पिंपरी - शहरातील फेरीवाल्यांचे पालिकेने २०१२-१३ मध्ये सर्वेक्षण केले. त्यात पात्र ठरलेल्या काहींची बायोमेट्रिक नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. उर्वरितांची नोंदणी करण्याचे काम पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू असून २९ सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रिक करून घ्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांचे सर्वेक्षण करून हॉकर्स झोन निर्माण करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. त्यासाठी टपरीधारक, पथारीवाले, हातगाडीवर व्यवसाय करणारे यांचे २०१२-१३ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पात्र ठरलेल्यांची बायोमेट्रिक नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात येणार होते. त्यानुसार काम सुरू झाले होते. मात्र, हॉकर्सची जागा निश्चित होत नसल्याने व फेरीवाल्यांची संख्या अधिक असल्यामुळे नोंदणी प्रलंबित राहिली. अशा पात्र व्यक्तींची नोंदणी करण्याचे काम पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू आहे.
आधार कार्ड आवश्यक
बायोमेट्रिक नोंदणी करण्यासाठी फेरीवाल्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे. २०१२-१३ च्या सर्वेक्षणात पात्र ठरलेले मात्र, नोंदणी न झालेल्यांनी कागदपत्रांसह सार्वजनिक सुटीचे दिवस सोडून सकाळी दहा ते सायंकाळी पावणे सहा या वेळेत उपस्थित राहून ती करून घ्यावी. २९ सप्टेंबरनंतर कुणाचीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.