पिंपरी: आगीत मंडप डेकोरेशनचे गोदाम जळून खाक

fire in pimpri
fire in pimpri
Updated on

पिंपरी - मंडप डेकोरेशनच्या साहित्याला लागलेल्या आगीत गोदाम जळून खाक झाले. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी कोट्यवधी रुपयांने नुकसान झाले आहे. सुमारे सात तासानंतर ही आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. ही घटना रविवारी रात्री चिंचवडगाव येथे घडली.

चिंचवड येथील अहिंसा चौक येथे विजयनगर झोपडपट्टीच्या बाजूला एस.एस. मंडप डेकेरेटर्स यांचे साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. या गोदामाला रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला 11.20 वाजताच्या सुमारास मिळाली. तोपर्यंत आगीने रौद्र स्वरूप धारण केले होते. चार मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा जात असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीचे स्वरूप पाहता आणखी मदत पाठविण्यास सांगितले. प्रथम तळवडे, भोसरी, प्राधिकरण, रहाटणी या अग्निशामक केंद्रातील प्रत्येकी एक बंब आणि अग्निशामक मुख्यालयातील तीन बंब असे एकूण सात बंब आणि पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले.

मात्र लाकडी बांबू, कापड अशा प्रकारचे साहित्य गोदामात असल्याने आग झपाट्याने वाढत चालली होती. यामुळे हिंजवडी एमआयडीसी, टाटा कंपनी, बजाज कंपनी यांच्याच्याही अग्निशामक विभागाचे बंब मागवून घेण्यात आले. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आग आटोक्‍यात आली. मात्र सकाळी सहा वाजेपर्यंत धुमसणारी आग विझविण्याचे काम सुरू होते.

स्थानिक तरुणांची झाली मदत
गोदामाच्या आसपास राहणाऱ्या तरुणांनी गोदामाचा दरवाजा तोडण्यासाठी अग्निशामक विभागाला मदत केली. तसेच गोदामात असलेल्या तीन वाहनांपैकी एक छोटा टेम्पो व दुचाकी उचलून बाहेर आणली. मात्र एक दुचाकी जळून खाक झाली.

...तर मोठी दुर्घटना झाली असती
आग लागलेल्या गोदामाच्या बाजूलाच विजयनगर झोपडपट्टी आहे. जर आगीची एकजरी ठिणगी या ठिकाणी पडली असती तर या झोपडपट्टीलाही आग लागली असती. येथील बहूतांश घरात सिलिंडर आहेत. जर झोपडपट्टीला आग लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र झोपडपट्टीपर्यंत आग पोचू नये म्हणून अग्निशामक विभागही खबरदारी घेत होता. येथील नागरिकांनी रस्त्यावरच रात्र जागून काढली. चिंचवडगाव ते चिंचवड स्टेशन हा रस्ताही वाहतूकीसाठी बंद केला होता. ज्याठिकाणी पहिल्यांदा आग लागली त्या ठिकाणी एकही लाईटचे कनेक्‍शन नव्हते. यामुळे शॉर्टसक्रीटमुळे आग लागली नसावी, अशी माहिती गोदामाचे व्यवस्थापक गणेश घाडके यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.