आंगण-रणांगण आंदोलन ट्रोलनंतर भाजपमध्ये धुसफूस; पक्षाचे ध्येय धोरणांवर आक्षेप घेत या पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

bjp in akola.jpg
bjp in akola.jpg

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत भाजपने शुक्रवारी राज्यभर मेरा आंगण रणांगण हे आंदोलन केले होते. भाजपचे हे आंदोलन सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया सेलमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. पक्षाचे ध्येय धोरणांवर आक्षेप घेत भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अकोल्यातील शरद झांबरे यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला.

भाजपला राज्यात सत्ता स्थापण्यात अपयश आल्यापासून सोशल माडियावर भाजपचे नेते चांगलेच ट्रोल होत आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते, माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आदी नेत्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागला. त्यात शुक्रवारीच झालेल्या मेरा आंगण रणांनग हे आंदोलनही चांगलेच ट्रोल झाले. 

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याऐवजी विरोधी पक्ष भाजपने सरकारविरोधात ओरडल सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरातील नेटकऱ्यांना भाजपच्या या आंदोलनाला ट्रोल केली. त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया सेलमधिल वाद उफाळून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. 

अकोल्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरील सदस्य शरद झांबरे यांनी पक्षाच्या ध्येय धोरणावर आक्षेप घेत त्यांचा राजीनामा शनिवारी भाजपच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश संयोजक प्रवीण अलई, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे.

माजी पालकमंत्र्यांचा शिक्का
भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य शरद झांबरे हे भाजप सत्तेत असताना अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निकटवर्तीय होते. अकोला भाजप जिल्हा कार्यकारिणीतून सोशल मीडिया प्रमुख असलेले झांबरे यांना पदावरून दूर केल्यानंतर डॉ. पाटील यांनीच त्यांचे राजकीय वर्चस्व पणाला लावून झांबरे यांची प्रदेश सोशल मीडिया सेलमध्ये वर्णी लावली होती, असे म्हटले जाते. आता कुणीही गॉडफादर राहिला नसल्याने झांबेर यांनी पद सोडल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com