दोनशे चालक ठेवतात दररोज जीपीएस बंद

Bus-Pune
Bus-Pune
Updated on

पुणे - पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर दररोज सुमारे २०० चालक जीपीएस यंत्रणा बंद ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यातील किमान १०० चालकांना दररोज प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. 

पीएमपी प्रशासनाने चार वर्षांपासून ऑटोमेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्याअंतर्गत ई-तिकिटिंगचीही माहिती मध्यवर्ती नियंत्रण कक्षात संकलित होते. दररोज मार्गावर किती बस धावत आहेत, याचीही माहिती या संगणकीकृत व्यवस्थेत दिसून येते.

पीएमपीच्या सर्व बसगाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. सुमारे १४५० बस सध्या मार्गावर धावत आहेत, असा प्रशासनाचा दावा आहे. प्रत्यक्षात पीएमपीच्या संकेतस्थळावर १२५० गाड्या मार्गावर धावत असल्याचे सोमवारी दिसून आले. त्याबाबत विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज सुमारे २०० चालक जीपीएस यंत्रणा सुरू करीत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांना डेपो स्तरावर प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यास प्रशासनाने सुरवात केल्याचे प्रशासनाने सांगितले. काही चालकांना पुरेसे प्रशिक्षण मिळालेले नाही, तर काही गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा नादुरुस्त झाली आहे, असे दिसून आले आहे. त्याचा डेपोस्तरावर आढावा घेण्यात येत आहे. जीपीएस यंत्रणा बंद असल्यामुळे मार्गावरील बसची संख्या कमी असल्याचे संकेतस्थळावर दिसत असल्याचे पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रविवारी एकूण १४४३ बस मार्गावर धावत होत्या. त्यात पीएमपीच्या ९८८, तर कंत्राटदारांच्या ६५३ पैकी ४५५ बसचा समावेश आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

चालक मोबाईलवर बोलल्यास 2000 रुपये दंड 
बस चालवत असताना चालक मोबाईलवर बोलत आहे, असे आढळल्यास त्याला २००० रुपये दंड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी हा दंड एक हजार रुपये होता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यात २००० रुपये दंडाला मंजुरी मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे पीएमपीच्या सूत्रांनी सांगितले. चालक मोबाईलवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रवासी व्हॉट्‌सॲपवरूनही प्रशासनाकडे पाठवू शकतील. त्यासाठीचाही दूरध्वनी क्रमांक दंडाची सुधारित रक्कम मंजूर झाल्यावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.