अतिक्रमणाकडे काणाडोळा

Untitled-1 copy.jpg
Untitled-1 copy.jpg
Updated on

पिंपरी : मोरवाडी चौक ते इंदिरा गांधी पूल मार्गालगत बेकायदा कपडे विक्रीची दुकाने लावली जात आहेत. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहे. पिंपरी पुलाकडे जाण्याच्या मार्गावर डावीकडे काही महिन्यांपूर्वीपर्यंत मोजकीच दुकाने होती; परंतु हळूहळू त्यामध्ये वाढ होत गेली. सध्या या परिसरात सुमारे ८० पेक्षो अधिक दुकाने आहेत. यापैकी बहुसंख्य दुकानदारांकडे अधिकृत वीजमीटर नाही. तरीही त्या दुकानांमध्ये विजेची सुविधा असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लाकडी बांबू उभारून शेड करून ही दुकाने थाटण्यात आली आहेत. सुरक्षेचे नियम कोठेही पाळलेले नाहीत. अग्निशमनासाठी तातडीची कोणतीही सुविधा नाही. दोन दुकानांमध्ये सुरक्षेचे अंतरही राखण्यात आलेले नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मोठा धोका संभवतो. तसे झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. एव्हढेच नव्हे, तर याच दुकानांशेजारच्या मोकळ्या जागेची सफाई करून तेथेही आणखी दुकाने वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पद्धतशीरपणे बांबू उभारण्यात आले आहेत. ही जागा पीएमपीच्या ताब्यात असल्याचे ‘क’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी सांगितले.

दरम्यान, या संदर्भात आझम पानसरे सोशल फाउंडेशनने महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना सोमवारी (ता. २८) निवेदन दिले. ‘मेट्रो स्थानकासाठी आरक्षित असलेल्या या जागेवर गोरगरिबांच्या टपऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करावे,’ असे त्यात म्हटले आहे. निवेदनावर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अकबर मुल्ला यांची स्वाक्षरी आहे.

संबंधित जागेवर महापालिकेकडून पीएमपीसाठी आरक्षण असेल; परंतु ती जागा रीतसर आमच्या ताब्यात अद्याप आलेली नाही. 
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.