पाइप गॅसचे नवीन ४० हजार जोड

पाइप गॅसचे नवीन ४० हजार जोड
Updated on

पिंपरी - शहरात दिवसेंदिवस पाइप गॅस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) २०१८ मध्ये ४० हजार नवीन गॅसजोड देण्याचे नियोजन केले आहे. हिंजवडी, चाकण या परिसरांतही ही जोड वाढवण्याची योजना तयार करण्यात आली असल्याचे एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी सांगितले. 

पाइपलाइन गॅसचा वापर करणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हा गॅसपुरवठा करण्यासाठी आवश्‍यक असणारी पाइपलाइन टाकण्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आहे. सध्या ज्या परिसरात हे काम सुरू आहे, ते लवकर मार्गी लावण्यात येणार आहे. एमएनजीएलने आतापर्यंत शहरात ४० हजार घरांना पाइप गॅसचा पुरवठा केला आहे. एलपीजी गॅसच्या तुलनेत ही सुविधा चांगली असल्यामुळे शहरातील अनेक मोठ्या सोसायट्या पाइपलाइन गॅसचा पुरवठा करण्याची मागणी करत असल्याचे तांबेकर म्हणाले. 

पुढील वर्षांत एमएनजीएलने पुणे आणि परिसरांत एक लाख ३० हजार पाइप गॅसजोड देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यापैकी ४० हजार कनेक्‍शन्स पिंपरी-चिंचवड परिसरात देण्यात येणार असून, उर्वरित कनेक्‍शन्स पुणे आणि अन्य भागांत देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवे सहा सीएनजी स्टेशन
शहरात पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या शहरात २२ सीएनजी पंप कार्यरत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये नव्या सहा पंपांची भर पडणार आहे. हिंजवडी, वाकड या भागांत नवीन पंप उभारण्यात येणार आहेत. सीएनजी गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे अनेकजण सीएनजीवरील वाहन घेण्यास प्राधान्य देत आहेत. स्कूटरला सीएनजी किट लावण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ए. एम. तांबेकर यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.