Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

प्रेम हे प्रेम असतं... (तो आणि ती)
विजय लाड (vijay.lad@esakal.com)
Tuesday, September 28, 2010 AT 09:00 AM (IST)

नचिकेतकडून प्रपोजचं धाडस होत नव्हतं. मिथिलानं त्याचा तोकडा आत्मविश्‍वास वाढविला. त्याला प्रोत्साहित केलं. हीच खरी परीक्षेची वेळ आहे, हे मनापासून पटवून दिलं. पण प्रपोज करण्याआधीच नचिकेतच्या प्रेमाची राखरांगोळी झाली. नचिकेतला व्यक्त होण्याची साधी संधीही मिळाली नाही. आशयनं आधीच ऋतूजाला प्रपोज केलं होतं आणि तिनंही ते प्रेम हसतहसत स्वीकारलं होतं. या आकस्मिक घडामोडीनंतर नचिकेत भावनिक कोसळला. जीवनाच्या वाटचालीत अडखळला, पुरता रुतून पडला. त्याला भक्कम आधाराची गरज होती. हा आधार फक्त आणि फक्त मिथिलाच देऊ शकत होती. बघुया पुढे काय झालंय ते...

कॅम्पातली पार्टी संपल्यावर सगळे घरी पांगले. मिथिलाही घरी परतली. तिनं आपल्या स्वतंत्र खोलीतील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तूंची आवरासावर सुरू केली. पण एक विचार अजूनही मनाला डिंकासारखा चिकटला होता. नचिकेत कसा असेल...! तो घरी तर नीट गेला असेल ना...! कदाचित त्याच्या खोलीत रडत बसला असेल...! किंवा उदास मनाने झोपी गेला असेल...! आशयनं ऋतूजाला प्रपोज केलं आणि तिनंही त्याचं प्रेम स्वीकारलं, हे कळाल्यावर त्याच्या चेहरा कसा कोमेजून गेला होता... फुलण्याआधीच तोडलेल्या गुलाबासारखा... त्याचं आभाळाएवढं व्यापलेलं दुःख समजत होतं. पण इतरांसमोर काही बोलणं, त्याला समजावणं समंजसपणाचं वाटलं नसतं.

"नचिकेतनं ऋतूजावर मनापासून प्रेम केलं. पण त्याला व्यक्त होता येत नव्हतं. कदाचित तो कधी व्यक्तही झाला नसता. मनातलं प्रेम मनातच राहिलं असतं. एकाअर्थी ते बरं झालं असतं. त्याच्या पदरी निराशा तर आली नसती. प्रेमाच्या स्वप्नरंजनात व्यत्यय तर आला नसता. पण मी त्याला प्रपोजसाठी तयार केलं. त्याची मनधरणी केली. त्याच्या मनात खोट्या अपेक्षा जागवल्या. मृगजळ दाखविलं. त्यानंही माझ्यावर असलेल्या विश्‍वासापायी पुढाकार घेतला. पण शेवटी व्हायचं तेच झालं... मला नचिकेतला दुखवायचं नव्हतं. माझा तसा मुळीच उद्देश नव्हता. माझंही त्याच्यावर प्रेम आहे. खरं प्रेम... किमान त्याला त्याचं प्रेम मिळावं हाच माझा सात्त्विक उद्देश होता. पण आमचा प्लॅन आमच्यावरच उलटला,'' कपड्यांच्या घड्या करताना मिथिला उदास दिसत होती. चेहरा भावहीन होता. मनाला सारखी नचिकेतची चिंता लागून राहिली होती.

मिथिलानं शेजारी टेबलावर पडलेला मोबाईल उचलला. तब्बल आठव्यांदा ती नचिकेतला फोन करीत होती. पण पलीकडून काही रिप्लाय मिळत नव्हता. प्रारंभी किमान रिंग तरी जात होती. आता तर त्यानं मोबाईल स्वीच ऑफ केला होता. फोन करणं निष्फळ होतं. तिनं नचिकेतला एसएमएस केला. उद्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भेटायला ये, असं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू होण्याआधीच दोघे कॅन्टीनमध्ये आले. नचिकेतचा चेहरा पुरता पडला होता. डोळे अगदी विस्तवासारखे लालभडक दिसत होते. डोक्‍याचे केस गवताच्या पात्यांप्रमाणे उभे होते, एकमेकांत गुंतून पडले होते. कपड्यांची दशा झाली होती. तो रात्रभर विचार करीत बसला होता, क्षणभरही झोपला नव्हता, हे त्याच्याकडे बघितल्याबरोबर मिथिलाला जाणवलं. तिनं वातावरणातील शांतता छेदण्यासाठी कॉफी ऑर्डर केली. तो काही न बोलता खाली मान घालून पुतळ्यासारखा ध्यानस्थ झाला होता. तिनंही काही क्षण पेशंस राखला. थोड्या वेळात वाफाळणारी कॉफी आली. दोघांनी कॉफी रिचवल्यावर मिथिला बोलती झाली.

"जाऊ दे रे नचिकेत... एवढा काय विचार करतोस. डोक्‍याला विचारांचं बेंड यायचं... विचार करून करून... जे व्हायचं होतं ते झालं... आता पुढचा विचार कर... पुन्हा एखादी छानशी मुलगी मिळेल. आणि आताच काय घाई झालीये प्रेमाची. आपण एन्गेज नसलेलेच बरं. एन्जॉय बॅचलर लाइफ यार... हाऊ थिंग्ज वर्क्‍स... उलट तू प्रपोज करण्याआधीच तुला खरी परिस्थिती कळाल्यानं किमान नामुष्की टळली ना रे मित्रा... असं काय करतोस...'' मिथिला समजवण्याच्या सुरात बोलत होती.

"तुला माझं दुःख कळणार नाही..., तुला नाकारलं जाणं म्हणजे काय हेच माहीत नाही... असंही म्हणता येत नाही. मीच तुला मनापासून दुखावलं आहे. तुझ्या भावनांचा, निःस्वार्थ प्रेमाचा जराही विचार न करता... तू माझं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी स्वतः जळत राहिली. एखाद्या दिव्याप्रमाणं... माझं प्रेम मला मिळवून देण्यासाठी अपमानाचे कडवट घोट सोसत राहिली. आणि त्याची मला जराही जाणीव होऊ दिली नाहीस. तू माझी खरी मैत्रीण आहेस,'' नचिकेतला कंठ फुटला.

"अरे पण...''
"एक मिनीट मिथिला... मला आज बोलू दे... प्लीज... सॉरी यार... पण मला बोलायचंय... प्लीज... मिथिला माझ्या हट्टापायी मी माझं प्रेम गमवलंय. मी प्रपोज करायला विलंब केला, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण ऋतूजाच्या मनात जर माझ्याविषयी प्रेम नसेल, तर मी आधी प्रपोज करूनही काही उपयोग नव्हता. तिचा तेव्हाही नकारच राहिला असता. असो... तो विषय संपला आता...'' एक अवंढा गिळून तो पुन्हा बोलायला लागला.

"मिथिला मी माझं प्रेम गमावलंय. कायमचं. आता मला माझी मैत्रीण गमवायची नाहीये... तू खूप छान आहेस. माझ्यावर मनापासून प्रेम करतेस. माझी काळजी घेतेस. मला कायम मदत करतेस. काय हवं नको, ते बघतेस. तू खरंच ग्रेट आहेस... मिथिला प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. पण मला आता तुझं प्रेमही हवंय... एका प्रेयसीच्या रूपानं माझ्या आयुष्यात प्रवेश कर... कधीही न संपणाऱ्या झऱ्याप्रमाणे असलेलं तुझं निष्पाप, निर्मळ प्रेम मला अनुभवू दे... माझं आयुष्य सुकर, सुखमय आणि सदाहरित कर... प्लीज मला समजून घे... प्लीज...'' नचिकेत आर्जव करीत होता.

पण त्याच्या बोलण्यानं मिथिला कोड्यात पडली. त्याला काय उत्तर द्यावं, तेच तिला समजत नव्हतं. त्याला नाकारल्याचं दुःख झालं असेल म्हणून समजवण्यासाठी तिनं त्याला कॅन्टीनमध्ये बोलविलं होतं. पण तो तर प्रपोजची भाषा करीत होता. एक मन म्हणत होतं की लागलीच त्याला "हो' म्हणावं. आपलं प्रेम आपल्यापर्यंत चालून आलंय. ते कसं काय सोडायचं. तर दुसरं मन गोंधळलेलं होतं. कारण मिथिला नचिकेतचं प्रेम नव्हती. कोणता निर्णय घ्यायचा तेच समजत नव्हतं. अगदी द्विधा मनःस्थिती झाली.

