25 हजार 676 विद्यार्थ्यांना प्रवेश
पुणे - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित गुणवत्ता यादीत सुमारे 25 हजार 676 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यात पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय सुमारे आठ हजार 552 विद्यार्थ्यांना मिळाले आहे. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना येत्या शनिवारपर्यंत (ता.21) महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. त्यानंतर तिसरी नियमित गुणवत्ता यादी येत्या गुरुवारी (ता.26) सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 285 महाविद्यालयांमधील 663 शाखांसाठी एकूण 96 हजार 320 जागा आहेत. या जागांसाठी एकूण 75 हजार 939 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. पहिल्या फेरीत सुमारे 41 हजार 961 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता, त्यातील 19 हजार 88 विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश घेतला. आता दुसऱ्या फेरीत 25 हजार 676 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.
अकरावीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेश घेतला असेल आणि त्यानंतर तो रद्द केल्यास एकूण शुल्कातील केवळ दोनशेच रुपये हे सेवाशुल्क म्हणून आकारता येईल. महाविद्यालयांनी उर्वरित सर्व रक्कम विद्यार्थ्यांना परत करावी.
- मीनाक्षी राऊत, प्रभारी उपसंचालक, शिक्षण विभाग
* दुसऱ्या फेरीतील प्रमुख महाविद्यालयांतील कट ऑफ (खुला वर्गासाठी टक्केवारी) :-
महाविद्यालयाचे नाव : विज्ञान : वाणिज्य : कला
- लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय : 96.20 (अनुदानित), 92.60 (विनाअनुदानित) : 83.80 : ---
- फर्ग्युसन महाविद्यालय : 95.80 : --- : 95.80 (इंग्रजी), 73 (मराठी)
- बीएमसीसी : --- : 94.40 (अनुदानित), 94 (विनाअनुदानित) : ---
- मॉडर्न महाविद्यालय : 93.40 : 88.40 : 52.80(मराठी)
- डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : 93.20 : 86.20 : ---
- सिम्बायोसिस महाविद्यालय : - : 91.40 : 94.60 (इंग्रजी)
- गरवारे महाविद्यालय : 91.40 : 92 : 50
- नौरोसजी वाडिया महाविद्यालय : 89 (अनुदानित), 84.80 (विनाअनुदानित) : --- : 89 (इंग्रजी),47.80 (मराठी),
- नेस वाडिया महाविद्यालय : --- : 85.20 (अनुदानित), 80.60 (विनाअनुदानित) : ---
(शहरातील महाविद्यालयांचा कट ऑफची संपूर्ण यादी पाहा "ई-सकाळ'वर)
अकरावीच्या वेळापत्रकात झालेला बदल -
तपशील : तारीख : वेळ
*दुसरी फेरीतील प्रवेश
- दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : 21 जुलैपर्यंत : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- उर्वरित रिक्त जागांची यादी : 23 जुलै : सकाळी 11 वाजता
- भाग एक आणि भाग दोन भरण्याची मुदत : 23 आणि 24 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
* तिसरी फेरी
- तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 26 जुलै : सकाळी 11 वाजता
- तिसऱ्या फेरीतील प्रवेश : 26 ते 28 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- रिक्त जागांची यादी जाहीर करणे : 30 जुलै : सकाळी 11 वाजता
- भाग एक आणि भाग दोन भरण्याची मुदत : 30 आणि 31 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
* चौथी फेरी
- चौथी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 2 ऑगस्ट : सकाळी 11 वाजता
- चौथ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : 2 ते 4 ऑगस्ट : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची माहिती महाविद्यालय स्तरावर अपलोड करणे : 6 ते 9 ऑगस्ट
विद्यार्थी-पालकांसाठी सूचना -
- प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून प्रवेश निश्चित करावा.
- सर्व फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
- पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयात मिळाले असतानाही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज चौथ्या फेरीपर्यंत "ब्लॉक' होईल.
|