पिंपरी - शहरातील नागरिकांना पासपोर्ट काढणे सुसह्य व्हावे, यासाठी पिंपरीतील टपाल कार्यालयात सुरू केलेल्या सेवेत लवकरच बदल करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत याचे रूपांतर पूर्णवेळ पासपोर्ट सेवा केंद्रात होणार असून, त्यामुळे नागरिकांना जलदगतीने सेवा मिळणार आहे.
सद्यःस्थिती
टपाल कार्यालयात सुरू असणारी सुविधा होणार पासपोर्ट कॅम्प
कार्यालयात स्वीकारणार पासपोर्टचे अर्ज
अर्ज स्वीकृतीनंतर प्रक्रियेसाठी पाठविणार मुंढवा पासपोर्ट कार्यालयाकडे
प्रत्यक्षात पासपोर्ट हातात पडण्यास लागणार २० ते २५ दिवसांचा कालावधी
टपाल कार्यालयामध्ये दररोज स्वीकारणार २७५ अर्ज
हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमुळे पासपोर्ट काढण्यासाठी सुविधा उपयुक्त
पासपोर्ट काढण्यासाठी मिळते १५ दिवसांनंतरची अपॉइंटमेंट
गेल्या वर्षी एक एप्रिलपासून टपाल कार्यालयात सुविधा
आतापर्यंत २८ हजार ९०० जणांचे पासपोर्टसाठी अर्ज
असे होणार बदल
टपाल कार्यालयातील सुविधा आता पूर्णवेळ
पासपोर्ट कार्यालयाकडून ग्रॅन्टिंग अधिकाऱ्यांची होणार नेमणूक
पासपोर्टची पूर्ण प्रक्रिया येथेच होणार
पासपोर्ट मिळण्याचा कालावधी कमी होणार
पासपोर्ट अपॉइंटमेंटमध्ये होणार वाढ
व्हेरिफिकेशन अर्ज इथूनच जाणार
बाणेरला मिनी पासपोर्ट सेवा केंद्र
शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, विशालनगर, हिंजवडी या भागातील नागरिकांना जूनपासून पासपोर्ट काढणे होणार अधिक सोईस्कर
बाणेरमधील लिंक रोडवर नवीन चार मजली पासपोर्ट कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम वेगात सुरू
मिनी पासपोर्ट सेवा केंद्राचा नागरिकांना होणार फायदा
पिंपरी टपाल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या सहा महिन्यांत पूर्ण वेळ सेवा केंद्र म्हणून त्यात बदल होईल. पासपोर्ट कार्यालयाकडून तिथे ग्रॅन्टिंग अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पासपोर्ट लवकर मिळणे सहज शक्य होणार आहे.
- जयंत वैशंपायन, प्रभारी पासपोर्ट अधिकारी, पुणे विभाग
पिंपरी टपाल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट केंद्राचा शहरातील नागरिकांना चांगला फायदा होत असला तरी पासपोर्ट हातात पडण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.
- प्रशांत पवार, नागरिक
पिंपरीतील कार्यालयात पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध केल्याचा शहरातील नागरिकांना फायदा होत आहे. पूर्णवेळ पासपोर्ट केंद्र म्हणून ते लवकर सुरू केल्यास नागरिकांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे.
- रवी मराठे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.