पवना धरणामध्ये ५० टक्के साठा
पवनानगर - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी (ता. १३) धरण परिसरात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाची पाणीपातळी १९९२.२० फूट झाली. १ जूनपासून धरणामध्ये १३२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण ५१.७१ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणामध्ये ४८.०१ टक्के पाणीसाठा होता. १३ ऑगस्ट रोजी धरण १०० टक्के भरले होते. या पावसामुळे भातलावणी खोळंबली आहे; परंतु पूर्ण झालेल्या भातलावणीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकरी सांगतात.
कासारसाई ६० टक्के भरले
सोमाटणे - कासारसाई धरणातील पाणीसाठ्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, धरण ६० टक्के भरले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पवनमावळात पावसाचा जोर वाढल्याने कासारसाई धरणाच्या पाणी पातळीत दहा टक्क्यांनी वाढ झाली. गुरुवारी दिवसभरात धरण परिसरात ३० मिलिमीटर एकूण ४०० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने धरणात उपयुक्त पाणीसाठा ९.४० दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा १०.७० दशलक्ष घनमीटर झाला असून, धरण ६० टक्के भरले आहे. पुसाणे, आढले, मळवंडी धरण परिसरातही संततधार पाऊस सुरूच असून येथे दिवसभरात ३३ मिलिमीटर तर एकूण ४७० मिलिमीटर पाऊस झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.