"हे बघ मिथिला... नाही म्हणू नकोस... आणि माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थही काढू नकोस... मी डॅम सिरिअस आहे... मी काल रात्रभर विचार करीत होतो. प्रेम गमावण्याचं दुःख काय असतं, ते मला काल समजलं. मला माहीत आहे, मी थोडी घाई करतोय. पण माझा नाइलाज आहे. प्लीज मला समजून घे... मी तुला गमवू शकत नाही... आपली मैत्री कायम टिकून राहील, मी तुझी आयुष्यभर मैत्रीण राहील वगैरे वगैरे सगळं समजतं मला... पण तू एखाद्या दुसऱ्या मुलाचं प्रेम स्वीकारलस, तर आपल्या मैत्रीला ग्रहण लागेल, हेही तेवढंच खरं आहे... त्यामुळे प्लीज अशी पळवाट काढू नकोस. मी पूर्ण विचार करून बोलतोय. माझं बोलणं अर्थहीन नाही...'' नचिकेत आपल्या विचारांवर ठाम होता.

"अरे नचिकेत... मला समजतं रे... पण आता चटकन "हो' म्हणावं, या परिस्थितीत नाही रे मी... तुझा नकार मी एक्‍सेप्ट केला. माझ्या पडझडणाऱ्या मनाला समजावलं. बजावलं. आता पुन्हा परतीची वाट पकडणं वाटतं तेवढं सोपं नाही रे... आणि मला ठाऊक आहे की तुझं माझ्यावर प्रेम नाही... केवळ एक चांगली मैत्रीण गमवायची भीती वाटत असल्यानं तू मला प्रेमासाठी पसंती दर्शवीत आहेस... अरे मित्रा ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नाही, त्याला होकार देणं हे कितीसं योग्य आहे? पुढे भविष्यात मला तुझं मनापासून प्रेम मिळेल हे कशावरून तू गृहीत धरतोस... जिथे प्रेमाचा अंकुरच फुललेला नाही... तिथे जबरदस्तीनं कसं काय प्रेमाचं रोपटं तग धरेल... थोडा विचार कर माझा... माझ्या आयुष्याचा...'' मिथिलानं मनातली शंका बोलून दाखविली.

"मिथिला प्लीज हं... असं काहीवाही बोलू नकोस... अगं ओळख, मैत्री आणि प्रेम, हीच प्रेमाची क्रमवारी आहेना... मग सध्या आपली मैत्री आहे... हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात होईल. तू विश्‍वास ठेव... तुझ्या मनात निष्कारण शंका उफाळत आहेत,'' नचिकेत हट्टाला पेटला होता. पण मिथिला काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिनं विचार करण्यासाठी वेळ मागितला. कारण तिला घाईत निर्णय घ्यायचा नव्हता...
(क्रमशः)
-----------
भाग चार - नचिकेतचे प्रपोजचे धाडस (तो आणि ती)
भाग तीन - प्रपोजला उत्तर प्रपोजने (तो आणि ती)
भाग दोन - पहिला प्रपोज मिथिलाचा (तो आणि ती)
भाग एक - 'कॅम्पस इंटरव्हू'चा धडाका (तो आणि ती)
----------
(या लेखाच्या लेखकाशी तुम्हाला संवाद साधायचा असेल किंवा आपल्या समस्या मांडायच्या असतील, तर तुम्ही  vijay.lad@esakal.com या इ-मेल आयडीवर इ-मेल पाठवू शकता. तुमच्या मतावर योग्य ती प्रतिक्रिया पाठविली जाईल. धन्यवाद.)
प्रतिक्रिया
On 01/03/2011 06:29 PM saurabh said:
hushar ahe mithila....
On 23/02/2011 03:28 PM Akshay said:
मला ही प्रेम कथा खूपच अवडली .कारण यातले काही प्रसग माझ्या बरोबर घडलेले आहेत. I Love store.
On 20/02/2011 08:16 AM swapnil kamble said:
ही खूपच छान कथा आहे... आयुष्यातील जुन्या आठवणीna उजाळा milala पण प्रत्येकाला आयुष्यात खर प्रेम मिळत नाही. मी पण एकटीला propose केलेलं पण तीन माझ प्रेम समजून न घेताच मैत्रिणीच्या सागण्यावरून नकार दिला. जर Mithila खरोकर जर नचिकेत वर प्रेम करत असेल तर तीन नचिकेतच प्रेम स्वीकारलं पाहिजे.
On 27/01/2011 07:02 PM manohar said:
Todays LOVE is FAST FOOD
On 05/01/2011 10:37 PM manohar said:
कॉलेजचे दिवस आठवतायेत... खूपच छान... पहिले प्रेम पहिली आठवण.... पहिलेच घरटे पहिलेच आंगण...
On 05/01/2011 10:36 PM manohar said:
मला फार आवडली
On 05/01/2011 10:35 PM kadam said:
very nice
On 13/12/2010 01:16 PM swapnil said:
एवढं लिहायला वेळ कसा काय मिळतो बाबा. मला तर वाचायला पण वेळ नाहीये
On 23/11/2010 04:01 PM Bhagwat said:
प्रेम खाल्ले तर पोट भरणार नाहीये नि करिअर वर ध्यान द्या. करिअर चांगले झाले तर प्रेम पण मिळेल नि ते टिकेल कारण जिच्यावर पेम करणार तर तिच्या दैनंदिन गरजा भागवण्याची टाकत पण आली पाहिजे ती शिक्षणाने येते . बापाच्या पैशावर मुलीना कॅन्टीन पर्येंत फिरवणे ठीक आहे पण आयुष्य भर खुश नि सुखी ठेवायेचे असेल तर अभ्यास आधी कारण आजच्या स्पर्धेत जो शिकेल तोच टिकेल नि आजकालच्या मुली हुशार आहेत त्या लग्न करताना मित्र नाही तर किती कमावणारा नि पुडे त्याचे फुचार कसे असेल हे सर्व बघून लग्न करतात. जरा जमिनीवर पाय as
On 14/11/2010 07:44 AM काळे एम. एच. said:
झालका एवढंच; हे तर काहीच नाही ;पुढे काय ???
On 11/11/2010 12:06 PM Datta said:
This is very nice love story, i like this story.
On 01/11/2010 02:40 PM Rupali said:
मला फार आवडली. आपण प्रेम करावे पण बगून
On 01/11/2010 02:32 PM Rupali said:
very nice thanks alot
On 01/11/2010 09:43 AM keshwar sanjay said:
मला पण अशीच एक चागंली मिळावे
On 30/10/2010 11:35 AM Manjusha said:
Story is good.Mithila is matured girl.
On 27/10/2010 03:58 PM PETER.PAGARE. said:
मिथिला तुजा निर्णय तू जो घेशील तो नक्कीच योग्य आहे. नचिकेतला जरी तो निर्णय आता योग्य वाटला नाही तरी योग्यविचारांती त्याला तुजा निर्णय निश्चित पटेल. तुमची मैत्री अशीच फुलो फलो.
On 23/10/2010 01:18 PM Swati said:
त्याची जर खरी मैत्री असेल तर तिने त्याला स्वीकारायला हरकत नाही. कारण तिने मैत्री केली तर तिला त्याचा स्वभाव माहितीच असेल न कि तो स्वार्थी आहे कि खरच तिला प्रेम देवू शकतो?
On 23/10/2010 07:44 AM PREM said:
VERY NICE
On 21/10/2010 08:15 PM sudhir kapare said:
maitrinch आपली changali priyasi hovu शकते
On 20/10/2010 01:15 PM sunil said:
मला मनापासून आवडले हे दोगे कारण हे सर्व गोष्टी विचार करून करतात ..... असाच जर सर्व जन वागले तर सर्वांचे बाले होईल
On 15/10/2010 09:30 PM sandhayarani said:
कॉलेजचे दिवस आठवतात पहिले प्रेम पहिली आठवण....
