शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील तलावातून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळू उपशामुळे येथील स्थानिकांच्या शेतीसह ग्रामपंचायतीच्याही पाईपलाईन फुटल्या आहेत. तसेच परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
याबाबत शेतकरी व ग्रामपंचायतीकडून अनेकदा तहसीलदारांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावर ही जबाबदारी महसुलसह ग्रामपंचायतीचीही असल्याने पोलिसांच्या मदतीने ग्रामपंचायीतने संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. तर दुसरीकडे पोलिस प्रशासनही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. तर तलावाची मालकी असणारे पाटबंधारे खाते व अवजड वाहतुन होत असताना परिवहन विभागही डोळे असुन आंधळ्याची भूमिक घेवुन बसले आहे.यामुळे गावातील एकत्र आलेल्या वाळुमाफियांनी पैशाच्या व मनगटाच्या बळावर दिवसाढवळ्या बेसुमार वाळुची चोरी सुरु आहे.
यामुळे गेल्या वर्षभरापासून वाळूमाफियांचे पेव फुटले आहे.पाटबंधारे विभागांसह महसूल व पोलिस विभागकडूनच या उपशाला छुपा पाठींबा असल्यामुळे वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने स्थानिक शेतकर्यांनाही नाहक त्रास सोसावा लागत आहे. वाळूच्या वाहनांची सतत वर्दळ असल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतातील पाईपलाईनचे नुकसान झाले आहे.एवढेच काय तर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचेही अनेक वेळा नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे.
एकीकडे शासन वाळूमाफियांना मोका लावण्याची भाषा करत आहे. मात्र बारामतीत महसुलसह पोलिस, पाटंबधारे विभागाचे व परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारीच वाळूमाफियांना मोकळीक देत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. महसूल विभागाच्या या भूमिकेमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.सर्वसामान्य ग्रामस्थांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तलाठी यांनी गावातच राहणे आवश्यक..
याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जाती जमाती मोर्चाचे बारामती तालुकाध्यक्ष अँड.राजकिरण शिंदे म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासुन शिर्सुफळ परिसरातुन मोठ्या प्रमाणावर बेसुमार वाळु उपसा सुरु आहे.याबाबत अनेकवेळा संबंधितांकडे तक्रारी केल्या आहेत.मात्र त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.यामध्ये शासनाच्या लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे.शासनाने गावपातळीवरील गौनखनीजांची जबाबदारी सांभाळणारे गावकामगार तलाठी यांनी निवासस्थानासह कार्यलय बांधुन दिले आहे. मात्र प्रत्येकक्षात त्याचा वापर होत नसल्याने माफियांचे फावत आहे.
महसुलचे ग्रामपंचायतीकडे बोट..
याबाबत बोलताना सरपंच अतुन हिवरकर म्हणाले याबाबत तहसिलदारांपासुन जिल्हाधिकाऱ्यांपर्यत व तालुका पोलिस स्टेशनपासुन पोलिस अधिक्षकांपर्यत तक्रारी करण्यात आल्या.यावर बारामती तहसिलदार यांनी अवैध वाळुउपसा रोखणे हि ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याचे लेखी पत्र देत होत झटकले आहेत. मात्र सदर प्रकरणावर ग्रामपंचायतीला महसुल व पोलिसांचे कसलेच सहकार्य मिळत नसल्याने वाळुमाफिया यांचा फायदा घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.