पुणे - सांगवीतील मार्ग बदलेली बस वहातूक पूर्ववत करा

पुणे - सांगवीतील मार्ग बदलेली बस वहातूक पूर्ववत करा
Updated on

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीत गेली तिन महिन्यांपासुन रस्त्याच्या कामासाठी पुणे व इतर ठिकाणी बस वहातुकीचा मार्ग बदललेला आहे. वसंतदादा पुतळा बसस्थानकावरून गजानन महाराज मंदिर, शितोळेनगर प्रमुख रस्त्यावरून जाणारी बस वहातुक गेली तीन महिन्यांपासून सांगवीच्या बाहेरच्या रस्त्याने केली जात आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थी नागरीकांना मुख्य बसस्थानक अथवा दुसऱ्या टोकावरील बसथांब्यावर जावे लागत आहे.

गजानन महाराज मंदिर रस्ता सिंमेंट कॉंक्रिटिकरण करण्याच्या कामासाठी गेली तिन महिन्यांपासुन अंतर्गत भागातुन सुरू असणारी बसवहातुकीचा मार्ग बदलण्यात आलेला आहे.रस्त्याचे कॉंक्रिटिकरणाचे काम झाले असुन किरकोळ कामे शिल्लक आहेत. अभिनव नगर,जयमाला नगर मुळा नदी किनारा परिसरातील विद्यार्थी नागरीकांना बससाठी दुस-या टोकाला पवनानदी किनारा रस्त्यावरील बसथांब्यावर यावे लागते. यामुळे विद्यार्थी प्रवासी नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर उरकुन बसमार्ग पुर्ववत करावा अशी  मागणी विद्यार्थी व नागरीकांमधुन होत आहे. 

मला पुण्यात कॉलेजलला जावे लागते. प्रमुख रस्त्यावरील बसमार्ग बंद असल्याने  बससाठी लांबच्या थांब्याला जावे लागते.
-विनित गायकवाड, विद्यार्थी अभिनव नगर.

 रस्त्याचे कॉंक्रिटिकरणाचे काम पुर्ण झाले आहे.स्थापत्य विभागाला शिल्लक काम तात्काळ पुर्ण करायला सांगितले आहे. लवकरच या मार्गावरून पुर्ववत बससेवा सुरू करण्यास सांगण्यात येईल.
- हर्षल ढोरे, नगरसेवक 

गजानन महाराज रस्त्याचे कॉंक्रिटिकरणाचे काम पुर्ण झाले आहे. पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे.येत्या आठ दिवसात काम पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- शिरिष पोरेडी अभियंता स्थापत्य ह प्रभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.