आळंदी : गेली आठवडाभरापासून पोकलेनच्या साहाय्याने इंद्रायणी नदीपात्रात आळंदी पालिका हद्दीतील स्मशानभूमी लगतचा कचरा थेट नदीपात्रात लोटून देण्याचे पाप सध्या पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र स्थानिक पालिका प्रशासन आणि पदाधिकारी आपल्याला याबाबत माहित नसल्याचे सांगतात. पिंपरी महापालिकेकडून होणाऱ्या नदीप्रदुषणाबाबत नेहमीच ओरडणारी पालिका मात्र स्वताही याबाबत डोळझाक करत असल्याचे चित्र सध्या आळंदीत पाहायला मिळत आहे.
मागील आठवड्यात पिंपरी महापालिका हद्दीतून दिवसभर प्रदुषित पाण्यामुळे नदी फेसाळली होती. यानंतर आता आळंदी पालिकेच्या समोरच अवघ्या शंभर मिटरवर असलेल्या स्मशानभूमीलगतचा अनेक वर्षांचा साचलेला कचरा थेट नदीपात्रात लोटला जात आहे. राज्य तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुमारे अठरा कोटी रूपये निधीतून आळंदी शहरासाठी गटार लाईन आणि एसटीपीचे काम सुरू आहे. हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. आळंदी पालिकेच्या समोर अवघ्या शंभर मिटरवर इंद्रायणीला लागूनच स्मशानभूमी आहे.
गेली कित्येक वर्षे आळंदी पालिका या स्मशानभूमिला लागून मोकळ्या जागेत कचरा संकलन करत होती. हा गोळा झालेला कचरा थेट नदीपात्रात गेली काही वर्षे स्वता ढकलून देत. मात्र वर्तमानपत्रात चर्चा झाल्यावर आणि गेल्या दोन वर्षात कचऱ्यासाठी स्वतंत्रपणे आळंदी देवस्थानकडून पालिकेला पाच एकर जागा गायरानात मिळाल्याने शहराचा रोज गोळा होणारा कचरा या गायरानात टाकला जात आहे. आता सांडपाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू झाल्याने पोकलेनच्या साहाय्याने थेट नदी पात्रात लोटण्याचे काम सुरू केले.
आता सांडपाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू झाल्याने पोकलेनच्या साहाय्याने थेट नदी पात्रात लोटण्याचे काम सुरू केले. गेली आठवडाभर अशाच पद्दतीने कचरा नदीपात्रात टाकला जातो. मात्र पालिका इमारतीच्या समोरच काम सुरू असूनही एकाही पदाधिकारी तसेच प्रशासनला हे काम चुकिच्या पद्धतीने चाललेय असे वाटत नसल्याचे चित्र आहे. एवढेच काय त्यांना विचारले तर सध्या सुरू असलेले काम पालिकेचे नाही असे गुळगुळित उत्तर दिले जाते. पालिकेचे काम नाही तर मग कारवाई का केली जात नाही याचेही उत्तर पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाकडे नाही. एकंदर पैशाने बरबटलेले हात चुकीच्या कामावर कारवाई करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
याबाबत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मलाही याबाबत माहिती नाही याबाबत माहिती घेवून सांगते.त्यानंतर एसटीपीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर पालिकेचे बांधकाम विभागप्रमुख संघपाल गायकवाड यांना विचारले असता,सदरचे काम पालिका करत नाही.एसटीपीचे काम ज्यांना दिले गेले तेच लोक हे काम करत असल्याचे सांगत आपल्यावरिल जबाबदारी श्री.गायकवाड यांनी झटकली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले की,सदरच्या ठिकाणी ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी काम सुरू आहे.याठिकाणी शहरातील सर्व गटारीचे पाणी एकत्रितरित्या विहिर बांधून गोळा केले जाईल.त्यानंतर पुढे एसटीपीकडे सांडपाणी सोडले जाईल.मात्र कचरा नदीत सोडला जात असेल तर तसे न करण्याच्या सूचना दिल्या जाईल असे सांगितल
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली उद्या आळंदीतील विश्रामगृहात इंद्रायणी प्रदुषणाबाबत बैठक आयोजित केली आहे.मात्र सातत्याने नदीपात्रात कचरा लोटणा-या पालिका आणि रसायनयुक्त सांडपाणी सोडणा-या महापालिकेवर कारवाई करण्यास डोळझाक करणा-या त्यांच्याच खात्यातंर्गत राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाला काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.