मतदार नोंदणीसाठी गृह निर्माण सोसायटी फेडरेशन करणार मदत

pune
pune
Updated on

नवी सांगवी(पुणे) - पिंपरी चिंचवड को-ऑप हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवार ( ता. 18 ) रोजी महानगर पालिकेचे सह-आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप गावडे यांच्यासमवेत बैठक पार पडली. यावेळी गावडे यांनी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना सोसायट्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरीता जागृती करुन मतदार नोंदणी अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन केले. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही या राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याची शाश्वती दिली.

फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे म्हणाले की, " शासनाने या कामी नियुक्त केलेले कर्मचारी आणि विविध सोसायटयांचे पदाधिकारी यांचे मध्ये समन्वय साधून ते सुचारु पद्धतीने कसे पार पाडले जाईल असे पाहू. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सोसायटयांच्या माहितीच्या आधारे आंम्ही त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधू व त्यांना त्यांच्या सोसायटीतून किमान एक तरी प्रतिनिधी नियुक्त करण्याची विनंती करू."

हाच संदर्भ पकडून निवडणूक अधिकारी गावडे म्हणाले, " अशा प्रकारे नियुक्त प्रतिनिधींना प्रशिक्षण देऊन त्यांनी आपल्या सोसायटी मध्ये ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नाही अशा व्यक्तींचे नाव समाविष्ट करून घेणेसाठी शासन प्रतिनिधींस सहकार्य करावयाचे आहे. त्या नुसार सर्व इच्छूकांची सूची तयार करण्यात येऊन प्रत्येक सोसायटीमध्ये मतदार नोंदणी साठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येइल. 

शासनाचे प्रतिनिधी सोसायटीचे दारी येणार असल्याने नागरिकांना या कामासाठी आता बाहेर कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे केवळ मतदार नोंदणी पुरते हे अभियान मर्यादित न राहता पूर्वीच्या तपशीलातील दुरुस्ती, स्थानांतरण या सेवा देखील या अभियानांतर्गत पुरविण्यात येणार आहे.

या बैठकीत महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, फायर फायटिंग असोसिएशनचे वीरेंद्र बोराडे, फेडरेशनचे अन्य प्रतिनिधी किरण वडगामा, हेमचंद्र कुरील, सचिन लोंढे, अरुण देशमुख यांनी सहभाग घेतला. तसेच सिल्वर ऑरचीड सोसायटीचे अविनाश ताकटे आणि पद्मावती धारा सोसायटीचे मिलिंद पाटील हे देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.