On 15/10/2010 09:02 PM arati said:
हाहाहाहा , काय पण विनोद आहे.इतक्या लवकर नचिकेत भावानंतर कसे काय करू शकतो ? वेळ मारून नेण्यासाठी माथिली त्याला शब्दांचा आधार घेवून फुंकर मारत असेल... पण तिने वेळ मागितली हे ठीक आहे आणि योग्य आहे.भावना दुखावल्यामुळे नचिकेत विरह टाळण्यासाठी ,स्वतावरch इर्षा करत mathilichya bhavanashi kheltoy karan ती एक निरागस मुलगी आहे.......
On 15/10/2010 08:56 AM gopal koli said:
ये दोस्त तुजे कसे स्वागत करावे ते मलाच समजत नाही खूपच छान..वेरी गुड ..
On 14/10/2010 02:29 PM Tukaram Patil said:
एकदम झकास..........
On 14/10/2010 02:22 PM nitin selukar said:
अमेझिंग स्टोरी. i like it.i Realy impress about this stoery.
On 14/10/2010 09:21 AM prasad dinkar said:
ज्यांनी ज्यांनी बकवास आहे असे म्हणाले आहेत ते वाचक नाहीत ..... विजय सर मस्त अगदी आपल्या भाषेत म्हणायचे तर एक नंबर ....
On 14/10/2010 09:15 AM Pruthviraj said:
majhya dolyat pani aala
On 13/10/2010 08:30 AM ganesh gaikwad said:
it is very best story ..plese completed this story fastelly bcz i am interested to know about this story...Thank you..
On 11/10/2010 09:46 PM Nayan,Rasayani said:
खूप सुंदर आहे............................
On 11/10/2010 12:09 PM MANGESH said:
खूप छान आहे स्टोरी.... प्रेम म्हणजे मैत्री नाही रे प्रेमा पेक्षा मैर्ती चांगली असते सुखात दुखत सात देणारी असते प्रेम म्हणजे प्रेम
On 11/10/2010 11:02 AM Ganesh gaikwads said:
खूप सुंदर ..........
On 10/10/2010 08:00 PM ajinkya said:
खूपच छान
On 09/10/2010 01:56 PM Ravikiran said:
very nice story.......... I think, mithila ne khup vichar karun decision ghetla pahije. Mala ase vatte ki tu Nachiket che propose reject kar, ka koni jane jar kadi Aashy & Rutuja che brake-up zale n Rutuja n Nachiket parat javal aale tar............................???????????????
On 07/10/2010 09:32 PM pritee said:
Khupach chan story ahe avadli... anek vela as hot.
On 07/10/2010 03:16 PM Dilip kanchan said:
नचिकेत चालू माणूस आहे कृपया त्याच्या प्रेमात पडू नये.
On 06/10/2010 09:49 PM vicky said:
i like it
On 06/10/2010 12:06 AM shrikant said:
हे प्रेम नाही हि स्वार्थी भावना आहे. मला माहितेय जेवा आपल प्रेम नाकारलं जात तेवा आधारसती आपण काहीही स्वीकारायल तयार असतो. नचिकेत खूप स्वार्थी आहे. पण एक अजून मितीला तू प्रेम स्वीकारायला हव कारण इथून पुढे नचिकेत काय करेल याचा खही भरवसा नाही मला वाटत तू प्रेम स्वीकार. कारण त्याला आता कलाल कि प्रेम काय असत. पूर्ण आयुष्यात तो तुला खाडीही धुकी करणार नाही.
On 05/10/2010 04:15 PM apek said:
खूप छान आहे स्टोरी ... मला असे वाटते कि मिथिला ने पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा ... कारण प्रत्येक वेळी मैत्रीचे प्रेमात रुपांतर होईलच असे नाही आहे ... जर तिने नचिकेत ला हो म्हंटले आणि जर तो पुढे जाऊन तिला खरे प्रेम नाही देवू शकला तर दोघांचे पण आयुष्य उध्वस्त होईल....
On 05-10-2010 03:48 PM sanjay said:
nice
On 05/10/2010 03:44 PM Jay gokhale said:
प्रेम वगैरे काही नसते उगाच तरुणांना अशी काल्पनिक कथा लिहून भावनिक करू नका, अश्यानेच तर तरुणायीची वाट लागते. आईवडील भाऊ-बहिण जे प्रेम करतात लहानपनापासून त्याच्या कथा लिहा मंजे तरुणांना आयुष्याची वाट शोधतांना मदत होयील. नाहीतर हल्ली तरुण जवाबदारी विसरून प्रेमाच्या खायीत स्वताला झोकून देतो आणि बरबाद होतो. आईवडिलांच्या आशेवर पाणीच पाणी आणि स्वताचे आयुष्य अगदी खोल पाण्यात. बघा पटते का ते?
On 05/10/2010 03:38 PM Janavi said:
I think Mithila should accept Nachiket's praposal because he is her good friend, it is better to say Yes to Nachiket because she loves him and it is quite impossibe for any girl to forget her first love. Even after marriage she gets husband who has his girlfriend then she can't complain him. Then it is better to accept Nachiket, to whom she knows very well....It is always better to have your first love with you rather than remember it when somebody tells you their lovestories....
On 05/10/2010 03:12 PM amit said:
खूप छान आहे स्टोरी..............................................
On 05/10/2010 01:31 PM ganesh said:
इतके वाचायला वेळ नाही
On 05/10/2010 09:05 AM krishnakant s ambolkar said:
मिथिला तुजा निर्णय तू जो घेशील तो नक्कीच योग्य आहे. नचिकेतला जरी तो निर्णय आता योग्य वाटला नाही तरी योग्यविचारांती त्याला तुजा निर्णय निश्चित पटेल. तुमची मैत्री अशीच फुलो फलो.
On 04/10/2010 10:46 PM Mahesh kumbhar said:
Khupch interesting story ahe .............................. I like it
On 04/10/2010 09:42 PM Gitanjali said:
स्टोरी खूप छान आहे ..............अगदी मनाला स्पर्शून जाते........... nachiket khupach bhitra aahe.........
On 04/10/2010 07:02 PM prachi said:
पुढे काय झाले ?
On 04/10/2010 06:35 PM Yogita said:
Nice...........Finally Mithila got her 1st love
On 04/10/2010 06:01 PM Hemlata said:
मला वाटते कि, हि स्टोरी खूप कॉमन आहे :( असे प्रेम आपण सिरिअल्स आणि movies मध्ये रोज पाहतो. पण हो, तुमच्या लेखन कौशल्याचा तितकाच स्वागत आणि आदर ही करते. आणि एक सुचावावसे वाटते की, स्वप्नांच्या पलीकडे जाऊन जे शेकडो मुलां-मुलींशी खेळला जाणारा खेळ म्हणजेच त्याचेही वास्तवदर्शन केल्यास अधिक उपयुक्त ठरेल. (कारण आज अनेकजण रिअल प्रेमापेक्षा हेच जास्त अनुभवत आहे.) धन्यवाद.
On 04/10/2010 03:52 PM Mayurt Mahajan said:
प्रेम खरच खूप छान असते, पण ते खर असले पाहिजे..... पण आज काल चे मुल मुली फक्त timepass म्हणून प्रेम करतात, आणि बहुतेकदा मुली खर्या प्रेमापासून वंचित राहतात.... मुलीनो please हो म्हन्या आधी मुलाची सगळी माहिती घ्या.... हा तुम्यचा आयुष्याचा प्रश्ण असतो... ज्यामुळे तुमचे चांगलेही होवू शकते आणि vaaiet hi........Be Care
On 04/10/2010 03:04 PM aniket said:
माझ्या बाबतीत पण असेच झाले.पण मी माझ्या प्रेयसीला propose नाही करू शकलो.कारण मी propose करायला खूप उशीर केला होता.ती दुसर्याची झाली होती.या वरून eak समजले कि इक मुलगा आणि मुलगी इक्मेकांच्या प्रेमात पडले कि तो मुलगा किवां मुलगी दुसराच्या प्रेमात नाही पडू शकत.तो मुलगा निर्व्यसनी,चांगला,सांभाळणारा,तिच्या वर जीवापाड प्रेम करणारा असला तरी सुधा.पण पहिला मुलगा व्यसनी असला तरी ती मुलगी त्यला accept कसे करते कोणास ठावूक?मितीला तू खूप मनाला तयार केले पण नचिकेत यार मुली ला दुखावणे खूप वाईट यार.अशी चूक नको
On 04/10/2010 11:07 AM shekhar sarode said:
मिठीलाने विचार करूनच निर्णय घ्यावा अस मला वाटत, कारण नचिकेत पुन्हा खर प्रेम करेल कि नाही तिच्यावर सांगू शकत नाही भविष्यात मिठीलाला त्याच्याकडून खर प्रेम मिळेल कि नाही सांगू शकत नाही कारण त्याच आधी ऋतुजा वर प्रेम होत. पण खर प्रेम हे कस असत हे त्यालाही चांगलच कलाल असेल पण ते त्याला मिळू शकाल नाही ह्याच खूप वाईत वाटत, आणि ते पुन्हा होईल पण त्यात तो रस नसेल
On 04/10/2010 10:31 AM MAYU said:
खरच छान आहे story
On 04/10/2010 10:29 AM MAYU said:
खरच छान आहे story
On 04/10/2010 10:29 AM MAYU said:
खरच छान आहे story
On 04-10-2010 10:08 AM Deepak32 said:
खूप छान ................!!!!!!!
