पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक 26 येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम अद्याप अर्धवट आहे. 37.5 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), आचार्य अत्रे रंगमंदिर (संत तुकारामनगर) ही नाट्यगृहे सध्या नूतनीकरणासाठी बंद आहेत. त्यामुळे सध्या नाटकांसाठी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर (पिंपळेगुरव) आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) ही दोनच नाट्यगृहे उपलब्ध आहेत. पर्यायाने, नाट्य कलाकार आणि नाट्यप्रेमींचा हिरमोड होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर, प्राधिकरणातील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाची उभारणी लवकर होण्याची अपेक्षा होती. मात्र, या नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता नाट्य कलावंत आणि नाट्यप्रेमींना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
नाट्यगृहाच्या कामाला ऑगस्ट 2016 मध्ये सुरवात झाली. 768 आसन क्षमतेचे मुख्य नाट्यगृह, 220 आसन क्षमतेचे मिनी नाट्यगृह, 200 आसन क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल, खुला रंगमंच, कलाकारांसाठी 12 खोल्या (गेस्ट रूम), रेस्टॉरन्ट आदी कामे सुरू आहेत. नाट्यगृहाच्या येथे 400 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय केली जाणार आहे.
"नाट्यगृहाचे स्थापत्यविषयक काम फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर, नाट्यगृहाच्या इंटेरियरचे काम सुरू होईल. संबंधित काम पूर्ण होण्यासाठी तिथून पुढे सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे."
- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.