भोसरी परिसरात विजेचा खेळखंडोबा 

भोसरी परिसरात विजेचा खेळखंडोबा 
Updated on

भोसरी - गवळीमाथा गुलाब पुष्प उद्यानाजवळील टेल्को रस्त्यालगत महावितरणकडून शुक्रवारी (ता. 11) केबल दुरुस्तीसाठी जेसीबीद्वारे खड्डा खोदताना झाड उन्मळून पडले. त्यामुळे उद्यान विभागाने केलेल्या कारवाईत जेसीबी आणि क्रेन ताब्यात घेतले. त्यामुळे केबल दुरुस्तीचे काम बंद राहिले. त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला. पाण्याचीही गैरसोय झाली. महापौर नितीन काळजे यांच्या मध्यस्थीनंतर जेसीबी, क्रेन महावितरणकडे सोपविल्याने काम पुन्हा सुरू झाले. सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला. 

घामाघूम झालो, पाणीही गेले ... 
यशवंतनगरमध्ये वीज गेल्याने हाल झाले. वरच्या मजल्यावर पाणीच पोचले नाही, अशी तक्रार दीपक जावळे, परमेश्वर ठाणांबीर, कुमार चौधरी, ऍड. नीलेश नगराळे, शशांक शिंदे यांनी केली. आर्थिक नुकसान झाल्याचे लघुउद्योजक राजेंद्र पोफळे, वसंत पाटील, दिलीप पोखरकर यांनी सांगितले. 

महापौर काळजे म्हणाले, ""हे झाड मुद्दामहून पाडले नाही. पुनर्वसनाच्या अटीवर जेसीबी व क्रेन महावितरणला परत देण्याच्या सूचना उद्यान विभागाला दिल्या.'' 

मुळे केबलमध्ये अडकल्याने झाड पडले. यात महावितरणची चूक नव्हती. या विषयी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. 
- मदन शेवाळे, कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी विभाग 

झाडाच्या अडथळ्याविषयी कळविले असते तर अगोदर फांद्या छाटल्या असत्या. 
- सुरेश साळुंके, मुख्य उद्यान अधीक्षक, पालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.