ठाणे : ठाण्यातील कोपरी परिसरातील खाजगी वाहनांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडी विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आंदोलन उभारलेल्या कोपरी संघर्ष समितीकडून खाजगी वाहनांकडे चक्क खंडणी मागितली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात संघर्ष समितीच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या नेत्यांनी खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या वाहन चालकांकडून सुमारे 1 लाख 90 हजार रुपये घेतले असून दिवसाला 100 रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आल्याची तक्रारी करण्यात आली आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्थानक परिसरामध्ये आणण्यासाठी पुरेशी सार्वजनिक वाहतुक नसल्यामुळे खाजगी वाहनांची सेवा मोठ्याप्रमाणात सुरू झाली आहे. दिवसाला सुमारे शंभराहून अधिक वाहने या भागात येत असल्यामुळे या भागामध्ये वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहन चालकांची श्री साई सेवाभावी बस चालक मालक वेल्फेअर असोसिएशन आहे या संस्थेचे अध्यक्ष रेहमत्तूला मैनुद्दीन पठाण हे असून त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या असोसिएशनच्या कासारवडवली ते कोपरी अशा एकुण 50 ते 55 बसेस सुरू असून मार्च 2017 रोजी एका चालकाचा धक्का एका व्यक्तीला लागला होता.
या प्रकरणानंतर चालक दिनकर शिंदे विरोधात गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्या वाहनाचीही तोडफोड झाली होती. त्यानंतर संघर्ष समितीच स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचे अध्यक्ष राजेश गाडे, आणि अन्य सदस्यांमध्ये विशाल ढेंगळे, दिनेश ढेगळे, जयेश बनसोडे, करण भंडारी यांनी ही वाहतुक बंद पाडली. त्यानंतर त्यांनी चालकांच्या संघटनेची भेट घेऊन त्यांच्याकडून गुडलक म्हणून तीन लाखांची मागणी केली होती. त्यापैकी एक लाख रुपये दिल्यानंतर या भागातील गाड्यांना नंबर देऊन त्यांची वाहतुक सुरू करण्यात आली होती. तर उर्वरीत रकमेपैकी 90 हजार पुन्हा देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वेळी त्यांची मागणी वाढत जात होती. अखेर दिवसाला अडीच हजार या प्रमाणे पैसे देण्याची मागणी राजेश गाडे यांनी केली होती. ही मागणी मान्य झाली नसल्यामुळे त्यांनी या प्रकरणी आंदोलनही हाती घेतले होते. तसेच धमकावून पोलीस आणि आरटीओच्या कारवाई केली जात असल्याचेही तक्रारीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती कोपरी पोलीसांकडून देण्यात आली आहे. कोपरी पोलीसांच्यावतीने या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस निरिक्षक माणिकराव जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.