पोस्टमनवर अतिरिक्त भार

Postman
Postman
Updated on

पिंपरी - शहरातील टपाल कार्यालयांमध्ये पोस्टमनची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांनाही टपाल उशिराने मिळते. तसेच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोस्टमन त्रस्त झाले आहेत.

गेल्या १०-१२ वर्षांत शहर चोहोबाजूंनी विस्तारले आहे. १९९७ मध्ये महापालिकेत नव्याने १८ गावे समाविष्ट झाली. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढली; परंतु त्याप्रमाणात टपाल कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. थेरगाव, काळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. तेथे स्वतंत्र टपाल कार्यालयाची आवश्‍यकता आहे. 

चिंचवडगाव, पिंपरी कॉलनी, हिंजवडी, प्राधिकरण, भोसरीगाव, भोसरी औद्योगिक वसाहत, चिंचवड स्टेशन अशी १३  टपाल कार्यालये आहेत. या प्रत्येक टपाल कार्यालयात प्रत्येकी दोन-तीन पोस्टमनची संख्या कमी असल्याने तेथील पोस्टमनवर अतिरिक्त भार येतो. 

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना द्यावयाची कागदपत्रे टपालाने पाठविली जातात. त्यासाठी ५० रुपये अतिरिक्त शुल्कही घेतले जाते. खासगी कुरिअर सेवांची कार्यालये असली तरी अद्याप अनेकांना मासिके, कंपन्यांचे अहवाल, बॅंकेचे वार्षिक ताळेबंद आदी टपालानेच येतात. त्यामुळे पोस्टमनच्या कामात वाढ झाली आहे. शहर वाढल्याने सायकलचा वापर करणे आता शक्‍य नाही. त्यामुळे दुचाकीचा वापर करावा लागतो. त्यासाठी लागणारे पेट्रोल, देखभालीचा खर्चही त्यांना स्वत: करावा लागतो.

ग्रामीण भागात टपाल कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. ती झाल्यावर त्यापैकी काहीजण येत्या काही दिवसांत शहरी भागात कार्यरत करण्यात येणार आहेत. 
- एफ. बी. सय्यद, सहायक पोस्ट मास्टर जनरल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.