On 03/10/2010 09:06 PM Pravin Shinde said:
खूपच छान........
On 03/10/2010 04:58 PM vasant said:
mujhe accha laga
On 03/10/2010 04:27 PM mehul said:
सई
On 03-10-2010 12:11 PM asha` said:
@PRASHANT TORASKAR ये बाबा इतकं मोठ्ठं काही लिहित जाऊ नकोस...bore होईल..
On 03/10/2010 11:03 AM jenny n ruby said:
dont say S 2 Nachiket , let him miss you .
On 03/10/2010 09:00 AM PRASHANT TORASKAR said:
मिथिला त्याला हा बोलाव कारण प्रेमात घेण्यापेक्षा देन महत्वाच असत आपल्या प्रेमासाठी जीवनाचा तयाग करणारे खूप कमी असतात कारण जयावेळेस ऋतूजा त्याला नाही म्हाणाली त्या वेळेस त्याला समजल कि नाही बोलायावर किती वाईट वाटत तेव्हा त्याने मिथिलाचा विचार केला कि ती माझ्यावर किती दिवसा पासून प्रेम करते त्यामुळे तिने त्याला प्रपोज केला आणि प्रेमात व युद्धात सगळ क्षमा असता एक मस्तानी संपूर्ण पेशवाई संपवू सकते तर एक मिथिला एका नचिकेतला का नाही बदलू शकत त्याकरता तिने त्याला हा बोलाव
On 02/10/2010 07:30 PM Jitu (jitu.choice@rediffmail.com) said:
मिथिला ने नचिकेत ला नाही म्हणावे , कारण शेवटी त्याचे प्रेम तर तिच्या वर नाहीच, त्या पेक्षा जो तिच्या वर प्रेम करेल त्याच्या शी लग्न करावे. नचिकेत ला आत्ता आधार पाहिजे म्हणून तो तिला प्रोपोज करत आहे. नचिकेत स्वार्थी आहे.
On 02/10/2010 02:05 PM Prachi P said:
नचिकेतचा चेहरा पुरता पडला होता. डोळे अगदी विस्तवासारखे लालभडक दिसत होते. डोक्‍याचे केस गवताच्या पात्यांप्रमाणे उभे होते, एकमेकांत गुंतून पडले होते. कपड्यांची दशा झाली होती>>>> छी, ......कोणालातरी आंघोळ करण्याची गरज आहे,
On 02/10/2010 11:40 AM tanishka said:
कथा खूपचं सुंदर रंगवली आहे.पाहू पुढे काय होतेय?प्रेम आणि भावनांचा खेळ.
On 02-10-2010 10:00 AM Rohini Lokhande said:
मी खूप आतुरतेने पुढ्च्य भागाची वाट बघत आहे मला हि प्रेम कथा खूप आवडली. मला पाहिलं प्रेम काय असत हे मला माहित नाही कारण प्रेमात कधी पाहिलं-दुसर नसत प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचा आमच सेम असत. कुणाच कमी ना कुणाच जास्त असत, प्रेमाचा तराजूत दोन्ही परडीत सेम असत. प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत. मला जाणून घ्यायचं आहे कि मिथिला निचीकेत ला स्वीकार करते कि नाही, निचीकेतच मिथिला वर खरच प्रेम आहे कि त्याला तिची फक्त गरज आहे,
On 01/10/2010 09:23 PM prashant jagtap,,,,,,,,,,,,,, said:
पाहिलं प्रेम जो करतो त्यालाच माहित आस्ते ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,मला एंड कसा होतो पाहिच आहे ,
On 01/10/2010 07:53 PM SanjuG said:
काट्यावर एकदा फूल उमलल ,जगावेगळ विपरीत घडल, भुलून गंधाला अन रंगाला त्या ,वेड मन त्याच्यात गुंतलं...! खूप मनाला मी समजावलं, सत्य नव्हे तू स्वप्न पाहिलं, तरीही अधिर मन माझ, फुलासाठी पुढेच सरसावल..! शेवटी व्हायच तेच झाल,काट्यान आपल काम केल, स्पर्शाने त्या काटेरी ,नाजूक मन मात्र रक्ताळल...! नंतर मन सैरभैर झाल , अश्रूंच्या आश्रयाला गेल, त्यांनीही आधार देण्याऐवजी, जखमांवर त्याच्या मीठ चोळल..! अखेर मन शांत झाल, अश्रूनाच त्यान आपलस केल, अन मायेच्या एका स्पर्शासाठी, क्षणाक्षणाला झुरत राहील.!
On 01/10/2010 07:51 PM SanjuG said:
काट्यावर एकदा फूल उमलल ,जगावेगळ विपरीत घडल, भुलून गंधाला अन रंगाला त्या ,वेड मन त्याच्यात गुंतलं...! खूप मनाला मी समजावलं, सत्य नव्हे तू स्वप्न पाहिलं, तरीही अधिर मन माझ, फुलासाठी पुढेच सरसावल..! शेवटी व्हायच तेच झाल,काट्यान आपल काम केल, स्पर्शाने त्या काटेरी ,नाजूक मन मात्र रक्ताळल...! नंतर मन सैरभैर झाल , अश्रूंच्या आश्रयाला गेल, त्यांनीही आधार देण्याऐवजी, जखमांवर त्याच्या मीठ चोळल..! अखेर मन शांत झाल, अश्रूनाच त्यान आपलस केल, अन मायेच्या एका स्पर्शासाठी, क्षणाक्षणाला झुरत राहील.!
On 01/10/2010 06:20 PM Amey said:
खूपच छान विजय! मिथिलाच पात्र खूपच छान रंगवलं. किती गंभीर आणि खोलवर विचार करते ही मुलगी. पुढचा वाचयला नक्कीच आवडेल.
On 01/10/2010 04:21 AM Sachin m said:
लेख वाचताना छान वाटले... पण सगळ्या प्रतिक्रिया वाचताना सोलिड मजा आली... चालुद्या मित्रानो.....
On 01/10/2010 03:10 AM friend said:
पाहिलं प्रेम हे करूनच kalat
On 30/09/2010 10:30 PM laxman said:
फारच छान ,मला वाटते कि आणखी एक पात्र सामील कराव हि लेखकास नम्र विनंती आपला शुभ चिंतक
On 30/09/2010 03:58 PM shekhar said:
काय यार काय time पास चालाय, आम्हाला खूप काम आहेत ok सो please अस बकवास काहीही लिहू नका.......
On 30/09/2010 03:32 PM abcdef said:
ok....................
On 30/09/2010 03:02 PM sachin said:
मिथिला प्रेम स्वीकारू नकोस कारण नचिकेत आता कुठेतरी मन रामविण्या साठी मिथिला प्रपोज करतो आहे लांडगा आहे त्याच्या आयची ..............
On 30/09/2010 02:39 PM Sukhada said:
"शेवटी पहिले प्रेम ते पहिले प्रेम असते............." इतकेच सांगू शकते मी. Best......and just awesome.Keep writing.
On 30/09/2010 12:07 PM abcd said:
क्या बकवास है! अस पण कुठे होते का? लेखक 'कौटुंबिक मालिका' जास्त पाहायला लागलेला दिसतोय! आता आवरा ह्याला! रुपया पडला असेल ह्याचा कुठेतरी....बघून या जरा!!!
On 30/09/2010 11:49 AM vachakache haal! :( said:
@original Mitali : तुम्हाला कसे कळणार कोण original ! आता पर्यंत फक्त एकाch मिटली ने reply केला होता, आणि तिच्या reply वर एकाने "@miTali " अस उत्तर दिले. मग original तर ती पहिली मितालीच राहिली न??? मग तुम्ही का भांडत आहात, ते कळलेच नाही! बाकी गरज वाटली तर झाडावरून खाली उतरेन!
On 30/09/2010 09:43 AM mahesh said:
त्याला म्हणावं आत्ता काशी घाल !!!
On 30/09/2010 09:03 AM Dev said:
खूप छान
On 30/09/2010 05:44 AM Tallahassee said:
आता नचिकेत चा खरा के एल पी डी झाला.....रात्री स्ट्रीप क्लब मध्ये जाऊन खूप दारू पिल तो आता.... :D :D :D :D
On 29/09/2010 10:43 PM Bhagwan Gite said:
कॉलेजचे दिवस आठवतायेत... खूपच छान... पहिले प्रेम पहिली आठवण.... पहिलेच घरटे पहिलेच आंगण...
On 29/09/2010 08:57 PM Ajit kharade AGRICOS said:
लय भारीय राव!!!!
On 29/09/2010 08:39 PM sanjog said:
प्रत्येकवेळी हा लेख येतो तेव्हा स्टोरी पूर्णपणे अगदी विरुद्ध बाजू मांडून जाते असेही होते का पण खरच असे होते का अरे एवढे दिवस आज पुण्यातली मुले मुली थांबतात का ? \
On 29/09/2010 07:14 PM rupali said:
कारण तिला घाईत निर्णय घ्यायचा नव्हता... ..... ++1000
On 29/09/2010 06:54 PM harshad sathe said:
Vijay Lad has become love guru of esakal....keep it up....
On 29/09/2010 06:37 PM Mitali said:
तर मग तूच सांग बरोबर काय आहे ते?
On 29/09/2010 03:29 PM original Mitali said:
@Mitali--- 100% चूक आहे तुझे आणि जरा स्वतःचे खरे नाव लावायला लाज वाटते का?
On 29/09/2010 03:25 PM Abhinandan Patil said:
नाद खुला राव ..मस्त स्टोरी आहे.
On 29/09/2010 02:24 PM Dev said:
Good ending as a like Hindi Film...!!!
On 29/09/2010 02:15 PM Sandeep - Swiss said:
thats nice but really unfair to Mithila . Rujuta nahi मिळाली म्हणून परत मिठीला कडे आला. I personally feel mithila must remain as best friend ओन्ली.
On 29/09/2010 01:06 PM @Mitali said:
माझ्यामते जगात एकाच प्रेम निस्वार्थी असते, आईचे प्रेम! खरच!
On 29/09/2010 12:49 PM supriya said:
खूपच छान! कथेमध्ये चांगला twist दिला आहे.
On 29/09/2010 12:24 PM Suraj said:
विजय भाऊ ... तुम्ही तर U टर्नच घेतला कि ... आता पुढे जाऊन पुन्हा एक U टर्न घेणार वाटतं म्हणजे... सगळा सुरळीत होईल.. पाहूयात... waitting for next part..
On 29/09/2010 12:06 PM anup said:
खउपच छअन ..................
On 29/09/2010 10:52 AM Nikhil said:
खूपच छान story आहे. पहिल्या 3 parts पेक्षा हा part खूपच आवडला.
On 29/09/2010 10:42 AM poonam said:
हे तर असे झाले कि, ज्याचे जळते त्यालाच कळते... आता बघू मिथिला काय निर्णय घेते ते.... पण तिने accept करावे हे proposal.. कितीही झाले तरी प्रेम शेवटी प्रेमच असते....
On 29/09/2010 09:16 AM Shrikant said:
Mithila ur decision is right.tyavar tham raha tula dusare sundar prem milel.but nachiketshi maitri rahu de tyala tuzi garaj aahe.
On 29/09/2010 08:32 AM mayuresh said:
खूप छान अप्रतिम लिहिलंय......ग्रेट........... १० ते कॉलेज चे दिवस त्या आठवणी जाग्या झाल्या..... पहिला प्रेम kharach आयुष्य बनू पाहत असतं कोणाच नशीब कसा साथ देईल काय ठाऊक.... पण यात विचार खूप महत्वाची गोष्ट आहे... गुड वन
On 29/09/2010 07:10 mayur nikalage said said:
लय चं बोर नाही
On 29/09/2010 01:38 AM Priya said:
maitri tikun rahnyakrta propose krn khup chukich ahe. Nachiketla punha dusri mulgi avdel mg punha to tila sodun gela tr? Maitri ani Prem khup javlche natevaik ahet.. Premat ekmekana sath det nat fulvata aal pahije.. Mala tr khup ustukta ahe pudhe kay honar yachi..pn vatat ki mithilane ho manu naye..maitrin bnunch rahav.
On 29/09/2010 12:55 AM prashant jagtap, said:
खूपच भारी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,मितीला जीक्लास रे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
On 29/09/2010 12:51 AM Prathmesh said:
मिठीला प्रेम स्वीकारू नकोस ..कारण तो आता हो म्हणतो पण नंतर नाही म्हणेल...एकाधि आवडली तर...विचार कर....नचिकेत चांगला नाही तो दुक लाप्व्नाय्सती हे सगळ करतो आहे.
On 28/09/2010 11:27 PM vikas said:
छान.......................
On 28/09/2010 11:27 PM sanaa said:
मला गोष्ट खूपच आवडली. खरच college मधील दिवस किती तरल असतात नाही? आता आयुष्यात जरा maturity आल्यावर वाटतं कि ते पहिले प्रेम बीम practical नसतं आणि आयुष्य त्यापलीकडे खूप वेगळा आहे पण अशा गोष्टी वाचून परत मजा येते हे मात्र खरं.
On 28/09/2010 11:16 PM prasad said:
पुढच्या भागात बहुतेक मिथिला आत्महत्या करेल आणि मग नचिकेत नवीन मुलगी शोधेल. हे झाले नाही तर मला आत्महत्येचा विचार करावा लागेल.
On 28/09/2010 11:03 PM Atul Joshi said:
nice story. but mithila has taken correct decision & nachiket is selfish.
On 28/09/2010 10:57 PM vikas said:
खूप छान...
On 28-09-2010 10:45 PM asha mumbai said:
नचिकेत ला आत्ता कोणीही नाही म्हणून तो आत्ता असा वागत आहे....याचा अर्थ त्याचं मिथिला वर खरा प्रेम नाही..... पण याला काय अर्थ आहे यार एक गेली कि दुसरी लगेच हातात.... म्हणून मिथिला तू त्याचं प्रेम accept करू नकोस......कारण त्याला फक्त तुझी गरज आहे....हे खरं प्रेम नाही.......
On 28/09/2010 10:19 PM anjali said:
you said it Raj.. I made that mistake and then realized it .
On 28/09/2010 10:15 PM swapnil K said:
both think right means typical how girl and boys will react or handle this type of situation....Boys can immediatly switch their love not coz they need SOMETHING than NOTHING...which GIRLS don't understand easily....I like it...
On 28/09/2010 10:01 PM snehal said:
nice story pan jara lavkar end kara aata! plzzzzzzzzzzzzz
On 28/09/2010 09:49 PM Abhijeet said:
मला वाटतं ह्या गोष्टीमध्ये खूपच जास्त practicality झाली आहे आता. हि रोमांटीक गोष्ट अशीच राहू द्यावी.
On 28/09/2010 09:39 PM Janvi(Poonam) said:
Really....Hat's of 2 Mithila.....! मानल पाहिजे मिथिलाला......! पण ती जो काही निर्णय घेईल,तो योग्य असेल......!!!!!!!! Keep it up ......!
On 28/09/2010 08:47 PM AA said:
Cont. माझे कॉलेज मधले प्रेम तेव्हा पूर्ण झाले नाही ही एक अत्यंत चांगली घटना माझ्या आयुष्यात घडली. माझी सहचारिणी फारच चांगली आहे. आणि माझ्यावर खूप प्रेम करते आणि आयुष्यात पैश्याला कारणपेक्षा जास्त महत्व देत नाही. I am very happy.
On 28/09/2010 08:37 PM Pandu said:
(कहानी में Twist) -> ऋजुता (मिथिलेला) : मिथिला, आशयच प्रोपोसल स्वीकारायच्या अगोदर पासून माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण माझा हे प्रेम जगाला कळणार नाही म्हणून मी नाईलाजाने त्याचे प्रोपोसल स्वीकारले. पण आता माझी चूक मला कळली आहे. जगाने काहीही म्हटले तरी मी ऐकणार नाही , मिथिला please तू मला हो म्हण. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते आहे. त्या मूर्ख नचिकेत च्या नादी लागू नकोस..! तो स्वतः घबराट आणि छुपा "गे" आहे. हे सगळ्या कॉलेज ला माहित आहे.
