खेकडा खाद्य महोत्सवास खव्वयांचा उदंड प्रतिसाद

खेकडा खाद्य महोत्सवास खव्वयांचा उदंड प्रतिसाद
Updated on

जुनी सांगवी : आदीवासी पध्दतीची पाककृती,मसाला युक्त रोमाने भरून वाफेवर शिजवलेले खेकडे,पेंध्ये व कुंड्यांचे सुप..लाल तिखटाचा झणझणीत लाल रस्सा...सोबत चुलीवर केलेल्या बाजरी,नाचणीच्या भाकरी.. आदीवासी पाककलेनीयुक्त खेकडा महोत्सवातील खेकडा जेवणास पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खव्वयांनी उदंड प्रतिसाद दिला.

आदिवासी महिला भगिनींच्या आदिम यंग महिला बचत गट महासंघाच्या एकुण चाळीस गटाने एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे खेकडा महोत्सवाचे आयोजन केले होते. हा खेकडा महोत्सव नुकताच नवरात्र उत्सव संपल्याने खव्वयांसाठी पर्वणी ठरला.

आदिवासी भागातून शहरात आलेल्या आदिवासी महिला पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. मावळ, आंबेगाव, खेड, जुन्नर या डोंगराळ भागात ओढे, शेती, डोंगर कड्या कपारीतून मुबलक व याच भागात सापडणारे चिंबोरी जातीचे काळे खेकडे सापडतात.

आदिवासी महिलांचे उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतात. आदिवासी पाककृतीच्या साह्याने मसालायुक्त भाजलेल्या बाजरीला दळून हे खेकडे चुलीवर वाफेवर शिजवले जातात. याच बरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत पिण्यायोग्य शिंगडे व कुड्यांचे सुप..सोबत बाजरी,नाचणीची भाकरी..गावराण हातावर सडलेला तांदळाचा भात असा आदिवासी जुनी बाज असलेला पाककलेचा चुलीवरच्या भोजनाचा खमंग आस्वाद घेण्यासाठी खव्वयांनी,गर्दी केली होती.

याबाबत महासंघाच्या सौ.सीता किर्वे म्हणाल्या,आदिवासी भागातील नैसर्गिक साधन संपत्तीला योग्य बाजारभाव मिळावा,यातुन महिला भगिनिंना रोजगार मिळावा,महिला स्वावलंबी व्हाव्यात.याचबरोबर शहरी नागरीकांनी फास्टफुड खाण्यापेक्षा महिन्यातुन किमान दोनवेळा नेसर्गिकरित्या संवर्धित केलेले भोजन खाणे हे आरोग्यासाठी उपयुक्त आहे.खेकडे खाण्याचे शास्रीय फायदे ही यावेळी महिलांनी सांगीतले.याबाबत शशिकला झांजरे म्हणाल्या,खेकड्यामधे असलेल्या मिनरल्स, ओमेगा, फँटी अँसिडस, झिंक, व्हिटँमिन व उच्च प्रतीच्या प्रोटीन्समुळे मधुमेह, कॅन्सर, त्वचा विकार, सांधेदुखी व रक्तदाबासारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते. या आजारावर खेकडे सेवनाने फायदा होतो.

आदीम यंग ग्लँडीएटर्सचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.देवराम चपटे म्हणाले, सर्व चाळीस गटातील महिला या उपक्रमात एका कुटुंबासारखं काम करतात. यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, दिघी, धानोरी, सांगवी, किवळे, बोपखेल आदी भागात वास्तव्यास असलेल्या महिला सहभागी आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन मावळ भागात प्रथम खेकडा महोत्सव सुरू करणारे प्रा.सुरेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे श्री अरूण पवार, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.आण्णाभाऊ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सव यशस्वितेसाठी मिना डामसे,शैला बुरूडे,धोंडाबाई कोरके,कांताबाई वालकोळी,कुंदा लोहकरे,नंदा लांडे,पुष्पा भालचिम,गिता तरपाडे आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.