Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

खोकला
डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, September 02, 2011 AT 11:56 AM (IST)
आयुर्वेदात खोकला पाच प्रकारचा असतो असे सांगितलेले आहे. वातज, पित्तज, कफज, क्षतज व क्षयज. हे उत्तरोत्तर बरे व्हायला कठीण असतात. योग्य वेळी चिकित्सा न केल्यास शरीरातील धातूंचा क्षय होतो.

खो कल्याचा त्रास सर्वांच्या अनुभवाचा असतो. खोकला म्हणजे कफदोष, असे समीकरण अनेकांच्या डोक्‍यात पक्के बसलेले असते. पण आयुर्वेदानुसार खोकल्याचेही वात-पित्त-कफ असे प्रकार असतात. खोकल्याला संस्कृतमध्ये "कास' असे म्हणतात. कास शब्द कांस्य (कासे) धातूवरून आला आहे.
भिन्नकांस्यपात्रवत्‌ हतस्वनः कास इति प्रदिष्टः ।...
चीर गेलेले काशाचे भांडे जमिनीवर पडल्यास जसा आवाज येतो, तसा आवाज ज्या रोगात येतो तो "कास' होय. कास म्हणजेच खोकल्याची कारणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत-
खोकल्याची कारणे
नाकातोंडात धूर जाणे.
घशाशी आंबट येणे.
स्वतःच्या शक्‍तीपेक्षा अधिक प्रमाणात व्यायाम करणे.
कोरड्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे.
अन्नाचा कण अन्ननलिकेत न जाता चुकून श्‍वासमार्गात जाणे.
मलमूत्रादी आवेग बळजबरीने अडवून ठेवणे... विशेषतः शिंकेचा आवेग आवरणे.
याखेरीज दूषित हवेच्या संपर्कात आल्याने, जंतुसंसर्ग झाल्याने किंवा क्षयरोगासारख्या मोठ्या रोगाचे लक्षण म्हणूनही खोकला होऊ शकतो.

पञ्च कासाः स्मृता वातपित्तश्‍लेष्मक्षयक्षयैः । क्षयायोपेक्षिताः सर्वे बलिनश्‍चोत्तरोत्तरम्‌ ।।...माधवनिदान
आयुर्वेदात खोकला पाच प्रकारचा असतो असे सांगितलेले आहे. वातज, पित्तज, कफज, क्षतज व क्षयज. हे उत्तरोत्तर बरे व्हायला कठीण असतात. योग्य वेळी चिकित्सा न केल्यास शरीरातील धातूंचा क्षय होतो.
खोकल्याचे पूर्वरूप
पूर्वरूपं भवेत्तेषां शूकपूर्णगलास्यता । कण्ठे कण्डूश्‍य भोज्यानामवरोधश्‍च जायते ।।...माधवनिदान
घशात व तोंडात टोचणे.
घशात खवखव होणे.
खाण्या-पिण्यात चव नसणे.
अन्न गिळताना घशात अडकल्यासारखे वाटणे, ही खोकल्याची पूर्वरूपे होत. अन्न जेव्हा तोंडातून अन्ननलिकेत जाते तेव्हा श्‍वासनलिकेवर दाब आल्याने खोकल्याची भावना होते.

वातज कास
हृच्छङ्‌खमूर्धोदरपार्श्‍वशूलो क्षामाननः क्षोणबलस्वरौजाः ।
प्रसक्‍तवेगस्तु समीरणेन भिन्नस्वरः कासति शुष्कमेव ।।
...माधवनिदान
छाती, शंखमर्म (भुवई व कानाच्या मधला भाग), डोके, पोट, बरगड्यांच्या ठिकाणी दुखते.
तोंडाला वारंवार कोरड पडते.
रोग्याची शक्‍ती कमी कमी होत जाते.
शरीर कांतिहीन होते.
खोकल्याची ढास वारंवार येते व आलेली ढास बऱ्याच वेळ चालू राहते.
आवाज बसतो, खोकला कोरडा असतो.
पित्तज कास
उरोविदाहज्वरवक्रशोपैरभ्यर्दितस्तिक्‍तमुखस्तृषार्तः। पित्तेन पीतानि वमेत्कटूनि कासेत्सपाण्डुः परिदह्यमानः ।। ...माधवनिदान
रोग्याच्या छातीत जळजळ होते.
ताप येतो.
तोंडाला कोरड पडते, वारंवार तहान लागते.
खोकल्यातून पिवळ्या रंगाचा बेडका बाहेर पडतो.
सर्व शरीर पिवळे पडते.
संपूर्ण शरीराचा दाह होतो.
कफज कास
प्रलिप्यमानेन मुखेन सीदन्‌ शिरोरुजार्तः कफपूर्णदेहः। अभक्‍तरुग्गौरवकण्डुयुक्‍तः कासेद्‌भृशं सान्द्रकफः कफेन ।। ...माधवनिदान
तोंडात चिकटा असतो.
शरीर गळून जाते.
डोके दुखते.
सर्व शरीरात कफ साठून राहतो
खाण्या-पिण्यावर वासना नसते.
घसा खवखवतो.
खोकल्यातून घट्ट कफ बाहेर पडतो.
क्षतज व क्षयज कास यांची लक्षणे आपण पुढच्या वेळी पाहू.

फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 20/09/2011 03:25 PM vaishali g. said:
माझी लहान मुलगी अनुषा, तील लहानपणा पासून सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतो महिन्यातील पंधरा दिवस सर्दी खोकला आसतो आता ते दीड वर्षायाची आहे कितीठी मेडीसीन केले तरी काही तरी फरक पडत नाही.कृपया यावर काही उपाय सुचवलात तर तुमची मी कायम ऋणी राहील. धन्यवाद!
On 17/09/2011 09:53 AM nitin jamdhade said:
मला खोकल्याची अलर्जी आहे एकदा खोकला आला कि १ महिना जाताच नाही खूप इलाज केले पण फरक काही पटत नाही आणि गाशात पण कूप टोचते त्यमुळे जेवण पण जात नाही काहीतरी ख्त्रीशीर इलाज सांगव
On 12/09/2011 01:12 PM bhiva said:
खोकल्याविषयी घरगुती माहिती दिली तर बरं होईल. लवकरात लवकर देणे... कृपया ....
On 09/09/2011 08:28 AM wagh shashikant said:
खोकल्याविषयी घरगुती माहिती दिली तर बरं होईल.खोकल्याविषयी घरगुती माहिती दिली तर बरं होईल.
On 07/09/2011 02:05 PM rupali patil said:
माझा मुलगा साडेतीन वर्षाचा आहे.त्याला २ महिन्या पासून खोकला झाला आहे ....रात्री खोकल्याची उबळ जास्त येते कृपया उपाय सांगा
On 07/09/2011 01:29 PM Anil Chhatre - Saudi Arabia said:
हा काय चावटपणा आहे? क्लायमेक्स पर्यंत आणून आता पुढच्या एपिसोड मध्ये पहा सारखा प्रकार आहे. एडिटर एकता कपूर आहे का?
On 06/09/2011 04:28 PM ajay said:
वातज कास हृच्छङ्‌खमूर्धोदरपार्श्‍वशूलो क्षामाननः क्षोणबलस्वरौजाः । प्रसक्‍तवेगस्तु समीरणेन भिन्नस्वरः कासति शुष्कमेव ।। ...माधवनिदान छाती, शंखमर्म (भुवई व कानाच्या मधला भाग), डोके, पोट, बरगड्यांच्या ठिकाणी दुखते. तोंडाला वारंवार कोरड पडते. रोग्याची शक्‍ती कमी कमी होत जाते. शरीर कांतिहीन होते. खोकल्याची ढास वारंवार येते व आलेली ढास बऱ्याच वेळ चालू राहते. आवाज बसतो, खोकला कोरडा असतो. पुढील लेखात आपण यावरचे उपाय सुचवले तर खूप बरे होईल.
On 06/09/2011 01:55 PM Rekha said:
upaya sanga
On 05-09-2011 05:53 ?.??. राम said:
खोकल्याविषयी घरगुती माहिती दिली तर बरं होईल.खोकल्याविषयी घरगुती माहिती दिली तर बरं होईल.
On 04/09/2011 10:52 AM Anil Shantaram Gudekar said:
माहिती चांगली आहे......पण त्या वरील उपाय सांगितले असते तर ....त्या माहितीचा काही उपयोग झाला असता.
On 03/09/2011 09:09 PM suvarna`pardale said:
मला दोन वर्ष्यापासून कुठेहि प्रवास केला, किवा दुसर्या ठिकाणचे पाणी, हॉटेल बहायेरेचे काही खाल्ले कि घशात खवखवते,घशात तेल aalysarke होते, घसा बसतो? याचे कारण काय ? व त्यावर कृपया उपाय सुचवा?
On 03-09-2011 07:48 PM satish said:
kupach chan mahiti dilat tya badal dhanyawad. natarchya lekh zar ya badal upay asstil tar kupach chan.
On 03/09/2011 03:20 PM Shrinias said:
खूप सुंदर माहेती आपण यावरचे उपाय सुचवले तर खूप बरे होईल.माहिती बद्दल धन्यवाद
On 03/09/2011 10:12 AM uk said:
कधीतरी समजेल व प्रत्यक्ष्य काहीतरी उपयोगात आणता येईल अशी माहिती देत चला
On 03/09/2011 09:31 AM Manesh said:
Acchi jankari hai.Acchi jankari hai.
On 03/09/2011 12:20 AM suvarna pardale said:
खूप सुंदर माहेती , आहे , खोकला पाच प्रकारचा असतो असे सांगितलेले आहे. वातज, पित्तज, कफज, क्षतज व क्षयज. हे उत्तरोत्तर बरे व्हायला कठीण असतात. त्याची लक्षणे जी सगतीले आहेत त्यामुळे खोकला कोन्त्यासारुपाचा आहे त्ये समजण्यास सोपे व कायम लक्षात राहील, माहिती बद्दल धन्यवाद ! पुढील लेखात आपण यावरचे उपाय सुचवले तर खूप बरे होईल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: