Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

सलमान खान आज घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये

-
Friday, April 05, 2013 AT 03:00 AM (IST)

जयसिंगपूर - 'दबंग'फेम चुलबूल पांडे अर्थात अभिनेता सलमान खान "मेंटल' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उद्यापासून अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटवर दाखल होणार आहे. सोहेल खान दिग्दर्शित असणाऱ्या चित्रपटात महेश मांजरेकर, अभिनेत्री जेनेलिया डिसोझा-देशमुख, तब्बू आदी कलाकारही चित्रीकरणानिमित्ताने याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. जवळपास चित्रीकरण केले जाणार आहे.

चित्रपटातील काही भाग इन्स्टिट्यूटवर चित्रित केला जाणार आहे. इन्स्टिट्यूटची देखणी इमारत आणि प्रशस्त कॅंपस्‌मुळे दिग्दर्शक सोहेल खान यांनी चित्रीकरणासाठी इन्स्टिट्यूटची निवड केली आहे. याठिकाणी चित्रीकरण केले जाणार असून, चित्रीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर इन्स्टिट्यूट परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान प्रथम चित्रीकरणाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात येत आहे. बॉक्‍स ऑफिसवर आपल्या थरारक दृश्‍यांनी तरुण-तरुणींचा आवडता अभिनेता चित्रीकरणाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात येत असल्याने प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

"मेंटल' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली, ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. पण, शैक्षणिकदृष्ट्या इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूटचा परिसर मनमोहक करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक परिसरामुळेच चित्रीकरणासाठी निवड झाली आहे. अभिनेता सलमान खान, सोहेल खान, महेश मांजरेकर, अभिनेत्री तब्बू आणि जेनेलिया डिसोझा यांचा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष उद्योगपती संजय घोडावत यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

चित्रीकरणासाठी निवड
बिगबजेटच्या "मेंटल'साठी दिग्दर्शक सोहेल खान यांनी देशातील विविध ठिकाणच्या महाविद्यालयांची पाहणी केली आहे. बॉक्‍स ऑफिसवर प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीसाठी चित्रपटातील प्रत्येक ठिकाणांची पाहणी करून माहिती घेतली आहे. देशातील बहुतांश ठिकाणे पाहिल्यानंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: