सासवड : भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यात तालबध्द पदलालित्य करीत सासवड (ता. पुरंदर) च्या कलासिध्दी नृ्त्यालयाच्या मुलींनी समुद्रापार जाऊन दुबई (युएई) येथे रंग भरला. दुबईतील विनीता भाटिया यांच्या गोल्डन टॅलेंट म्युझिक अॅण्ड डान्स सेंटरच्या वतीने ही स्पर्धा नुकतीच झाली. त्यात सहभाग घेत.. कलासिध्दीच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला.
दुबईतील विनीता भाटिया या त्यांच्या गोल्डन टॅलेंट म्युझिक अॅण्ड डान्स सेंटरच्या वतीने दरवर्षी नृत्य स्पर्धा भरवितात. यंदा ही स्पर्धा 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान दुबईतील डेरा या उपनगरात अलकर्मा इन्स्टिट्युटमधील हाॅलमध्ये स्पर्धा झाली. त्यात भरतनाट्यमसह कथक, कुचीपुडी, मोहिनीअट्टम या चार शास्त्रीय नृत्य प्रकाराच्या स्पर्धा होत्या. त्यातील भरतनाट्यम प्राथमिक फेरी स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सासवड, हडपसर, पुणे, मुंबई व केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमधून आठ संघानी सहभाग घेतला. त्यातून 26 पर्यंतच्या सादरीकरणानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यात कलासिध्दीच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांक तामिळनाडूतील संघाने व तृतिय क्रमांक कर्नाटकातील संघाने मिळविला. कलासिध्दीच्या संस्थापक व नृत्य गुरु धनश्री लोमटे व मार्गदर्शक स्वानंद लोमटे यांच्याकडून गेली 16 वर्षे सासवडला भरतनाट्यम नृत्याचे वर्ग भरविले जातात. आता सासवडसह जेजुरी, हडपसर येथेही शाखा सुरु आहेत. `कलासिध्दी`ने दरवर्षी वर्धापनदिनास अशा नृत्यांचे शहरी भागात सादरीकरण करण्याचा उपक्रम राबविलाच. शिवाय अखिल भारतीय नृत्य संमेलन ते गेली दोन वर्षे भरवित आहेत. तर यंदा कलासिध्दीच्या चमुने दुबईपर्यंत मजल मारली व नृत्यात रंग भरताना.. उपविजेत्याचे बक्षिसही पटकाविले. या यशामुळे पुढील सिंगापूर येथे होणाऱया महाअंतिम फेरीत कलासिध्दीचा संघ सहभागी होण्यासही पात्र ठरला आहे.
दुबईतील भरतनाट्यम प्रकारातील स्पर्धेत कलासिध्दीच्या संघात सासवडच्या प्राजक्ता शिवराम जाधव, वैष्णवी अमोल रासकर, कल्याणी राजेंद्र जगताप, हडपसरच्या आर्या संभाजी दोरगे, हर्षिता प्रविण कदम, मोनिका विश्वास कांबळे या मुली होत्या. शिवाय त्यांच्या समवेत स्वतः गुरु धनश्री व स्वानंद लोमटे आणि निवडक पालक दुबईत उपस्थित होते. विशेष म्हणजे स्पर्धेबाहेरच्या कार्यक्रमात एक लावणी व एक गरबा नृत्यही विशेष सादरीकरण केले. सेंटरच्या संस्थापिक विनीता भाटिया यांनी सासवडच्या कलासिध्दीच्या मुलींचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातून परदेशात येऊन तुम्ही मुलींनी पहील्या संधीतच सोने केले. त्यातून तुम्हाला महाअंतिम फेरीत संधी मिळालीच. तसेच भविष्यात वाटचालीस हे बक्षिस प्रोत्साहन ठरेल. तर प्रतिक्रीयेत `सकाळ` शी बोलताना धनश्री लोमटे म्हणाल्या., सोळा वर्षांची मेहनत, सहभागी मुलींचा नृत्य शिकण्याचा ध्यास व आत्मविश्वास, नियमीत सराव यामुळे हे यश मिळाले. यापुढे कलासिध्दी नृत्यालय अधिक व्यापकपणे नृत्याचे धडे देत राहील. सहभागी शिकणाऱयांची संख्या येत्या वर्षभरात दुप्पट करु. बाहेरील पाहुणे प्रशिक्षकही अधिक प्रमाणात आणले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.