On 28/09/2010 08:26 PM Avadhut Koparde said:
प्यार में ट्विस्ट. खूप मजा येते आहे. छान सस्पेन्स राखलंय.........Keep it Up.
On 28/09/2010 08:21 PM Rucha said:
आवरा!!!
On 28/09/2010 08:13 PM बाळा नाडकर्णी (balanad27@hotmail.com) said:
मिथिलेने नचिकेतमधले पुरुषत्व जागवलेय. त्यावर प्रथम अधिकार मिथिलेचा आहे. नचिकेतचं दु:ख ऋतूजेवरील प्रेम असफल झाल्याचे नसून ते व्यक्त करायची संधी दैवाने नाकारल्याचं आहे. मिथिलेने त्याला स्वीकारलं तर परत एकदा त्याला उभारी देऊन त्याच्या पुरुषार्थाला वाट करून द्यावी लागेल. बायकोने नव-याची सल्लागार/मार्गदर्शक बनणं खूप गुंतागुंतीचं आहे. शिवाय यात नचिकेत हातातून निसटण्याचा धोकाही आहेच. मिथिलेचं प्रेम खरं असेल तर हे आव्हान स्वीकारावं लागेल. प्रेमात त्यागाची तयारी लागते. मिथिलेच्या इच्छाशक्तीची कसोटी आहे.
On 28/09/2010 07:14 PM vaibhav nimbalkar said:
जबरदस्त!!! खूपच छान
On 28/09/2010 05:47 PM Dhananjay said:
एका दिवसा मध्ये प्रेंम बदलले. मग नन्तर अजून कोणी आवडेल आणि मग नन्तर अजून कोणी. कधी पण कोणाला पण होकार देताना कमीत कमी इक वर्ष तरी वाट पहावी कारण हा life चा प्रश्न असतो. एक वर्ष आपल्या बरेच काही शिकवते.
On 28/09/2010 05:46 PM rupali said:
अस होत का खरच?
On 28/09/2010 05:36 PM Kalpesh said:
@Mitali तुझ्या फालतू प्रश्नांसाठी कोणाकडेही वेळ नाही आहे
On 28/09/2010 05:34 PM DIMPAL said:
ARE SAGLATE CHAN NAT MHANGE MATIRY
On 28/09/2010 05:31 PM DIMPAL said:
ARE SAGLATE CHAN NAT MHANGE MATIRY
On 28/09/2010 05:17 PM Ani said:
नचिकेतचा निर्णय अगदी योग्य आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ह्या पेक्ष्या आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्वाच आहे. कारण आपण कोणाला आपल्यावर प्रेम करायला नाही शिकवू शकत पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम करण आपण शिकू शकतो.
On 28/09/2010 05:12 PM poojashree said:
मला नचीकेतचे शेवटचे म्हणणे पटते,पण तरिही मिथिलानी त्याला होकार देऊ नये. कथा आवडली.पुढच्या भागाची वाट पाहते:)
On 28/09/2010 05:09 PM Prashant Salunke said:
विजय तुमची कथा खूप छान आहे, पण या भागामध्ये ती थोडीशी भरकटलेली वाटते आणि या भागामध्ये तुम्ही कथेला फारच वेग दिला आहे...असे माझे स्वतःचे फिलिंग आहे...
On 28/09/2010 05:03 PM Sunil Yadav said:
lai bhari !!!!!!!!!!!! pan Mithilane lagech ho mahnu naye.
On 28/09/2010 04:39 PM vrushali said:
विजय, छान लिहिलंय... कथा वाचताना डोळ्यातून पाणी आलेला कळलाच नाही... आता याचा end काय होईल याची फार उस्सुकता लागली आहे... पुढचा लेख लवकर Post करावा !!
On 28/09/2010 04:33 PM ajay d rock said:
नचिकेत एकदम डरपोक मुलगा आहे. mithila खूप विचारशील आणि खूप समजदार आहे.
On 28/09/2010 04:31 PM Prathamesh said:
khare prem kharach evadhi waat ka baghayala lavate. te patkan ka milat nahi?
On 28/09/2010 04:29 PM Sweety said:
स्टोरी ठीक आहे पण आता जरा बोरे वाटेल जर mitila ने प्रेम अच्सिप्त केले तर...!! नको करूस मितीला सगळी पोर स्वार्थी असतात त्यालाही धडा शिकवायला हवा!!!
On 28/09/2010 04:08 PM Sarang said:
आरे मित्र एका प्रेमातून काही तरी शिक!!!!! इथून ठीतून सर्वे मुली सर्क्याच......
On 28/09/2010 04:04 PM ashvini said:
मिथिला ने नचिकेत ला नाही म्हणावे , कारण शेवटी त्याचे प्रेम तर तिच्या वर नाहीच, त्या पेक्षा जो तिच्या वर प्रेम करेल त्याच्या शी लग्न करावे. नचिकेत ला आत्ता आधार पाहिजे म्हणून तो तिला प्रोपोज करत आहे. नचिकेत स्वार्थी आहे.
On 28/09/2010 04:02 PM santosh mali jaysingpur said:
story khup chan ahe jar hi story kahrokar asel tar mithilala nachiketla apal karun ghetal pahije.
On 28/09/2010 04:02 PM santosh mali jaysingpur said:
story khup chan ahe jar hi story kahrokar asel tar mithilala nachiketla apal karun ghetal pahije.
On 28/09/2010 03:58 PM Mitali said:
Rahul- 100% बरोबर आहे. मी तुझ्या मताशी अगदी सहमाथ आहे. प्रत्येक वयात लागणाऱ्या या फक्त गरजा आहे. याने पुढचा आयुष्यात काहीही फरक पडत नाही. केवळ एक गरज. जगात "एकच प्रेम निस्वर्ती" आहे. ओळखा नाहीतर मी सांगेलच पण जरा budhila तान द्या.
On 28/09/2010 03:52 PM Rohan said:
लई बोर
On 28/09/2010 03:50 PM KOMAL said:
बघा, पूर्ण विचार करा आणि दोघांनी योग्य निर्णय घ्या म्हणजे झाले. पुढील वाटचालीसाठी आणि आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
On 28/09/2010 03:45 PM KOMAL said:
खूप च छान मला हा लेख माझ्यावर आधारित वाटतो माझी भूमिका मिथिला सारखी होती पण शेवट हा वाईट झाला.मिथिला तू होकार देऊ नकोस.विजय सर माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या मनातील जखमा ओल्या झाल्या भूतकाळ त्रास देत आहे पण खूपच छान लेख आहे.
On 28/09/2010 03:34 PM vinod nikade said:
Very Vary Good Love Story . I am vary glad reading this story . next part emdetely post on sakal
On 28/09/2010 03:32 PM vinod said:
pudhchi vakya vachyala khup usukta lagali pudha bhag lavkar phatawa
On 28/09/2010 03:30 PM salim said:
Good
On 28/09/2010 03:26 PM praju said:
एका रात्रीत नचिकेत ला बर शहाणपण सुचल.....!!!! इथे स्टोरी जरा मार खातेय ...!! @लेखक: प्लीस add सम थिंग न्यू ....!!!
On 28/09/2010 03:23 PM सासोन्कर यार्देना इस्रायेल said:
छान अप्रतिम टायमिंग साधले आहे - सासोन्कर यार्देना इस्रायेल
On 28/09/2010 03:22 PM manasvi said:
nice story........
On 28/09/2010 03:03 PM wadekar said:
अल्लड vayatalya गोष्टी ह्या. प्रक्टीकॅल life khup vegale asate. Ani Prem Milane tase phar sope pan konihi stri purushatil nikhal maitri samjun ghet nahi
On 28/09/2010 02:50 PM Jagdish said:
@ Manali मला तुझी प्रतिक्रिया अगदी बरोबर वाटत आहे.
On 28/09/2010 02:36 PM VISHALLENGARE said:
L - LOSS O- OFF V-VALUABLE E- ENERGY
On 28/09/2010 02:31 PM vaasta said:
हि स्टोरी हिंदी सिरीयल च्या अंगाने चालली आहे. ह्याचं तिच्याबरोबर तिचं दुसर्याबरोबर.एकदम बकवास आहे.
