मोशी - वाहनांची ब्रेक चाचणी करणारा ट्रॅक मोशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे.
मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ब्रेक चाचणी ट्रॅक व्हावा अशी मागणी होती. ट्रॅक नसल्याने वाहनचालकांना पुण्यात जावे लागत होते. तसेच, येथील विविध चाचण्या इमारतीसमोरील वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरच कराव्या लागत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कार्यालयाच्या मागील बाजूस सुमारे एक कोटी रुपये खर्च करून २८० मीटरचा ब्रेक चाचणी ट्रॅक उभारण्यात आला आहे. ब्रेक चाचणीबरोबरच वाहनांचे इंजिन, स्टिअरिंग, हेडलाइट, टेललाइट, रिवर्स गिअर, वायफर्स आदींच्या चाचण्या घेण्यात येतात. तसेच, वाहनांचे पासिंग व शिकाऊ वाहनचालक परवाना बुकिंग, फी आकारणीही ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.
वाहनांच्या दृष्टीने ब्रेक चाचणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. पुणे शहरानंतर फक्त याच कार्यालयामध्ये असा ट्रॅक असल्याने जिल्ह्याच्या विविध भागांमधून वाहनचालक ही चाचणी करण्यासाठी येत आहेत. दिवसभरामध्ये तीनशेहून अधिक वाहनांची ब्रेक चाचणी करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.