Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

लोभस, नाजुक श्‍वानांनी नाशिककरांना जिंकले
-
Sunday, November 29, 2009 AT 08:44 AM (IST)

प्रिती बाजपेयी

नाशिक - जगभर नावाजलेल्या, प्राणीमीत्रांची मने जिंकलेल्या देशभरातील तीनशेहून अधिक स्वानप्रेमींचा मेळा राष्ट्रीय डॉग शो च्या निमित्ताने आज येथे भरला. यावेळी लांबलचक केसांनी झाकलेल्यांपासून तर अगदी पर्समध्ये ठेउन हवे तीथे नेता येणाऱ्या लोभस, नाजुकपणापासून तर ज्याच्या गुरगुरण्याने काळजाचा थरकाप उडावा अशा ग्रेट डेनपर्यंतच्या स्वानलीलांनी अवघ्या नाशिककरांची मने आज जिंकली. शहरात सतरा वर्षांनी झालेल्या स्पर्धांसाठी आतरराष्ट्रीय परिक्षक आले आहेत.

मुंबई केनेन क्‍लबतर्फे ब्ल्यू क्रॉस सोसायटी आणि दि केनीन सोसायटी ऑफ नाशिकच्या सहकार्याने येथील बाईज टाउन शाळेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धांतील स्वानांचे सौदर्य, दातांची स्वच्छता, कानांची ठेवन, नखे, उठ-बस करण्याची पध्दत, धावने, आज्ञापालन यांपासून तर रुबाब आणि पदलालित्य अशा विविध निकषांनुसार दोन गटांत या स्पर्धा झाल्या. त्यासाठी देशभरातील तीसहून अधिक जातीचे श्‍वान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. सिल्की टेरीअर, मिनीएचर पिन्श्‍चर, पेलकिंगस, पामेरिअन, पग अशा लहान मात्र लोभस दिसणारे विविध स्वांनानी जेव्हा लाल पायघड्यांवर कॅटवॉक केले तेव्हा त्यांच्या पालक, मालक ामि सोबत आलेल्या चिल्यापिलांचा आनंद गगनात मावेनाशा झाला होता. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यांचा गलका झाला.

नाशिकचा ब्ल्यू टेरीयन हा रुबाबदार श्‍वान आणि बर्फाळ प्रदेशातील सायबेरीयन ईस्की या नव्या ब्रीडचे स्वान सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र होते. बेसेट हाऊंड, ग्रेट डेन, बुल टेरर, आयरीश सेटर, सोनेरी रॉट व्हेलर, लॅबरॉडॉर, डॉबरमॅन, मॅस्टीफ, नेपोलीयन मॅस्टीफ, बरनार्ड, सायबेरीयन हुस्की, जर्मन शेफर्ड, शेटल्रंड शीप डॉग (मेंढपाळांचा स्वान) असे विविध स्वान या स्पर्धात सहभागी झाले. त्यांची प्रशिक्षक आणि पालक दोघांनीही त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. भारतीय केनन क्‍लबने निश्‍चित केलेल्या गटांत रिंग ग्रीन आणि रिंग रेड सा दोन विभागांत आज स्पर्धा झाल्या. सातारा, मुंबई, कोल्हापूर, सोलापुर, बंगलुर, त्रिवेंद्रम, हैद्राबाद, पुणे यांसह विविध शहरांतून नागरीक त्यात सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे डेव्हीड स्ट्रॅचन आणि फिलीपीन्सचे केवेन हॅरीस यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. संयोजन समितीचे प्रमुख अनिल पाटील, प्रीतम चव्हाण, चेतन साबळे, मिलींद राजहंस, योगेश चौधरी आदींनी स्पर्धेचे आयोजन केले.

तीन हजार श्‍वानांचे निर्बीजीकरण
ब्ल्यू क्रॉस सोसायटी या प्राणीमीत्रांच्या संघटनेने श्‍वानप्रेमींसाठी विविध सुविधा, सूचना व मार्गदर्शनाची सोय केली आहे. गेल्या दोन वर्षात संस्थेच्या प्रयत्नाने महापालिकेमार्फत तीन हजार श्‍वांनांचे निर्बीजीकरण झाले आहे. ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणात बैल, गोड्यांच्या शर्यती होतात. प्राण्यांची पिळवणूक त्यातून होत असल्याने त्या रोखण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पोलिसांचे पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची खंत योगेश चौधरी यांनी व्यक्त केली.आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: