Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

सोलापूरचा समाधान घोडके 'महाराष्ट्र केसरी'
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 24, 2010 AT 12:30 AM (IST)

रोहे - सोलापूरच्या समाधान घोडकेने कुस्तीशौकिनांचे अंदाज चुकीचे ठरवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. द. ग. तटकरे क्रीडा नगरीत चुरशीच्या महाराष्ट्र केसरी लढतीच्या अपेक्षेने चांगलीच गर्दी केली होती, पण समाधानने योजनाबद्ध प्रतिहल्ला करीत सर्वांच्या अपेक्षा फोल ठरवत विजेतेपदाच्या लढतीत कोल्हापूरच्या नंदकुमार अबदारला पराजित केले.

समाधान हा गेल्या काही वर्षांत पश्‍चिम महाराष्ट्रातील कुस्ती मातीतील लढती गाजवत आहे. मूर्ती लहान पण कामगिरी महान, असे त्याचे चाहते म्हणतात, त्याची प्रचीती आता महाराष्ट्रास आली. तो या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीसाठी गादीवरील गटाच्या स्पर्धेत सहभागी झाला, त्या वेळी अनेकांना धक्का बसला होता, पण या छोट्या चणीच्या मल्लाने प्रत्येक लढतीत शांतपणे खेळ करीत केवळ महाराष्ट्र केसरी लढतीतच प्रवेश केला नाही, तर आपल्यापेक्षा जास्त उंच, ताकद, वजन तसेच अनुभव असलेल्या कोल्हापूरच्या नंदकुमारला पराजित केले. त्याने गादी गटाच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या महेश वरुठेला पराजित केले होते, त्याचा हा विजयही धक्कादायक होता. महेशने राष्ट्रकुल विजेत्या नरसिंग यादवला नमविले होते, पण महेश समाधानसमोर टिकू शकला नाही, हेच नंदकुमारबाबतही घडले.
प्रतिक्रिया
On 14/01/2012 12:58 PM VEER said:
वेरी GOOD
On 26/12/2010 08:45 AM karan deshmukh said:
very nice conguralation to you
On 25/12/2010 10:20 AM Arvind Modhave said:
congatulation समाधान तुला khup काही शुभेच्छा
On 25/12/2010 10:12 AM Arvind Modhave said:
अभिनंदन !!!! MAHARASHTRA केसरी ZHALYABADDAL
On 24/12/2010 03:47 PM Tukaram Randive said:
अभिनंदन!!!!!!!!!!!!!!!!!!!! समाधान असाच पुढे जात रहा भविष्या साठी शुभेचा!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 24/12/2010 03:43 PM अमोल कदम said:
......... अभिनंदन
On 24/12/2010 02:47 PM vishal said:
जय हिंद जय maharastra
On 24/12/2010 02:30 PM Rajesh Gite said:
शाब्बास मित्रा, फक्त सोलापूरच नाही तर सारया महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे .
On 24/12/2010 11:48 AM JAI MAHARASHTRA SOLAPUR said:
हार्दिक अभिनंदन घोडके. सोलापूर आणि सोलापूर करिता चांगली बातमी आहे तुम्हाला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेचा
On 24/12/2010 11:46 AM patil T.C. said:
अभिनंदन शाब्बास !! समाधान घोडके
On 24/12/2010 11:23 AM JAI MAHARASHTRA SOLAPUR said:
सोलापूर आणि सोलापूर जीलळासाठी चांगली बातमी आहे घोडके यांचे हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र
On 24/12/2010 11:17 AM Pramod Jangam said:
Samadhan Ghodake (Solapur) cha Nad Karaycha Nahi..........
On 24/12/2010 11:12 AM nilesh said:
शाब्बास,वा,हुशार,चतुर,बलवान.......................? बारामतीकिंग निलेशशिंगाडे
On 24/12/2010 11:06 AM VASANT HALE said:
चांगली बातमी सोलापूर आणि सोलापूर जिल्ळाकारिता अभिनंदन घोडके जय महाराष्ट्र
On 24/12/2010 11:05 AM paddy said:
गुड अभिनदन समाधान
On 24/12/2010 11:02 AM gunda pawar said:
Congratulation samadhan ghodake. u r playing well in wrestling championship.My best wishes are always with you. Now u r doing more practice for getting olympic medal. thank you, gunda pawar kundal
On 24/12/2010 10:54 AM yogesh said:
शाभ्हास्ब मित्र
On 24/12/2010 10:48 AM Rakesh K said:
समाधान घोडके याचे हार्दिक आभिनंदन आसाच पुढे जात राहा.
On 24/12/2010 10:09 AM Vinayak said:
मस्त........ अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!
On 24/12/2010 10:05 AM sudhir sathe said:
शाब्बास मित्रा सोलापूरचे नाव रोषण केले अभिनंदन //
On 24/12/2010 09:41 AM Amit said:
समस्त सोलापूरकरांच्या खूप खूप शुभेच्छा.
On 24-12-2010 08:57 ????????? harishchandra d. yedage said:
अभिनंदन समाधान घोडके , ग्रेट समाधान ग्रेट सोलापूर
On 24/12/2010 06:56 AM ganesh khude said:
असाच पुढे जात रहा भविष्या साठी शुभेचा तुझा चाहता मित्र गणेश (अहमदनगर)
On 24/12/2010 12:57 AM sarika said:
भले शाब्बास !!
On 23/12/2010 09:58 PM navnath rajwade said:
मस्त सोलापूरचे नाव रोषण केले वारे वा
On 23/12/2010 07:45 PM vijay said:
भले शाब्बास !!
On 23/12/2010 05:39 PM Subhash Yamgar said:
Well done to samadhan Ghodake for win maharashtra kesari


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: