मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश देत आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या जाऊ नयेत, अशा सूचना केल्या आहेत.
याबाबत शासनाने गणेशोत्सवाबाबत परिपत्रक जारी केले असून त्याआधारे मुंबई महापालिकेनेही गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगी देताना मंडपाच्या शेजारील कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे निर्बंध घातले आहेत.
त्यामुळे यंदा समुद्र चौपाट्यांच्या पारंपारिक विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती विसर्जन होणार नाही.त्यामुळे ‘गणरायांच्या मूर्ती विसर्जनाचा भार यंदा कृत्रिम तलावांवरच’ असणार आहे.
मुंबईत गिरगाव, दादर, शिवाजीपार्क, जुहू आदी चौपाट्यांसह ८४ विसर्जन स्थळांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते. कोरोना कोविड १९च्या पार्श्वभूमीबाबत सुरक्षिततेचा उपाय म्हणून गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यावर्षी गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांचे आयोजन न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
मात्र, मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगी देताना प्रतिज्ञापत्रकांमध्ये सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन मंडपालगतच्या कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट घातली आहे. मात्र, कृत्रिम तलावांत सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करताना मंडळाचे १० पेक्षा अधिक लोक उपस्थित असणार नाहीत आणि मिरवणूक काढली जाणार नाही, अशा प्रकारचे हमी पत्रही लिहून घेतले आहे.
संपादन : अथर्व महांकाळ
visarjan of ganesh idol will held at artificial pond in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.