मोरया गोसावी मंदिर परिसरातून टनभर कचरा जमा

मोरया गोसावी मंदिर परिसरातून टनभर कचरा जमा
Updated on

नवी सांगवी : मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी गणपती मंदिर आणि पवना नदी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून गणपती मंदिर, बाजूचा परिसर व नदीपरिसरातून सुमारे एक टन कचरा जमा करण्यात आला.

शनिवारी ( ता. ९ ) रोजी सकाळी राबविलेल्या या अभियानात कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वच्छता अभियान उपक्रमाबाबत बोलताना गोपाळ माळेकर म्हणाले, की मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने हा आपला तिसरे स्वच्छता अभियान आहे. पहिले स्वच्छता अभियान तीर्थश्रेत्र आळंदी येथे इंदायणी नदीकाठी घेण्यात आले. तेथे एक टन कचरा जमा करण्यात आला होता. तीर्थश्रेत्र देहू गाव इंद्रायणी नदी या ठिकाणी दुसर्‍या स्वच्छता अभियानामध्ये दोन टन कचरा गोळा करण्यात आला आणि चिंचवडगावामध्ये श्री मोरया गोसावी गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामध्ये नागरिकांचे विशेष सहकार्य मिळाले.

बिभिषण चौधरी म्हणाले, ''या अभिनव उपक्रमात प्रत्येक महिन्यातील पहिला रविवार स्वच्छता अभियानाचा हा संकल्प खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. सामाजिक बाधिलकी जपून सर्व एकत्र येऊन या कार्यात आनंदाने सहभागी होतात. ही अत्यंत आनंदाची  गोष्ट आहे. आपला कचरा दुसर्‍याच्या दारात टाकू नये, कचर्‍याची विल्हेवाट आपली आपणच लावावी, आपल्या देशात स्वच्छता असावी, नागरिक रोगराईपासून मुक्त असावेत, हे कार्य कृतीतून दाखवून दिले आहे. अशा पद्धतीने काम केले तर नक्कीच ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ होऊ शकेल, असेही ते म्हणाले. शेवटी राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी नगरसेवक अ‍ॅड. मोरेश्वर शेंडगे, नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका करुणाताई चिंचवडे,  मराठवाडा जनविकास संघ चँरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, पि .ची .शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र चिंचवडे, श्री मोरया गोसावी गणपती मंदिर देवस्थान विश्‍वस्त रमेश रबडे, दीपक जाधव, रोहित भोरे, आदिती निकम, दिगंबर सुरवसे, प्रशांत रोंढे, रंजीत घुमरे, अविनाश राठोड, संजय घुमरे  आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.