकुरही करते यावर मला उपाय सांगा मी प्रेग्नंट असताना गर्भसंस्कार पुस्तक वाचले जमेल तेवढे अनुकरण केले पण कामाला असल्या कारणाने सर्वे जमले नाही तरी माझे मुल हुशार आणि बुद्धिवान ( स्मरणशक्ती वाढण्या साठी ) होण्या साठी मी काय करावे हे सांगावे. आपली विश्वासू
On 11/27/2009 10:02 AM ashwini said:
mi saddhya garodar aahe.apan jo vichar karato,je kahi changala waait baghato tyacha garbhawar konatya mahinyapasun parinam hoto?krupaya sangawe.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: