जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी दापोडीला जोडणारा पवना नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुल ते दापोडी एसटी कार्यशाळा या परिसरात अंधारामुळे नागरीकांना रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. या रस्त्यावर रात्री नियमित रहदारी असते.जुनी सांगवी व परिसरातील कामगार, महिला या रस्त्यानेच कामासाठी पिंपरी, भोसरी व इतर भागात जातात. या परिसरातील पथदिवे जुने व पिवळ्या रंगाचे असल्याने याचा प्रकाश कमी पडतो.
येथील पथदिव्यांच्या अंधुक प्रकाशामुळे हा परिसर रात्री अंधारमय असतो. दापोडी सांगवी अंतर कमी असल्याने अनेक नागरीक,कामगार,महिला कामगार दापोडीहुन जुनी सांगवीत चालत ये जा करतात.हा परिसर अंधारमय व ओसाड असल्याने येथुन येता जाता महिलांना भीतीच्या दडपणाखाली काढता पाय घ्यावा लागत असल्याचे महिला सांगतात.यातच दापोडी कडुन येणारा हा रस्ता व सांगवी पुलावरून दोन्ही बाजुंनी उतार रस्ता असल्याने वहाने भरधाव वेगात असतात.सायकल स्वार व पायी चालणा-यांना वहानांच्या प्रकाशामुळे जिव मुठीत घेवुन येथुन मार्गक्रमण करावे लागते. अंधारात न दिसणारे चेंबरचे खड्डे- पुल ओलांडल्यावर साधारण पाचशे मीटर अंतरापर्यंत रस्त्यातील चेंबरचे खड्डे असल्याने गाड्या आदळुन अनेकदा अपघातही घडले आहेत.या परिसरातील चेंबर भोवती खड्डे आहेत.चेंबर वर खाली असल्याने वहानचालकांच्या लक्षात येत नाहीत.
एस.टी.कार्यशाळेच्या वळणावर वेग मर्यादा कमी व्हावी व अपघात टळावा यासाठी गतिरोधक करण्यात आला आहे.मात्र वळणावर असलेल्या या गतिरोधकास पांढरे पट्टे व सुचना फलक लावला नसल्याने आजारापेक्षा उपचार भयनाक अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.गतिरोधक नजरेस येत नसल्याने वेगात आलेली वहाने थेट एसटी कार्यशाळेच्या सिमाभिंतीला आदळुन यापुर्वी अपघाताच्या घटनाही या परिसरात घडलेल्या आहेत.
सांगवी व दापोडी कडील दोन्ही बाजुस पुलावरून उतार रस्ता असल्याने पुलाच्या काही अंतरावर दोन्ही बाजुला गतिरोधक करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. सांगवी कडे पुलावरून येणारी वहाने भरधाव वेगाने येतात. समोरच डाव्या बाजुला सांगवी उपनगराचे मुख्य बसस्थानक आहे.तर समोरच रिक्षा वहातुक थांबा आहे.हा परिसर नेहमी वर्दळीचा असतो. वेगाने येणा-या वहानांमुळे शाळकरी,मुले जेष्ठ नागरीक यांना रस्ता ओलांडणे अडचणीचे ठरते. या परिसरात नविन एलईडी बसविण्यात येवुन पुलाच्या दोन्ही बाजुला गतिरोधक करावेत अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.