सुविधांचा ‘डोस’ हवा

सुविधांचा ‘डोस’ हवा
Updated on

पिंपरी - महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी प्रमुख आजारांशी संबंधित औषधे बऱ्याचदा बाहेरून विकत घ्यावी लागतात. पार्किंगसाठी असलेली अपुरी व्यवस्था, रुग्णाच्या नातेवाइकांना बसण्यासाठी कमी प्रमाणात असलेल्या खुर्च्या तर, उपलब्ध डॉक्‍टरांचे अल्प प्रमाण अशा कोंडीत हे रुग्णालय सापडले आहे. 

सद्य:स्थिती 
रुग्णालयात ७५० खाटांची क्षमता; दररोज दीड हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात तपासणी
वैद्यकशास्त्र (मेडिसीन), विविध शस्त्रक्रिया, स्त्री रोग, अस्थिरोग आदींची सोय
मेंदूविकारावरील शस्त्रक्रिया व उपचार, मूत्ररोगावरील उपचार उपलब्ध 
अतिदक्षता विभाग - ३ (सध्या- ३५ खाटांची सोय; प्रस्तावित - १८ खाटा) शस्त्रक्रिया कक्ष - ८
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ७० ते ८० टक्के रुग्णांवर होतात मोफत उपचार 

समस्या 
उपचारासाठी फक्त ३० ते ३२ डॉक्‍टर उपलब्ध
पिण्याच्या पाण्यासाठी सध्या कमी प्रमाणात कुलर
वाहनांसाठी पार्किंगची अपुरी सोय
रुग्णाच्या नातेवाइकांना बसण्यासाठी खुर्च्यांची अपुरी व्यवस्था
रात्रनिवाऱ्याची सोय नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय 
छोट्या व कमी जागेत उपाहारगृह

या सुविधा करता येतील
सर्व औषधांचा पुरेसा साठा असावा 
मानसोपचार तज्ज्ञ, मेडिसीनसाठी हवे पूर्णवेळ डॉक्‍टर
कर्करोगावरील तज्ज्ञ डॉक्‍टर मिळाल्यास शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी करणे शक्‍य
मूत्ररोगावरील शल्यचिकित्सक, बालरोग विभागात हवे डॉक्‍टर
रुग्णालयातील प्रस्तावित पदव्युत्तर महाविद्यालयाच्या १० विभागांसाठी १०३ मंजूर डॉक्‍टरांची पदे भरल्यास रुग्णांची गैरसोय होईल दूर
पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालयात बसवावे पुरेसे कुलर
रुग्णाच्या नातेवाइकांना बसण्यासाठी हव्या पुरेशा खुर्च्या; हवी रात्र निवाऱ्याची सोय
 डॉक्‍टरांचे अंतर्गत वाद आपापसांत सोडवले जावे; राजकीय हस्तक्षेप नसावा

रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाइकांसाठी रात्र निवारा (नाईट शेल्टर), पुरेसे पार्किंग, रुग्णांना बसण्यासाठी सोय असावी. बाह्य रुग्ण आणि आंतर रुग्ण विभागातील तपासणी कक्ष वाढवावे. डॉक्‍टर आणि परिचारिका यांची संख्या वाढवावी. 
- योगेश बहल, नगरसेवक

रुग्णालयात डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी वर्ग वाढवावा. निवासी आणि तज्ज्ञ डॉक्‍टर मिळावे. रुग्णालयातील पाण्याच्या पुनर्वापरासाठी उभारलेल्या प्रकल्पाचा योग्य वापर व्हावा. प्रसूती विभागात चांगल्या सुविधा मिळाव्यात.   
- सुजाता पालांडे, नगरसेविका

चव्हाण रुग्णालयात दंतोपचारासाठी रूट कॅनलची सोय आहे. मात्र, कॅप घालण्याची सुविधा नाही. ही सोय व्हायला हवी. रुग्णालयाचे फायर ऑडिट होणेदेखील गरजेचे आहे.
- संगीता गायकवाड, गृहिणी

रुग्णालयासाठी असलेल्या पार्किंगच्या जागेत नव्याने दहा मजली इमारत उभारली जाणार आहे. त्यामध्ये रुग्णांच्या नाईट शेल्टर, चार मजली पार्किंग, डॉक्‍टरांसाठी वसतिगृह अशा सुविधा दिल्या जातील. रुग्णालयात सुमारे ७५० ते ८०० प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. काही प्रमाणात औषधांची कमतरता जाणवते. आवश्‍यक तज्ज्ञ डॉक्‍टरांबाबत पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. 
- डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.