पुणे - जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या वाढविण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासनाने या महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव-पत्यांमधील दुरुस्ती अथवा दुबार नावे वगळता येणार आहे. ही मोहीम रविवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या मोहिमेमुळे अधिकाधिक नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सप्टेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. यामध्ये अधिकाधिक नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी विभागीय आयुक्त यांनी ऑक्टोबर महिन्यातील ता. ७, १४, २१ आणि २८ या चार रविवारी विशेष मोहीम घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्यानुसार प्रशासनाकडून ही मोहीम प्रत्येक रविवारी राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर रविवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सुविधा
१८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मोहीम घेतली जाणार आहे. या मोहिमेमध्ये नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव पत्यांमधील दुरुस्ती करता येणार आहे. मयत अथवा दुबार नावे वगळण्याची सुविधा, तसेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नावे स्थलांतर करण्याची संधी मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.