On 28/09/2010 02:19 PM neha said:
काय फालतूगीरी लावली आहे. लव्ह ट्रायंगल वगैरे पर्यंत तरी सहन करतात लोक. आता हे काय चौकोन, पंचकोन, षटकोन वगैरे बनवणार का? दुसरे बरे विषय मिळत नाहीत का रे तुम्हाला? ह्याने तिला विचारलं तिने त्याला विचारलं त्याच्या आधीच तिने आणखी कोणाला तरी होकार दिला? काय प्रेम कथा लिहिताय का डेली सोप ची स्क्रिप्ट? आता त्या दुसर्या मुलाचं लफडं आणा बाहेर मग ती मुलगी रडेल आपल्या hero कडे परत येईल, मग हिरो परत ह्या पहिली ला सोडून त्या मुली कडे जाईल वगैरे... तद्दन फालतू.
On 28/09/2010 02:18 PM TruptiD said:
१. लेख लिहिण्याची पद्धत चांगली आहे, पण आता बस झाले, बोर झाले आता. 2. वाचकांनी लेखावर प्रतिक्रिया द्याव्या, स्त्री-पुरुष वाद का बर उकरून काढावा? ३. Prem हि फक्त एक गरज असते, शारीरिक आणि मानसिक! गरज पूर्ण झाली कि, mag to mulga aso va mulgi, aadhich दुखणं विसरतात! (No offence meant)
On 28/09/2010 02:16 PM sagar said:
मिथिला चान्स परत आला आहे विचार कर.
On 28/09/2010 02:15 PM Joy said:
खरच खूप मोठ्ठा प्रश्न वाटतो हा... फक्त मैत्रीचा जाणून-बुजून प्रेमात रुपांतर होवू शकत का? जो मित्र आपल्याला फक्त मैत्रीण समजतो त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करणे अवघड आहे.
On 28/09/2010 02:01 PM prashant said:
प्रेम म्हणजे मैत्री नाही रे प्रेमा पेक्षा मैर्ती चांगली असते सुखात दुखत सात देणारी असते प्रेम म्हणजे प्रेम
On 28/09/2010 01:56 PM neha said:
नचिकेत तू कसा काय एकतर्फी प्रेम केलास .तूला समजत नव्हते का तिच्या आवडी -निवडी ..तिचे बोलणे .तिची नजर..अरे सध्याचे जग इतके पुढे गेले आहे कि नजरेवरून प्रेम ओळखता येते ..इतका कसा रे तू ...........दोष तुझा आहे ...तुला खरे प्रेम ओळखता आले नाही .....................
On 28/09/2010 01:50 PM anand shirodkar said:
@Poonam : पूनम ..इथे मिथिला खूप खुश झाली आहे... कारण नेहमी ती त्याचा च विचार करत असते ... ती propose accept करणार कारण ती त्याच्यावर प्रेम करते ... जर ती प्रेम करत नाही तर ती त्याचा एवढा विचार का करत असते?????
On 28/09/2010 01:42 PM Mahan said:
सगळेच थोड्या फार फरकाने स्वार्थी असतात, मुले आणि मुली दोन्ही. पण आयुष्यातले काही महत्वाचे निर्णय विचार करून घेतले तर तो स्वार्थी पणा होत नाही.नचिकेत ला हातच सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्यात अर्थ नाही हे कळलं, आता निर्णय मिथिला ने घ्यायचा आहे. या कथेत पुढे काही हि होवो, पैलू छान मांडले आहेत.
On 28/09/2010 01:34 PM Hema said:
@ Mayur T - म्हणजे मिथीला ने कायम नचिकेत ला खुश ठेवायचा प्रयत्न करत राहायचा का...स्वतः चे काही हि होवो....अस आपलाच प्रेम वेगळ्या प्रकारे आपल्यासमोर आलं तर कोणी हि विचार करेलच.
On 28/09/2010 01:26 PM manali said:
नचिकेत ने ऋतुजा वरच्या प्रेमाला मैत्री चे नाव दिले , आणि मिथीला शी असलेल्या मैत्रीला प्रेमाचे नाव देऊ पाहतोय. मिथीला काहीही झाल तरी नचिकेत ची मैत्रीण बनून राहील, अगदी शेवट पर्यंत, कारण तिचे मन साफ आहे. तिच्या आयुष्यात नंतर अजून दुसरे कोणी आले तरी. नचिकेत ला जर मैत्रीण गमावण्याची भीती वाटत असेल तर तसे होणार नाही. मिथीला ने खरच नीट विचार करावा. नचिकेत आयुष्यभर मिथीला ची आणि त्याच्या मनातल्या प्रेयसी ( कदाचित नेहेमी ऋतुजा ची ) तुलना करत बसेल.
On 28/09/2010 01:05 PM Anirudha said:
useless lekh ahe. please ata sampva (क्रमशः) bass zal...aani plz dolyat pani yeil etka kay bhari lekh nahi...pani anaych asel ter VA Pu aani hasun hasun dolyat pani anayche asel ter PU LA vacha.... Mitali : Jas mulina Mann aste tasech Mulana (Purshana) pan aste so sarsakat tu saglyana ekach rangat nahi pahu shkat...plz boltana bhan thev...aslya vakyani changli mule khrch dukhawali jau shktat.
On 28/09/2010 01:03 PM Raj said:
Mitali :- बाई तस नाही. तू आस का म्हणती ते कारण तू सगळ्यांना तस बगते आहे. जगात जसे वाईत लोक आसतात तशी चागली पण आसतात. तुला चागली लोक भेटली नसतील. जसा पुरुष बाबा, भाऊ, मुलगा आसतो तसेच स्त्री आई, बहिण, मुलगी असती. आणि आता एक नवीन नात झाल ते म्हणजे मैत्रीचे.
On 28/09/2010 01:03 PM Raj said:
Mitali :- बाई तस नाही. तू आस का म्हणती ते कारण तू सगळ्यांना तस बगते आहे. जगात जसे वाईत लोक आसतात तशी चागली पण आसतात. तुला चागली लोक भेटली नसतील. जसा पुरुष बाबा, भाऊ, मुलगा आसतो तसेच स्त्री आई, बहिण, मुलगी असती. आणि आता एक नवीन नात झाल ते म्हणजे मैत्रीचे.
On 28/09/2010 01:03 PM Prachi said:
खुप छान लिहले सर प्रत्येक पोस्ट नंतर पुढील पोस्ट ची उत्सुकता वाटते. कादंबरी वाच्ल्यागत वाटते Best of luck ..
On 28/09/2010 12:50 PM Rahul said:
college मध्ये किंवा पौगान्दावास्थेत केलेले प्रेम हे खरे निरतिशय प्रेम बाकी सगळे क्षणाचे सोबती एकेकाळी जीवाभावाचे म्हणवणारे आपापल्या आयुष्यात मग्न...प्रेम बीम सगळे भंकस..... व्यवहार नुसता... तेव्हा हे सगळे मस्त वाटायचे आता खरेतर हसू येतेय...काय मूर्ख असतो नाही आपण तेव्हा college मध्ये असताना?? काही फरक पडलाय का कोणाला तेव्हाचे प्रेम न मिळाल्याने??? त्याच मैत्रिणीच्या नवऱ्याला एकदा विचारा, तोही तुमच्याच नावेत बसलेला आढळेल... सब माया है....मिथ्या है...:) काय म्हणता दोस्तहो??
On 28/09/2010 12:46 PM प्रविण जोशी. said:
फारच छान. मिथिलाचे नचिकेतवर, नचिकेतचे ऋतूजावर, आशयचे ऋतूजावर प्रेम आहे. ह्या मध्ये नचिकेत आणि ऋतूजा common आहे. लेखकानी ह्या कथेत ते छानच गुंफले आहे. हे वाचून मला तर " जाने तू या जाने ना " चित्रपटाची आठवण झाली, एक एक भाग वाचून प्रत्येक भागात मिरीन्दाची पण आठवण झाली. कारण " जोर का झटका धीरेसे लगे" प्रत्येक भागात काही ना काही धक्कादायक वाचायला मिळत आहे. कथेचा शेवट हि असाच धक्कादायक होऊ द्या अशी सदिच्छा.
On 28/09/2010 12:39 PM pavan said:
दोन कानाखाली पेटव त्याच्या बवालात पणा करत आहे तो त्यला फक्त शरीर पाहिजे ही नाहीतर ती मूर्ख कुठला
On 28/09/2010 12:33 PM satish khae said:
मस्त एकदम मस्त...पहिले प्रेम पहिली आठवण...मिथिला प्रेम स्वीकारू नकोस ....
