लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार

Several killed in London Bridge terror rampage
Several killed in London Bridge terror rampage
Updated on

लंडन - लंडन शहर पुन्हा एकदा शनिवारी दहशतवादी हल्ल्यांनी हादरले असून, तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले आहेत. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आप्तकालीन बैठक बोलविली आहे.

मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर थेरेसा मे यांनी लंडनमध्ये आणखी काही ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे लंडनमध्ये सुरक्षा यंत्रणा आणखी कडक करण्यात आली होती. मात्र, शनिवारी रात्री तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ठार मारले आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

लंडनमध्ये सध्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु असून, परदेशातील नागरिक मोठ्या संख्येने आलेले आहे. या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. लंडनमधील प्रसिद्ध लंडन ब्रिजवर पांढऱ्या रंगाच्या कारने फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना चिरडण्यात आले. तर दुसरा हल्ला मार्केटमध्ये चाकूने करण्यात आला. तिसरा हल्ला बकसोल येथे झाला आहे. या तिन्ही हल्ल्यात 7 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या दहशतवादी हल्ल्यापूर्वी 23 मे रोजी मँचेस्टर अरेना येथे पॉपगायक अरियाना ग्रँडच्या शोमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला होता. तर 60 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून लंडनला लक्ष्य बनविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.