पुणे : अखेर लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी दूध पुरवठा सुरळीत; मात्र...

Milk
Milk

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झालेल्या कडक लॉकडाउनचच्या काळात बुधवारी (ता.१५) शहरातील दूध  पुरवठा सुरळीत झाला आहे. लॉकडाउनमध्येही दूध वितरणाला परवानगी असल्याने कडक लॉकडाउनच्या आजच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे दूध पुरवठा सुरळीत होता. आज शहरात सुमारे दहा लाख लिटर दूधाचे वितरण झाल्याचा प्राथमिक अंदाज विविध दूध संघांनी वर्तविला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे १५ लाख लिटर पिशव्यांमधील दूध वितरित होत असते. मात्र मागील तीन महिन्यांपासून दररोजच्या मागणीत ५ लाख लिटरने घट झालेली आहे. मिठाई दुकाने, हाॅटेल्स आणि चहा टपऱ्या आणि शाळा महाविद्यालये बंद असल्याने ही घट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) कामकाज आजही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. लॉकडाउनमधील नियमांचे पालन करत, शेतकऱ्यांकडील दूध घेण्यात आले आणि ग्राहकांना मागणीनुसार दिवसभर दूध उपलब्ध करुन देण्यात आल्याचे कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. 

आजही पुणेकरांना लॉकडाउनमध्येही नेहमीप्रमाणे चितळे दूध उपलब्ध करुन देण्यात आले. दूधाचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला. दूधाचा कसलाही तुटवडा नसल्याचे चितळे डेअरीचे भागीदार गिरीश चितळे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com