On 28/09/2010 12:29 PM Ashwini said:
बास करा आता हि बोर प्रेमकहाणी.... कंटाळा आला...very immatuare love story.......
On 28/09/2010 12:26 PM Avinash Sawant said:
Vijay the story the moments is incredible..... I think First love is always a true love ......... तिची जागा दुसरी कोणीही घेवू शकत नाही
On 28/09/2010 12:19 PM anuja said:
इतका सोपा असता का ...तिने नाही म्हणला म्हणून परत हिला विचारायचं ! काही पटत नाही
On 28/09/2010 12:18 PM sachin patil said:
मिताली, तुझ बरोबर आहे सगळे पुरुष सारखेच असतात पण एकसारखे नसतात.
On 28/09/2010 12:17 PM SHUBHANGI NEWASE said:
खूप सुंदर प्रेम कहाणी आहे. मला खूप आवडली.
On 28/09/2010 12:14 PM Poonam said:
खूप सुंदर आहे लेख....खरच मिथिला ची काय अवस्था झली असेल ना.....! D't accept his propasal.....! Best writing....Kepp it up.
On 28/09/2010 12:11 PM Sachin said:
मिताली तुझ बरोबर आहे, सगळे पुरुष सारखेच असतात पण एकसारखे नसतात.
On 28/09/2010 12:03 PM Mitali said:
Raj:- मुलींच्या बाबतीत सगळेच पूरुस सारकेच असताथ. जगातल्या सगळ्या मुली आपल्यासाठी आहेतः अश्या अवेर्बावाथ सगळे वागत असतात.
On 28/09/2010 11:41 AM pravin said:
best of luck very good
On 28/09/2010 11:39 AM anand shirodkar said:
कोणी हि असत तर हाच निर्णय घेतला असता..... @mitali पुरुष स्वार्थी नसतात ... उलट बायका च स्वार्थी असतात.. सुरुवातीला थोड नाटक करतात ..निर्णय घ्यायला वेळ मागून घेतात ... पण त्यांच्या मनात पण स्वार्थ च असतो.. पुढचा विचार करून आणि आपला फायदा बघून होकार देतात ... या कथे मध्ये पण मिथीला शेवटी होकार च देणार आहे..
On 28/09/2010 11:30 AM Sanika said:
Mithila prem swikaru nako thoda vichar kar,tuzyavar prem karnarya mulala ho manh
On 28/09/2010 11:30 AM Yogesh said:
sahi story aahe.
On 28/09/2010 11:29 AM onkar said:
मिथिला तू १ संधी द्यावीस असे मला वाटत.... पहीले प्रेम खूप छान अनुभव.....
On 28/09/2010 11:28 AM prasad.pune said:
प्लीज साथ दे . मितीला. फक्त तूच आहेस त्याच्यासाठी.........
On 28/09/2010 11:24 AM Sameer Lotankar said:
Nachiket is looser coward he is crying as he dint get to f**k Rutuja.. now the dude shudn't waste opportunity with Mithila. Nachiket, go ahead get her do the shit and come out of it... All other youngsters who reading this.. nothing to learn frm such crap stories its sheer timewaste. Just think what to do in the life. That is important. You can get good gals or good boys if you do good career and achieve something. Not just by doing such shit.
On 28/09/2010 11:22 AM rahul said:
एक नंबर
On 28/09/2010 11:14 AM prashant said:
विजय, खूप खूप छान लिहिलंय ... कथा वाचताना डोळ्यातून पाणी आलेला कळलाच नाही... आता याचा end काय होईल याची फार उस्सुकता लागली आहे... पुढचा लेख लवकर Post करावा !!
On 28-09-2010 11:07 AM Yogesh said:
त्या nachiketchya दोन कानफटात टेकव.. म्हणजे जाग्यावर येई तो :)
On 28/09/2010 10:57 AM Raj said:
Mitali :- बाई सगळे सारखे नासतात. त्यांनी असा निर्णय का घेतला हे तरी समजून घे. तू तिथे (नचिकेत) आसती तर काय केल आसत. कारण मी माझ्या आयुष्यात शिकलो कि आपण अशावर प्रेम कराव कि तो/ती आपल्या शिवाय जगू शकत नाही. ते प्रेम आसत. i am sorry but this my thinking
On 28/09/2010 10:45 AM Pankaj said:
विजय, खूप खूप छान लिहिलंय ... कथा वाचताना डोळ्यातून पाणी आलेला कळलाच नाही... आता याचा end काय होईल याची फार उस्सुकता लागली आहे... पुढचा लेख लवकर Post करावा !!
On 28/09/2010 10:45 AM Kiran said:
खूप छान आहे स्टोरी, एकदम हृदयाला साद घालते. too good, संग्रही ठेवण्य सारखी , मस्त एकदम मस्त will be waiting for next part .....
On 28/09/2010 10:42 AM Shamsundar said:
ज्यावेळेस मी कॉलेज ला होतो तेवा माझ्या सोबत आसच घडलं होते फक्त नचिकेत च्या जागी माझी मैत्रीण होती व मिथिला च्या जागी मी होतो . मला लगेचच कॉलेजचे दिवसानची आठवण आली . म्हणून आता फक्त " गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी "
On 28/09/2010 10:23 AM Vishwanath Rupe said:
खूपच छान लेख ..........
On 28/09/2010 10:16 AM vaibhav said:
premat manus swarthi banto tyala dusar konach prem disat nahi
On 28/09/2010 10:16 AM Mayur T said:
मला वाटते काही काळ एकत्र गेल्यावर नचिकेत प्रेमात पडू शकतो मिथालीच्या, तिच्या वागण्यावर खूप काही अवलंबून असेल.ती जर खूप छान वागत राहिनी तर याला वेळ नाही लागणार.मुल प्रेमात लवकर पडतात.पण हे सर्व वाचून मी पण थोडा confuse झालोय नक्कीच.
On 28/09/2010 10:15 AM Ravi said:
मिथिला प्रेम स्वीकार
On 28/09/2010 10:14 AM vaibhav said:
premat manus swarthi banto tyala dusar konach prem disat nahi
On 28/09/2010 10:13 AM SHRI said:
बघा, पूर्ण विचार करा आणि दोघांनी योग्य निर्णय घ्या म्हणजे झाले. पुढील वाटचालीसाठी आणि आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
On 28/09/2010 10:01 AM Prasant said:
फार छान ...........
On 28/09/2010 10:00 AM mandar said:
मिथिला हो म्हण कारण त्याला तुझी गरज आहे असे नाही,तर त्याने तुला पहिले जे होते ते खरे सांगितले होते एखदा असता तर दोघीनाही झुलवत ठेऊ शकला असता.पण त्याने तसे केले नाही. नचिकेत आता जे आहे ते ते तुला गमवायचे नाही हे तुझी मानसिक व्यथा आहे.त्या मुळे घाई करू नकोस ....आता तिला हि विचार करयला वेळ दे
On 28/09/2010 09:41 AM Tushar Patil,Nashik. said:
ekdam chhan valan ghtey hi gosht. pudhe kay honar ahe te aplyala mahitach ahe. fakt kas honar te baghan interesting asen..
On 28/09/2010 09:41 AM Mitali said:
यावरूनच कळत कि पुरुषाची जात किती स्वार्थी असते . सगळे सारकेच असतात.
On 28/09/2010 09:40 AM Mitali said:
यावरूनच कळत कि पुरुषाची जात किती स्वार्थी असते . सगळे सारकेच असतात.
On 28/09/2010 09:33 AM abc said:
एका दिवसात प्रेमात बदल - आयला भारीच आहे बर नचिकेत....... हे तर अस झाला कि "तू नाही तो और सही , और नाही तो और सही"
On 28/09/2010 09:32 AM rohit said:
गुड वन!!!
On 28/09/2010 09:30 AM RAHUL said:
मिथिला प्रेम स्वीकारू नकोस
On 28/09/2010 09:24 AM Harshad said:
कॉलेजचे दिवस आठवतायेत... खूपच छान... पहिले प्रेम पहिली आठवण.... पहिलेच घरटे पहिलेच आंगण...
On 28/09/2010 09:22 AM Harshad said:
कॉलेजचे दिवस आठवतायेत... खूपच छान... पहिले प्रेम पहिली आठवण.... पहिलेच घरटे पहिलेच आंगण...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: