चक्रीवादळात अलिबागकरांचं मोबाइल नेटवर्क गडगडलं, 13 हजार लोकांचं स्थलांतर 

alibag cyclone
alibag cyclone
Updated on

मुंबई- निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर येऊन धडकलं आहे. अलिबाग, मुरुड, रोहा या भागात चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. यावेळी अलिबाग, मुरुड भागातल्या मोबाईल फोन नेटवर्कवर गंभीर परिणाम झाला असल्याचं पोलिस अधीक्षक (रायगड) अनिल पारसकर यांनी सांगितलं. कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे हे वादळ धडकले आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका मोठा आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्यांचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.

रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली असल्याची तक्रारी प्राप्त झाल्यात. सध्या कमी कनेक्टिव्हिटीमुळे, अधिक तपशीलांची प्रतीक्षा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या चक्रिवादळाची तीव्रता लक्षात घेता, रायगड, उरण, अलिबाग परिसरातून आतापर्यंत 13 हजार नागरिकांचे स्थलांतर केलं आहे. नागरिकांना शाळा, सभामंडपात सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. रिकामी केलेल्या गावात पोलिसांचे 10 कर्मचारी गस्तीवर आहेत. दरम्यान कोसळलेली झाडं हटवण्यासाठी ट्रॅक्टर आणि जेसीबी मशिन घटनास्थळी दाखल झालेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवन शेजारी महाकाय झाडं उन्मळून पडलं. मुरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.

अनिल पारसकर म्हणाले की, अलिबाग आणि जिल्ह्यात जवळपास 800 पेक्षा जास्त पोलिस आणि होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत आणि गरज भासल्यास अधिक फौजफाटा तैनात करण्यात येईल. NDRFच्या चार टीम यापूर्वीच तैनात केली आहेत.

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. यामुळे दक्षता म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंकवरील प्रवेश बंद करण्यात आला आहे.

network problem occured in alibag during cyclone read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.