‘ना हरकत’नंतर परवडणारी घरे

‘ना हरकत’नंतर परवडणारी घरे
Updated on

पिंपरी - राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) मिळाल्यानंतर नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी, पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पाचे काम सुरू होईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या प्रकल्पात चार हजार ८८३ घरे बांधण्यात येतील. त्यासाठी सुमारे ४५७ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. 

सुमारे ४९ हजार चौरस मीटर जागेतील या प्रकल्पात ११ मजली २४ इमारती असतील. ३१७ चौरस फुटांच्या १ हजार ७८९ वन बीएचके सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी नऊ इमारतींमध्ये टू बीएचके प्रकारातील प्रत्येकी ६३७ चौरस फुटांच्या ७८३ सदनिका असतील.  

दुसऱ्या प्रकल्पात ४४ हजार चौरस मीटर जागेवर २१ इमारती आहेत. त्यात १२ इमारतींमध्ये वन बीएचकेच्या एक हजार ५२८ सदनिका तर नऊ इमारतींमध्ये टू बीएचकेच्या ७८३ सदनिका असतील. सात मोकळ्या जागांमध्ये खेळाची मैदाने आणि उद्याने विकसित करण्यात येतील. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

प्रकल्प एक 
 २५७२ सदनिका व  १०८ दुकाने 
 खर्च : २३९ कोटी ९२ लाख

प्रकल्प दोन
 २३११ सदनिका व ३२ दुकाने 
 खर्च : २१७ कोटी १४ लाख 
 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका (दोन्ही प्रकल्प) : ३३१७
 अल्प उत्पन्न गटासाठी एकूण सदनिका (दोन्ही प्रकल्प) : १५६६

प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पासाठी आवश्‍यक निविदा उघडल्या आहेत. या गृहप्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाचे आदेश दिले जातील. 
- अनिल सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता, प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.