दुर्दैवी! मैत्री ठेवण्यासाठी केला कुटुंबीयांनी विरोध; सततच्या वादातून तिने केली आत्महत्या  

Student commits suicide due to family dispute
Student commits suicide due to family dispute
Updated on

नागपूर : सोशल मीडिया म्हणा किंवा आजची बदलती जीवनशैली यामुळे तरुणाई अधिक संवेदनशील झाली आहे. त्यांच्याच भल्यासाठी कुटुंबातील जेष्ठांकडून घेण्यात आलेल्या निर्णयावरून कुटुंबात वादाचे प्रसंग निर्माण होतात. एवढेच नव्हे तर प्रकरण जास्ती ताणले गेले तर आत्महत्येपर्यंत प्रकरण पोहोचते.  अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली.   

कौटुंबिक वादातून विद्यार्थिनीने विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्या केली. राणी ऊर्फ हिमानी सोनकुसरे (१८) रा. नाईक तलाव, बांग्लादेश, हनुमान मंदीरजवळ असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, राणीचे वडील मजुरी करतात. घरची परिस्थिती बेताचीच आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राणीची घराजवळ राहणारा आणि पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या तरुणासोबत घट्ट मैत्री होती. घरच्यांचा मात्र या मैत्रीवर आक्षेप होता. याच कारणावरून बुधवारी राणीचे घरच्यांसोबत भांडण झाले. रागतच राणी घराबाहेर पडली.

विषारी द्रव्य प्राशन करीत ती बिंझाणी कॉलेजजवळील रचना बेकरीच्या बाजूला जाऊन बसली. प्रकृती खालावत असल्याने परिसरातील नागरीकांना शंका आली. त्यांनी तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे डक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. 

याशिवाय एमआयडीसी हद्दीतील अमरनगरात भाड्याने राहणारा नीलेश ठाकूर (२४) याने सिलिंगच्या हूकला चादरीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. प्रतापनगर हद्दीतील सिंधी कॉलनी, खामला येथील रहिवासी तुलसीदास जेकलानी (७४) हे शुक्रवारी साकळी घरी टाक्यातून पाणी घेत असताना तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडले. त्यांना उपचारासाठी मेडीकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

ऑटोचालकाने घेतली तलावात उडी

आजाराला कंटाळून आॅटोचालकाने गांधीसागर तलावात उडी घेत आत्महत्या केली. संतोष हिवराळे (४२) रा. वैशालीनगर असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, संतोष यांना ह्रदयाचा आजार होता. उपचारही सुरू होते. एकीकडे आजारपण तर दुकरीकडे आर्थिक चणचण यामुळे ते निराश झाले होते. याच तणावातून त्यांनी गांधीसागर तलावात उडी घेतली. गुरुवारी दुपारी २.२० वाजता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.