‘एसएमएस’द्वारे रीडिंगसह वीजबिल

Electricity-Bill
Electricity-Bill
Updated on

पुणे - वीजबिलांचा तपशील व मीटर रीडिंगसह इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या २६ लाख २५ हजार वीजग्राहकांना ही सेवा सुरू केली आहे. वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतूनसुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे.

पुणे परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह इतर वर्गवारीत २७ लाख २४ हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी २५ लाख २६ हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. तसेच १ लाख १४ हजारांपैकी ९८,४०४ कृषिपंपधारकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. 
सद्यःस्थितीत ‘एसएमएस’द्वारे ग्राहक क्रमांक व बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठ्याचा कालावधी वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. 

अशी करा नोंदणी
‘एसएमएस’ची भाषा बदलण्यासाठी मराठीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) १ तर इंग्रजीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) २ असे टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा लागेल. तसेच महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.