लोकहो शंभर टक्के काळजी घ्यावीच लागेल, कारण कोविड बरोबरच आता याचाही 'मोठा' धोका

लोकहो शंभर टक्के काळजी घ्यावीच लागेल, कारण कोविड बरोबरच आता याचाही 'मोठा' धोका

मुंबई : पावसामुळे आता  मुंबईत कोविड  बरोबरच लेप्टोस्पिरोसिस चा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेले असून त्यामुळे लेप्टोचा विषाणू माणसाच्या  शरीरात शिरण्याची शक्यता आहे.  ज्या  नागरिकांचा  पावसाच्या  पाण्याशी  संबंध आला होता, तसेच पायावर जखमा असलेल्या व्यक्ती पावसाच्या पाण्यात वावरल्या असल्यास त्यांना लेप्टो ची बाधा होण्याचाा  जास्त धोका आहे. नाक आणि तोंडा  वाटेहि हा  सूक्ष्मजंतु शरीरात जाऊ शकतो .त्यामुळे अश्या नागरिकांनी  24 ते 72 तासात वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे  आवश्यक आहे, अशी सूचना महापालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केली आहे.वेळीस उपचार न झाल्यास जीवावरही बेतू शकते. 

हा सुक्ष्म जीव उंदीर, कुत्रे, घोडे,  म्हशी तसेच इतर प्राण्याच्या शरीरात आढळतो. जनावरांच्या मूत्रातून सुक्ष्म जीव माती आणि पाण्यात मिसळतो. त्यातून तो मानवी शरीरात प्रवेश करतो. नाक आणि तोंडावाटे तसेच शरीरावर असलेल्या लहानश्या जखमेतून का विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करून शकतो.  मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.असे महापालिकेने स्पष्ट केले . 

काय आहेत लेप्टोची लक्षणे 

या रोगाची ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे आहेत. सोबतच रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड आणि यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यु होण्याचा धोका संभवतो. साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे 'लेप्टोस्पायरोसिस' संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'लेप्टोस्पायरोसिस' प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे. ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काही महत्त्वाच्या गोष्टी 

  • ताप असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.
  • साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.
  • परिसरात उंदीर होणार नाही यासाठी स्वच्छता ठेवावी. उंदीर असल्यास त्यांच्या नायनाट करावा. 

डॉक्टरांसाठी  पालिकेच्या सूचना  

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'कमी जोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करावयास डॉक्‍टरांनी सांगावयाचे आहे.

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून चालल्या असून त्यावेळी ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम होती, अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'मध्यम जोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (200  मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवस सेवन करावयास डॉक्‍टरांनी सांगावयाचे आहे.

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एका पेक्षा अधिक वेळा चालल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे (उदाहरणार्थ: बचाव कार्य करणारे पालिका कर्मचारी), अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'अतिजोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (200  मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग सहा आठवडे सेवन करण्याची सुचना डॉक्टरांनी करावी 

गरोदर स्त्रिया व 8 वर्षाखालील बालकांना डॉक्सीसायक्लीन देऊ नये. त्याऐवजी गरोदर स्त्रियांना 500 मिलीग्रॅम अझिथ्रोमायसिन टॅब्लेट तर 8 वर्षाखालील बालकांना 200 मिलीग्रॅम अझिथ्रोमायसिन सिरप वरील तपशीलानुसार डॉक्‍टरांनी द्यावे. 

risk of spreading leptospirosis is high during monsoon these are symptoms

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com