नवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा हिरमोड निश्चित झाला असला तरी सामान्यांनी मात्र समाधान व्यक्त करीत सुटकेचा निश्वास टाकला. सांगवी पोलिसांच्या कडक, ठाम आणि नियोजनबध्द निर्णयामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणूकीतून डीजे या कर्कश: ध्वनीयंत्रेनेचे विसर्जनच झाले असे म्हणावे लागेल.
कालच्या अनंत चतुर्दशीला दुपारी तीन नंतरच सांगवी पोलिस ठाण्यातील हद्दीतील गणेश मंडळांना पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नोटीशी दिल्या. या नोटीशी देत असताना पोलिसांनी त्याचे फोटो काढले व डीजे ध्वनी यंत्रणा ताब्यात घेतली. त्यामुळे काही ठिकाणी पोलिस व कार्यकर्त्ये यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ढोलताश्यांच्या पथकांकडे धाव घेतली. परंतु ऐन वेळी ढोलताश्यांची पथके उपलब्ध होत नव्हती, जी होत होती ती चढ्या भावाने सुपारी सांगत होती, त्यातच एवढाच वेळ वाजविणार तेवढाच वेळ वाजविणार यावरही ही पथके चांगलीच भाव खाऊन गेली.
ध्वनी यंत्रणेच्या चार बेस चार टॉप, नंतर दोन बेस दोन टॉप अशा परवानगी आहे असे मंडळे समजत होती. परंतु ऐनवेळी बंदी आल्याने ढोलताशा पथकेही उपलब्ध झाली नाही. गृहनिर्माण वसाहतींनाही ध्वनी यंत्रणा रस्त्यावर वाजू दिली नाहीत. त्यामुळे काहीं मंडळांनी टाळ्या वाजवत तर काहींनी देवघरातील घंटा वाजवित गणेश विसर्जन केले.
सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख मोहन शिंदे म्हणाले, "उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डिजे कोठेही वाजला नाही. गावठाणाल्या एका मंडळाची डीजे ची गाडी ताब्यात घेतली व विसर्जनानंतर सोडून दिली. गणेशोत्सव काळात ज्या मंडळांनी पोलिस, महापालिकेच्या परवानग्या घेतल्या नाहीत अशा 188 मंडळांवर कारवाई केली आहे. शासणाच्या आदेशांचे पालन न केल्याचा पश्चाताप आता त्यांना येथून पुढे सुरू होईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.