जैव कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या डॉक्‍टरला पाच हजारांचा दंड 

pimpri
pimpri
Updated on

पिंपरी : वैद्यकीय क्षेत्रातील निर्माण होणारा जैविक कचरा नष्ट करण्याचे नियम कायद्याने घालून दिलेले आहेत. महापालिका त्यासाठी लाखो रुपये दरवर्षी खर्च करते. जैविक कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची गाडी असते. मात्र, अनेक दवाखाने, रुग्णालय व मेडिकलवाले याकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने रस्त्यावर जैव कचरा फेकणारा डॉक्‍टर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचाट्यात सापडला असून, त्याला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. डॉ. अभिजित कांबळे असे दंड केलेल्या डॉक्‍टरचे नाव आहे.

महापालिका "ग' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 24 मधील 16 नंबर बीआरटी मार्गावर टाकलेल्या जैविक कचऱ्यात इंजेक्‍शनच्या घातक सुई आढळून आल्या. मुकादम विजय माचरे यांनी आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल यांना कळवल्यानंतर चन्नाल यांनी कचऱ्याची पाहणी केली. त्यात डॉ. कांबळे यांच्या थेरगाव-पडवळनगर येथील जीवन क्‍लिनिकच्या पावत्या आढळून आल्या.

याबाबत आरोग्य निरीक्षकांनी कांबळे यांना त्या ठिकाणी बोलावून जैविक कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी जागेवर पाच हजारांचा दंड केला. तसेच यापुढे जैविक कचरा गोळा करणाऱ्या गाडीतच जैविक कचरा टाकावा, अन्यथा दहा हजारांचा दंड केला जाईल. अशी सक्त ताकीद आरोग्य निरीक्षक चन्नाल यांनी कांबळे यांना दिली. दरम्यान, सर्वत्र स्वच्छ भारताबाबत जनजागृती सुरू आहे. रुग्णांना स्वच्छतेचे धडे देणारे डॉक्‍टरच जर स्वच्छतेबाबत उदासीन असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल. असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.