अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

akhil bhartiy bramhan mahasangh awards for different field
akhil bhartiy bramhan mahasangh awards for different field
Updated on

नवी सांगवी (पुणे)- "स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे प्रतिपादन मोहन कुलकर्णी यांनी केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात के. एम. बुक्तर,  राजाभाऊ गोलांडे, एस. बी. पाटील, मुग्धा सरदेशपांडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अॅड. देविदास शिंदे, विजय लाटकर, विवेक इनामदार आदींचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उदय महा, माजी नगरसेवक गजानन चिंचवडे, महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत देशपांडे, महिला सरचिटणीस संजीवनी पांडे, जितेंद्र कुलकर्णी, शहर अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष राजन बुडूख, कार्याध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, सरचिटणीस महेश बारसावडे, सुहास पोफळे, उपक्रमप्रमुख अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोहन कुलकर्णी म्हणाले, "काही लोकांकडून इतिहास बदलून किंवा चुकीच्या पद्धतीने सांगितला जात आहे. त्यामुळे इतरांवर विश्वास न ठेवता, प्रत्येकाने वैयक्तिक दाखले तपासून बघायला हवेत. वाचनसंस्कृती वाढवायला हवी. 

उदय महा म्हणाले, "काही दुष्प्रवृत्तींमुळे समाजाचा सन्मान लयाला गेला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा सन्मान परत मिळवून देण्याचे काम करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.