पुनर्वसन प्रकल्पातच दारूभट्टी, मटका अड्डा

भाटनगर, पिंपरी - पाण्याच्या या टाकीमध्ये साठविले जाते दारूचे रसायन.
भाटनगर, पिंपरी - पाण्याच्या या टाकीमध्ये साठविले जाते दारूचे रसायन.
Updated on

पिंपरी - भाटनगर, बौद्धनगर पुनर्वसन प्रकल्पात गेली काही वर्षे राजरोस गावठी दारूभट्ट्या आणि मटक्‍याचे अड्डे सुरू आहेत. याची महापालिका प्रशासन आणि पोलिस यांना माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे. 

महापालिकेने झोपडीधारकांना पक्की घरे मिळावी म्हणून वीस वर्षांपूर्वी हा पहिलाच पुनर्वसन प्रकल्प राबविला. येथील काही घरांमध्ये नागरिकांनी हातभट्टीची दारू गाळून तिथेच विक्री करण्याचा धंदा थाटला. इमारतींच्या आजूबाजूलाही दारूभट्ट्या सुरू आहेत. याबाबत परिसरातील नागरिक वारंवार तक्रार करतात. पोलिस अधूनमधून यावर कारवाईचे नाट्य करतात. यामुळे परिसरात कायमच वादावादी आणि मारहाणीच्या घटना घडतात. याशिवाय रिव्हर रोडकडील कमानीजवळील टपऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मटका अड्डे जोमात सुरू आहेत. या अड्ड्यांवर नेहमी गुन्हेगारांचा वावर असतो. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही सर्व बाब पोलिसांना माहिती असूनही त्यावर कारवाई होत नाही.  

दोन इमारतींच्या मध्यभागी रिकामी जागा असून या भागात स्थानिक नागरिकच कचरा टाकतात. या कचऱ्यामध्येच पाण्याची टाकी असूनही त्याची पर्वा येथील नागरिक करीत नाहीत. सध्या रिकाम्या असलेल्या या टाकीचा उपयोग दारूचे कॅन ठेवण्यासाठी केला जातो. नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते.

नव्याने पुनर्वसन?
दरम्यान, या प्रकल्पातील लाभार्थ्यांनी आजवर एक रुपयाही स्वहिस्सा भरलेला नसताना, याच इमारती पाडून पुन्हा एकदा नव्याने पुनर्वसन व्हावे, असा प्रयत्न सुरू असल्याचे समजले.

झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने जरी पुनर्वसन केले असले तरी येथील स्वच्छतेची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. तसेच टपऱ्यांच्या अतिक्रमणांवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून कारवाई होणे आवश्‍यक आहे.
- योगेश कडुसकर, सहायक आयुक्‍त

पोलिसांकडून दारूभट्ट्या तसेच इतर अवैध धंद्या़ंवर नियमित कारवाई केली जाते. या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत माहिती मिळाल्यास त्यावरही कारवाई केली जाईल.
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.